आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
काही वर्षांपूर्वी ‘मी टू’ प्रकरणामुळे बराच काळ सगळीकडे वातावरण तापलं होतं. अभिनेत्री तनुश्री दत्ताने एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकरांनी आपल्याला अयोग्य प्रकारे स्पर्श केला होता असा आरोप केला होता. या सगळ्यावर हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीतल्या कलाकारांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या.
कुणी तनुश्रीच्या बाजूने, कुणी नानांच्या बाजूने बोललं. कुणी आपल्याला याविषयी काहीच माहित नसल्यामुले आपण यावर काहीही बोलू शकत नाही मात्र प्रकरणाचा कसून तपास व्हावा अशी भूमिका घेतली तर आणखी कुणी या सगळ्याविषयी मौन पाळलं.
हे आरोप खरे होते की खोटे हे आजवर कळलेलं नाही. मात्र या चळवळीमुळे खूप जणांना, विशेषतः मुली,बायकांना हिंमत करून प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षरीत्या आपल्या आवाजाला वाचा फोडायला बळ मिळालं होतं.
आर्यन खान प्रकरण संपत नाही तोवर रविवारी रात्री एका पार्टीत ड्रग्ज सेवन केल्याच्या कथित आरोपावरून बंगलोर पोलिसांनी अभिनेते शक्ती कपूर याचा मुलगा सिद्धांत कपूर याला ताब्यात घेतल्याचं वृत्त नुकतच समोर आलंय. पण पडद्यावर खलनायकाच्या भूमिका साकारणारे त्याचे वडील, शक्ती कपूरदेखील कधीकाळी ‘मी टू’ प्रकरणात अडकले असल्याचं कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल. नेमकी काय होती ती घटना? जाणून घेऊ.
शक्ती कपूर हे बॉलिवूडमधले एक लोकप्रिय खलनायक. पण त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातली एक वाईट बाजू २००५ साली झालेल्या एका स्टिंग ऑपरेशनमधून समोर आली होती. ‘इंडिया टीव्ही’ने हे स्टिंग ऑपरेशन घडवून आणलं होतं.
एक महिला पत्रकार अभिनेत्री बनण्याचं स्वप्न असलेल्या स्त्रीचं सोंग घेऊन शक्ती कपूर यांना भेटायला गेली. त्यावेळी घेतल्या गेलेल्या व्हिडियो क्लिपमध्ये “मला तुझ्यासोबत लैंगिक संबंध ठेवायचे आहेत… आणि जर तुला या लाईन (फिल्म इंडस्ट्री)मध्ये यायचं असेल तर मी तुला जे सांगेन ते तुला करावं लागेल.”, असं शक्ती कपूर त्या अभिनेत्रीच्या वेशातल्या पत्रकार महिलेशी बोलत असताना ऐकू आलं. त्यांनी त्यानंतर तीन अभिनेत्रींची नाव घेतली आणि दोन बड्या दिग्दर्शकांची नावं घेत इंडस्ट्रीत येण्यासाठी त्या अभिनेत्रींनीही या दिग्दर्शकांसोबत अशा प्रकारे कॉम्प्रोमाइज केलं असल्याचं सांगितलं.
ही बातमी वणव्यासारखी पसरली आणि ‘द फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गुइल्ड ऑफ इंडिया’ने शक्ती कपूर यांना इंडस्ट्रीतून बॅन केलं. हे स्टिंग ऑपरेशन बॉलिवूडमध्ये चालणाऱ्या कास्टिंग काऊचचाच नमुना होता. सगळी बॉलिवूड इंडस्ट्री त्यामुळे हादरली होती. ‘इंटरनॅशनल बिझनेस टाइम्स’च्या वृत्तानुसार, शक्ती कपूर यांनी हा व्हिडियो बनावट असल्याचा दावा केला होता.
ती पत्रकार त्यांना बऱ्याच वेळा भेटली होती आणि तिने बुक केलेल्या हॉटेल रूमवर जर ते आले नाहीत तर ती आत्महत्या करेल अशी धमकी तिने त्यांना दिल्याचं त्यांनी ‘फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गुइल्ड ऑफ इंडिया’ला सांगितलं. शक्ती कपूर यांच्याविरोधात काही ठोस पुरावा न मिळाल्यामुळे नंतर हा बॅन हटवला गेला.
–
मुलाच्या स्कँडलमुळे झाली अशी नाचक्की, की पंतप्रधानपदाचं स्वप्न धुळीला मिळालं…
वरुण गांधींचं स्कँडल बाहेर आलं आणि तेव्हाच UP चं “भावी मुख्यमंत्रीपद” गमावलं…
–
‘पीटीआय’शी बोलताना ज्या प्रकारे हे स्टिंग ऑपरेशन केलं गेलं होतं त्याचा निषेध करत दिग्दर्शक सावन कुमार पूर्वी म्हणाले होते, “एखाद्या निष्पाप बळीला प्रलोभन दाखवताना जर ते पकडले गेले असते तर ते समजून घेता येण्यासारखं होतं. पण एखाद्या पत्रकाराने असं सोंग आणणं ही वेगळी गोष्ट आहे. त्यांना सापळ्यात पकडण्यासाठी हे सगळं घडवून आणल्यासारखं वाटतं. मीडियाने इंडस्ट्रीला दोष लावणं अयोग्य आहे.
केवळ एका सिंगल नाईट स्टॅन्डसाठी कुठलाही सुज्ञ दिग्दर्शक आपलं करियर, आपली पतप्रतिष्ठा आणि आपलं काम धोक्यात येऊ देणार नाही. शिवाय, खासगी जागांवर मीडिया कसं अतिक्रमण करू शकते? चॅनेलने जे केलंय ते चुकीचं आहे.”
कधीकाळी स्वतःवर मी टूचा आरोप लागलेला असताना तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर मी टूचा आरोप लावण्यावर शक्ती कपूर यांची प्रतिक्रिया विचारली गेली असताना त्यांनी ते हसण्यावारी नेलं होतं.
हे खरंच असं घडलं होतं का हे सिद्ध झालेलं नाही. पण अशा प्रकरणाचं सहसा पुढे काहीच होत नाही. ती तशीच अर्धवट राहतात आणि खरा दोषी कोण हे कळू शकत नाही. खरा दोषी कुठल्याही सजेविना समाजात उजळ माथ्याने फिरत राहतो हे आपल्या समाजाचं दुर्दैवच म्हणावं लागेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.