Site icon InMarathi

कामवाल्यांसाठी वेगळी लिफ्ट, पुण्यातल्या हाय क्लास सोसायटीचा इमोशनल करणारा दुजाभाव

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जातिवाद, सामाजिक विषमता आणि आर्थिक वर्गवारी ही गोष्ट भारतीयांसाठी काही नवीन नाही. एकीकडे ही विषमता संपविण्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवर प्रयत्न होत आहेत आणि दुसरीकडे मात्र ही दरी आणखी खोल करण्याचे प्रयत्न कधी काळात-नकळत तर कधी जाणूनबुजून केले जात आहेत.

अशा भेदभाव केल्या जाण्याच्या घटना अधूनमधून समोर येत असतात. नुकतीच पुण्यात देखील अशा प्रकारची घटना घडल्याचे ट्विटरच्या माध्यमातून प्रकाशात आणले गेले.

पुणे तिथे काय उणे? हे आपले ब्रीद पुण्याने या ही बाबतीत खरे केले की काय? हेच यानिमित्ताने सगळ्यांना वाटू लागले आहे. नक्की काय घडले? हे चला जाणून घेऊ.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

झाले असे, की पुण्यातील एका हायक्लास हाऊसिंग सोसायटीने इमारतीमध्ये वापरल्या जाणार्‍या लिफ्ट च्या वापरासंबंधी एका सूचना, आपल्या इथे काम करणार्‍या मदतनीस, दूध घेऊन येणारे, वर्तमानपत्रे वितरित करणारे, कुरीयर किंवा ऑनलाइन वस्तूंची डिलिव्हरी देणारे लोक यांच्यासाठी जारी केली आहे.

या सूचनेनुसार इमारतीच्या एकूण लिफ्ट पैकी एक लिफ्ट या सर्व लोकांनी वापरावी,इतर दुसर्‍या लिफ्ट वापरू नयेत असा त्या सूचनेचा आशय आहे.

जिथे नोटीसने सर्व पाळीव प्राणी, घरगुती मदतनीस आणि सेवा कर्मचार्‍यांना फक्त त्यांना नियुक्त केलेली लिफ्ट वापरण्यास सांगितले आहे. ही नोटीस व्हायरल झाली असून सेवा पुरविणाऱ्यांविरुद्ध भेदभाव केल्याच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

‘संदीप मनुधने’ या ट्विटर वापरकर्त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये लिफ्टच्या दरवाजाबाहेर अडकलेल्या नोटीसमध्ये लिहिले आहे, “घरातील नोकरदारांनी लिफ्ट सी किंवा डी फक्त वापरावी”.

त्याच्या शेजारी असलेल्या दुसर्‍या पोस्टरमध्ये पुढे नमूद केले आहे, की “दुधवाला, वृत्तपत्र आणि कुरिअर वितरक, घरकाम करणारे, कामगार, चित्रकार आणि पाळीव प्राणी यांनी फक्त लिफ्ट ‘डी’ वापरावी.” मनूधने यांनी सचनेचे दोन्ही फोटो शेअर केल्यामुळे, मायक्रोब्लॉगिंगवर वाद सुरू झाला.

काही ट्विटर वापरकर्त्यांनी असा दावा केला, की ते “पृथक्करण” नव्हते परंतु ते उपयुक्ततावादी हेतूसाठी केले गेले होते जेणेकरून सेवा-प्रदाते त्यांचे कर्तव्य अधिक कार्यक्षमतेने पार पाडू शकतील, तर इतरांनी असा युक्तिवाद केला की याचे कारण स्पष्टपणे वर्गवाद आहे आणि इतर कोणतेही स्पष्टीकरण असू शकत नाही. काहीजणांनी असे ही मत व्यक्त केले, की त्या सूचनेचा जाणूनबुजून चुकीचा अर्थ लावला गेला.

 

 

काही महिन्यांपूर्वी जेव्हा कोरोनाकाळ सुरू होता तेव्हा हैदराबादच्या एका गृहनिर्माण संस्थेने ‘घरकाम करणारे , ड्रायव्हर आणि डिलिव्हरी बॉईज’ यांना मुख्य लिफ्ट न वापरण्यास सांगितले होते अन्यथा त्यांना ३०० रुपये दंड ठोठावला जाईल अशी सूचना दिली होती.

हे अशा वेळी घडले जेव्हा लोक अन्न वितरण अॅप्सवर जास्त अवलंबून होते. त्यांच्या दैनंदिन गरजा ज्यावर COVID-19 निर्बंध आणि लॉकडाऊनचा परिणाम होत होता.

हे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी इमारत अधिकाऱ्यांच्या पूर्वग्रहदूषित वृत्तीचा गौप्यस्फोट केला होता. दुसरीकडे, काहींनी या हालचालीचा बचाव केला आणि कोविडसाठी घेतलेला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्याचा उल्लेख केला.

इतरांनी ते “सामान्य” पेक्षा अधिक काही नाही म्हणून दुर्लक्ष केले आणि याबद्दल काहीही विचार केला नाही. तर लोकांच्या दुसर्‍या गटाने सांगितले, की हे घरगुती कामगार आणि डिलिव्हरी करणार्‍या लोकांना थुंकण्यापासून आणि लिफ्ट दूषित करण्यापासून रोखण्यासाठी केले गेले आहे.

 

 

अशाच प्रकारची चेतावणी अलीकडेच उदयपूरच्या एका मॉलमध्ये पोस्ट करण्यात आली होती, ज्यात खाद्यपदार्थ वितरण अधिकाऱ्यांना लिफ्टऐवजी पायऱ्या चढण्याची सूचना देण्यात आली होती. तर इमारतीमध्ये राहणार्‍या लोकांना भेटायला येणाऱ्या पाहुण्यांचे काय? असाही सवाल एका नेटीझनने केला होता.

भेदभाव आणि जातिवाद यांचा रंग या विषयाला दिला जात आहे. ही सूचना जारी करणार्‍यांचा उद्देश काही असो, पण तो आता रंगवून चर्चिला जाणार हे नक्की.

अर्थात पुण्यातील त्या गृहसंस्थेने लिफ्टबाहेर लावलेल्या सूचनेचा मूळ उद्देश काहीही असला तरी त्यावरून दोन्ही बाजूंनी उलट सुलट प्रतिक्रिया उमटलेल्या बघायला मिळत आहेत.

पूर्वी गावात काहीही घडले की त्याची चर्चा गावातल्या पारावार होत असे आणि मग तो विषय गावभर होत असे. जसा हा वेगळी लिफ्ट वापरण्यासंबंधीचा विषय सोशल मीडियावर चर्चिला जात आहे ते पाहता सोशल मीडियाला जाणते लोक ‘चव्हाटा’ यासाठीच म्हणत असतील का?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version