Site icon InMarathi

वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी जस्टिन बीबरला झालाय एक विचित्र आजार

bieber im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जस्टीन बीबर नव्या पिढीचा आवडता गायक. त्याची गाणी तरुणाईने डोक्यावर घेतली आहेत. बाकी खूप जणांना प्रश्न पडतो जस्टीन हा मुलगा आहे की मुलगी? कारण त्याचा आवाज मुलासारखा नाही पण हे बघा, ज्याची त्याची आवड असते. तरूण पिढीला जस्टीन आवडतो हे मात्र नक्की.त्याचे लाईव्ह शो हाऊसफुल होतात. आपली तरुण मुलं मुली त्यांच्या प्ले लिस्ट मध्ये त्याची गाणी वाजवत असतात.

हा जस्टीन अवघा २८ वर्षांचा आहे.त्यामानाने त्याला जगभरात मिळालेली लोकप्रियता मात्र निर्विवाद आहे. पण नुकतेच त्याने आपले सारे शो रद्द केले आहेत. त्याचं कारण त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट वर शेअर केले आहे.

 

 

जस्टीनला रामसे हंट सिंड्रोम नावाची विचित्र व्याधी झाली आहे.ही दुर्मिळ व्याधी माणसाच्या चेहऱ्यावर हल्ला करते. यामुळे जस्टीनच्या चेहऱ्याची उजवी बाजू लुळी पडली आहे. त्या बाजूचा त्याचा डोळा स्थिर आहे. पापणी सुद्धा हलत नाही. इतकेच नव्हे तर त्याच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूने तो हसूही शकत नाही.

काय आहे रामसे हंट सिंड्रोम?

रामसे हंट सिंड्रोम ही व्याधी आहे, जी चेहऱ्याच्या नसा बधिर करते. हा स्नायुंना होणारा एक विकार आहे, कांजिण्यामध्ये जसे छोटे छोटे पुरळ उठून खाज येते तसेच या व्याधीमध्ये होते. फक्त यामध्ये चेहऱ्याचे स्नायू तात्पुरते बधिर होतात. तिथे निगडीत असलेल्या मज्जातंतूवर त्याचा परिणाम होतो आणि ते काम करू शकत नाहीत.

फेशियल पाल्सी या रोगात जसा चेहरा तात्पुरता वाकडा होतो तसेच या व्याधीमध्ये पण होते. म्हणजे मेंदूकडून येणाऱ्या सूचना चेहऱ्याच्या स्नायूना मिळत नाहीत चेतातंतू ते पोहोचवू शकत नाहीत त्यामुळे चेहऱ्याचे काम थांबते. आपल्या शरीरात कपाळाकडे येणाऱ्या एकूण १२ नसा असतात. यातील ७ व्या नसेवर रामसे हंट सिंड्रोम हल्ला करतो त्यामुळे ती नस सुजते आणि दाह सुरु होतो.

 

 

हा हल्ला करणारा विषाणू म्हणजे varicella zostar. जेव्हा हा विषाणू हल्ला करतो तेव्हा माणसाच्या कानाभोवती लाल रंगाचे पुरळ यायला सुरु होतात आणि ज्या बाजूच्या कानाला हे पुरळ येतात चेहऱ्याची तीच बाजू बधिर होते आणि पक्षाघात होतो. रुग्ण आपली ऐकण्याची क्षमता गमावतो. फक्त कानात गुणगुणणे ऐकू येते बाकी काही ऐकू येत नाही असे रुग्ण सांगतात. त्याचबरोबर डोळा बंद होऊ शकत नसल्यामुळे डोळ्यालाही कोरडेपणा येतो.

इतकेच नाही तर या व्याधीमध्ये रुग्णाच्या कानाच्या पडद्यावर, कानाच्या आतील बाजूवर पुरळ येतात. तोंडात, जिभेवर पण फोड येतात. श्रवणशक्ती कमी होते. चक्कर येणे गरगरणे अशी लक्षणेही दिसतात. अन्न चावायला अडचण येते. कारण एक बाजू बधिर झाल्यामुळे साऱ्या संवेदना क्षमता तात्पुरत्या का असेना पण नष्ट झालेल्या असतात. जस्टीन बीबरला याच त्रासाला सध्या तोंड द्यावे लागत आहे.

रोगावर मात कशी करता येईल?

यासाठी अँटीव्हायरल औषधे, वेदनाशामक औषधे देऊन इतर औशादानी त्याची प्रतिकारशक्ती वाढवणे, चेहऱ्याला फिजिओथेरपी देणे या उपायांनी हा त्रास कमी करता येतो.

हा त्रास काही कायमस्वरूपी नसतो, ही गोष्ट जस्टीनच्या चाहत्यांना दिलासा देणारी आहे. त्यामुळे लवकरच तो बरा होईल आणि पुन्हा नव्या जोमाने गाणी गायला लागेल यात शंका नाही.

 

मधुमेहापासून १०० % दूर ठेवणारे हे ८ सोपे व्यायामप्रकार फक्त तुमच्यासाठीच, वाचा!

सेलिब्रिटींच्या नादी लागून एक महाभयानक चूक करताय का? वाचून घ्या – मग ठरवा!

कलाकार मंडळी म्हंटल की जागरण वेळीअवेळी जेवण यामुळे कलाकारां तब्येतीकडे दुर्लक्ष होत असते. अगदी कमी वयातच त्यांना हृदविकाराचे झटके येऊन त्यांचा मृत्यू देखील होतो. त्यामुळेच लोकांसमोर आपली कला सादर करताना या मंडळींनी आपल्या शरीराकडे लक्ष दिले पाहिजे. ज्या शरीरातून येणाऱ्या कलेमुळे आपण जिवंत आहोत त्याच शरीराकडे दुर्लक्ष करता काम नये.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version