आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
अनेकांना हे माहित नसतं, की गीतेची सुरुवात संजय आणि धृतराष्ट्राचा संवादाने होते. ‘हस्तिनापुरात दोघेही बसलेले आहेत आणि तिथे बसल्या बसल्याच कुरुक्षेत्रातील युद्धाचं वर्णन संजय करतो आहे. धृतराष्ट्र शांतपणे युद्धाचं संपूर्ण समालोचन ऐकत आहेत’ अशा पद्धतीने गीता सुरु होते.
हस्तीनापूर म्हणजेच आजचं मेरठ आणि कुरुक्षेत्र हा भाग आजच्या हरियाणा राज्यातील आहे. या दोन ठिकाणांमधील अंतर जवळपास दीडशे किमी इतकं आहे. मग १८ दिवस चाललेल्या महाभारत युद्धाच्या प्रत्येक क्षणाचं वर्णन संजयने तिथे बसून कसं केलं आणि हा संजय नेमका होता तरी कोण? चला जाणून घेऊया.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
संजय कोण होता?
धृतराष्ट्राला संपूर्ण महाभारताचं वर्णन बसल्या जागेवर करून देणारा संजय आपल्याला माहित असतो. मात्र या समालोचनव्यतिरिक्त त्याने नेमकं काय केलं? तो नक्की कोण होता? याविषयी फार कमी लोकांना माहिती असते.
धृतराष्ट्रासाठी महाभारताचं समालोचन करणारा संजय हा त्याच्या दरबारातील एक मंत्री होतं. पण त्यापूर्वी तो व्यासांचा शिष्य सुद्धा होता. एक अतिशय नम्र आणि धार्मिक व्यक्ती असणारा संजय जातीने विणकर होता, मात्र महर्षी व्यासांचा एक लाडका शिष्य होता.
श्रीकृष्णाचा निस्सीम भक्त असलेल्या संजयला पुढे व्यासांनी दिव्य दृष्टी प्रदान केली. यामागे सुद्धा एक खास कारण होतं. महाभारत युद्धानंतर संजयचं काय झालं, तो कुठे गेला, त्याने पुढे नेमकं काय केलं याविषयी मात्र बरेच जण अनभिज्ञ असतात.
महर्षी व्यासांचा हा शिष्य दिव्य दृष्टी असलेला आणि हस्तिनापुरातून युद्ध पाहणारा एक व्यक्ती म्हणूनच कायम स्मरणात राहतो.
युद्धाचं वर्णन करण्याआधी….
संजय हा व्यासांच्या दरबारातील एक अत्यंत महत्त्वाचा मंत्री होता. त्याच्या शब्दाला, मताला तिथे विशेष किंमत होती. अनेकदा त्याचा सल्ला धृतराष्ट्र घेत असत. त्याच्या सल्ल्यानुसार कामकाज चालत असे. दरबारात संजयला विशेष मान होता.
कुरु वंशाचा विनाश होणं आणि जनतेतील अनेकांना हकनाक जीव गमवावा लागणं याविषयी संजयने धृतराष्ट्राला कल्पना दिली होती. मात्र हा सल्ला धृतराष्ट्राला मान्य नव्हता. हा सल्ला ऐकून तो फारच क्रोधीत झाला.
…आणि संजयला मिळाली दिव्य दृष्टी
युद्ध टळणार नाही याविषयी खात्री झाल्यावर व्यासांनी दिव्य दृष्टीविषयी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी धृतराष्ट्रांना दिव्य दृष्टी देऊ केली. मात्र आपल्या कुळाचा आणि पुत्रांचा विनाश होणार आहे याची जाणीव त्यांनाही झाली होती. म्हणूनच त्यांनी ही दिव्य दृष्टी नाकारली.
धृतराष्ट्र्राने दिव्य दृष्टी नाकारल्यामुळे व्यासांनी संजयची यासाठी निवड केली. धृतराष्ट्राचा नकार संजयसाठी वरदान ठरला आणि त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली. याच दिव्य दृष्टीचा वापर करून हस्तिनापुरातील महालात बसून संपूर्ण महाभारताचं वर्णन संजय करू शकला. प्रसंगी त्याने युद्धात भागही घेतला.
या दिव्य दृष्टीचं वरदान संजयसाठी फारच किंमती ठरलं. फक्त अर्जुनासमोर साकारलेलं श्रीकृष्णाचं विराट रूप पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी संजयला मिळाली. महालात बसूनच त्याने श्रीकृष्णाच्या या विराट रूपाचं दर्शन घेतलं.
या दिव्य दृष्टीचं कार्य महाभारत युद्ध संपल्यानंतर संपुष्टात आलं. दिव्यदृष्टीची कुठलीही गरज उरली नाही. त्यामुळेच महाभारत संपल्यानंतर संजयची दिव्यदृष्टी आपोआपच नाहीशी झाली.
युद्धानंतर संजयचा प्रवास….
महाभारत युद्धाविषयी बोलायचं झालं, तर ही दिव्य दृष्टी आणि संजय याशिवाय हा विषय पूर्ण होऊच शकत नाही. मात्र या दिव्य दृष्टीविषयी कुठलाही लिखित वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. वैज्ञानिक आधार नसल्यामुळे या घटनेला महर्षी व्यासांचा चमत्कारच मानलं जातं.
दिव्य दृष्टी नाहीशी झालेला संजय महाभारत युद्ध काळानंतरचा काही काळ युधिष्ठिराच्या राज्यात वास्तव्याला होता. मात्र फार काळ तो तिथे राहिला नाही.
—
- महाभारताच्या १८ दिवसांच्या युद्धानंतर पांडव, कौरव इत्यादींचे काय झाले?
- महाभारतातले हे ५ अज्ञात प्रसंग आपल्याला ‘मानवी मूल्यांची’ शिकवण देतात!
—
त्याने पुढे संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. धृतराष्ट्र, कुंती आणि गांधारी यांच्यासह संजयने सुद्धा संन्यास घेतला आणि तो राज्य सोडून निघून गेला. संन्यास काळात संजय हिमालयात सुद्धा निघून गेल्याचं म्हटलं जातं.
एक प्रामाणिक व्यक्ती, एक उत्तम मंत्री, राजाचा सल्लागार, त्यानंतर दिव्य दृष्टी प्राप्त झालेला एक चमत्कार अशा अनेक भूमिकांमधून गेलेला संजय महाभारत काळानंतर मात्र एक अत्यंत सामान्य आयुष्य जगला असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरत नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.