आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
गेले दोन-अडीच महिने कडक उन्हामुळे इतकं बेजार झाल्यानंतर आता थोडासा पाऊस पडायला सुरुवात झाल्यानंतर वातावरणच बदलून गेलंय. इतके दिवस रात्रीसुद्धा उकडत होतं, पण आता दिवसाही कमी उकडू लागलंय. सगळेचजण आता मस्त जोरदार पाऊस पडायची वाट बघत आहेत.
उन्हाळ्यात घरोघरी, ऑफिसमध्ये सगळ्यांनीच मोठ्या स्पीडवर पंखे आणि कमी टेम्परेचरवर एसी लावले असतील, पण तुमच्या घरातल्या आणि ऑफिसमधल्या बायकांना तुम्ही लावला आहे त्यापेक्षा कमी फास्ट पंखा किंवा थोड्या जास्त टेम्परेचरवर एसी लावायला हवा असायचा का? त्यावरून थोड्याबहुत कुरबुरी व्हायच्या का?
उन्हाळाच असं नाही, कुठल्याही ऋतूत घरोघरी आणि कार्यालयांमध्ये दिसणारं हे चित्र. आपण कदाचित या बाबीकडे आजवर दुर्लक्षही करत आलो असू. पण साधारणपणे बायकांना पुरुषांपेक्षा जास्त थंडी वाजते हे आपण मान्य करू.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
आपण त्यातून काहीतरी मध्यममार्ग काढतो आणि महिलांना आणि पुरुषांना दोघांसाठीही काय सोयीचं असेल ते करतो. आता पावसाळा आणि हिवाळ्यात तर हे हमखास होईल.
पुरुषांना खोलीत जास्त गारवा हवा असेल आणि आपल्याला थंडी वाजतेय, पुरुषांना कशी वाजत नाहीये असा प्रश्न पडून बायकांची थोडी पंचाईत होईल, पण कुठल्याही ऋतून महिलांना पुरुषांपेक्षा जास्त थंडी वाजण्यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत हे कदाचित आपल्याला ठाऊक नसेल.
काय आहेत ती कारणं? जाणून घेऊ.
१. चयापचयाचा दर कमी : पुरुषांच्या तुलनेत महिलांचा मेटाबॉलिक रेट कमी असतो. थंड वातावरणात असताना अंगातील उब वाढवायला आणि त्यायोगे थंडी कमी वाजयला मेटाबॉलिजम रेट जास्त असेल तर मदत होते.
महिलांचा मेटाबॉलिक रेट कमी असल्यामुळे वातावरणातलं तापमान कमी झालं की त्यांना पुरुषांच्या तुलनेत जास्त थंडी वाजयला लागते.
२. उष्णता उत्पन्न करणारे स्नायू कमी : महिलांचं आणि पुरुषांचं वजन जरी सारखं असलं तरी पुरुषांच्या मानाने महिलांमध्ये उष्णता उत्पन्न करणारे स्नायू कमी असतात. त्यामुळे महिलांना पुरुषांपेक्षा जास्त थंडी वाजते.
३. त्वचा आणि स्नायूंदरम्यान अधिक चरबी : महिलांच्या शरीरात त्वचा आणि स्नायूंदरम्यान अधिक चरबी असते. महिलांच्या शरीरातील रक्तवाहिन्यांपासून त्यांची त्वचा काहीशी दूर असते. महिलांना पुरुषांपेक्षा जास्त थंडी वाजण्यामागे हेही एक कारण आहे.
४. हार्मोन्स : इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतात. शरीर आणि त्वचेमधील तापमानाचा जो सहसंबंध असतो त्यादृष्टीने ते महत्त्वाचे असतात. रक्तवाहिन्या पसरतात आणि हार्मोन्समुळे त्वचेआतील रक्तवाहिन्या घट्ट होतात.
शरीराच्या आतल्या भागांमध्ये पोहोचलेलं रक्त ते भाग उबदार ठेवतं. पण या हार्मोन्समुळे शरीरातल्या काही भागांमध्ये कमी रक्त पोहोचतं आणि ते उबदार राहत नाहीत. त्यामुळेही महिलांना पुरुषांपेक्षा जास्त थंडी वाजते.
महिलांच्या मासिक पाळीदरम्यान आणि महिन्यातल्या इतरही दिवशी हा हार्मोनल बॅलन्स बदलत असतो. या हार्मोन्समुळे महिलांचे हात, पाय आणि कान पुरुषांच्या मानाने साधारण ३ डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक थंड असतात.
ओव्हुलेशन (प्रजनन होण्याची सर्वाधिक क्षमता असलेले महिन्यातील ठरविक दिवस) पूर्वी महिलांच्या शरीराचं तापमान साधारण ३५.९ डिग्री सेल्सियस असतं. त्यानंतर काही दिवसांनी ते ३६.७ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं.
शरीरातील तापमान नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेशी शरीरातील बऱ्याच सेक्स हार्मोन्सचा संबंध असतो. उदाहरणार्थ, इस्ट्रोजेनमुळे शरीरातल्या रक्तवाहिन्या रुंद होतात ज्यामुळे शरीराचं तापमान कमी व्हायला मदत होते.
याउलट, प्रोजेस्टेरॉनमुळे शरीराचं तापमान वाढतं. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह्जमधल्या प्रोजेस्टेरॉनमुळे शरीरातील तापमान दीर्घकाळ वाढत राहत असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. पुरुषांमध्ये टेस्टेस्टेरॉनची पातळी जास्त असली तरी त्यांच्या शरीराचं तापमान वाढत नाही.
५. काही आजार : कमी तापमान असेल किंवा ताण असेल तर शरीराचे काही भाग, विशेषतः हातांची आणि पायांची बोटं थंड आणि बधीर होणे या आजाराला ‘रेनाऊड्स’ असं म्हणतात. यात पूर्ण शरीर सहसा थंड पडत नाही, पण जे भाग थंड पडतात तिथे फार वेदना होतात.
या भागांमधल्या छोट्या रक्तवाहिन्या फार जलद गतीने निमुळत्या झाल्यामुळे हा आजार होतो. वाजवीपेक्षा थंड वातावरणात राहणाऱ्या स्त्रियांना हा आजार होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळेही त्यांना थंडी वाजते. उपचार घेऊन हा आजार बरा करता येतो.
—
- कधी विचार केलाय – एखाद्याला जांभई देताना पाहून आपल्याला जांभई का येते?
- “कोणत्या राज्यातील स्त्रिया सर्वात सुंदर आहेत?” : वाचा मनाला भावणारी उत्तरं!
—
हायपोथायरॉइडिजम हा असाच एक आजार ज्यामुळे तुमच्या मानेतील थायरॉईड ग्लॅण्डसवर परिणाम होऊन ऊर्जेची पातळी, केस, त्वचा, वजन आणि आतलं तापमान व्यवस्थित राखणारे हार्मोन्स तयार होणं थांबतं. त्यामुळेही थंडी वाजते. सिंथेटिक हार्मोन्सचे उपचार करून हा आजार बरा करता येतो.
महिलांना पुरुषांपेक्षा जास्त थंडी वाजणं ही बाब वरकरणी अगदी साधीशी, नेहमीची आणि दुर्लक्ष करण्याजोगी वाटत असली तरी त्यामागे या इतक्या कारणांची यादी असते हे कळल्यावर आपल्याला आश्चर्य वाटेल.
घरात किंवा ऑफिसमध्ये थंडी वाजतेय म्हणून महिलांनी पंखा, एसी कमी करायला सांगितला तर त्यामुळे वैतागून तुम्ही तो कमी करत नसाल आणि तुम्हाला हवा म्हणून तसाच ठेवत असाल तर यापुढे ते करणं टाळा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.