मुघलांच्या वारसदारांना आर्थिक टिप्स देणारा अन ब्रिटीशांना कर्ज पुरवून कंगाल झालेला असाही एक “शेठ”
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
इतिहासातील एक सामान्य व्यक्ती, ज्याच्याशिवाय तत्कालीन सरकारचं पान हलायचं नाही. त्याच्याजवळ ना कोणती सत्ता, ना अधिकार, तरिही थेट अठराव्या औरंगजेबानेही त्याच्याकडून आर्थिक गुंतवणूकीचे धडे घेतले. ब्रिटीशांना ज्याने कर्ज दिलं असा एक भारतीय होवून गेला हे कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही. मात्र कोण होती ती व्यक्ती? हे जाणून घेण्यासाठी इतिहासात डोकवावं लागेल.
भारतीय लोक प्राचीन काळापासून आजपर्यंत कोणत्याच गोष्टीत मागे नाहीत. जगाला अनेक गोष्टी आपण शिकवल्या आहेत. सध्याही जगात अनेक ठिकाणी भारतीय लोक उच्चपदावर आहेत, ते केवळ त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर!
काही भारतीय आपली सगळी बुद्धिमत्ता चांगल्या कामासाठी वापरात नाहीत याची उदाहरणं आपल्याला ऐतिहासिक काळापासून सापडतात. मात्र याच ऐतिहासिक काळामध्ये आपलं डोकं वापरून हवं ते करण्याची ताकद असलेल्यांची संख्या नक्कीच जास्त आहे. यामध्ये राजे-राजवाड्यांची नावं अग्रेसर असली तरी आज जी माहिती तुम्ही पाहणार आहात ती एका सामान्य व्यक्तीबद्दल आहे.
एका व्यवसायाचा विस्तार या व्यक्तीनं इतका केला की इंग्रजांनी यांच्याकडून कर्ज घेतलं होतं, त्यांच्याशिवाय भारतातल्या तत्कालीन अर्थव्यवस्थेचं पान हलत नव्हतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
एवढंच नव्हे तर हा माणूस क्रूर औरंगजेबाला आर्थिक टिप्स द्यायचा. अठराव्या औरंगजेबाच्या सरत्या काळात किंवा त्याच्या आधीही राज्यकर्त्यांना राज्य चालवण्यासाठी आर्थिक गरजा पूर्ण करण्याचे दोन मुख्य मार्ग होते. एक म्हणजे मोठ्या प्रदेशातून महसूल गोळा करणे आणि दुसरा म्हणजे सावकारांकडून कर्ज घेणे.
त्या काळात राजे, व्यापारी एवढंच नव्हे तर भारतात पाय पसरायला लागलेल्या इंग्रजांनाही कर्ज देणारा हा माणूस म्हणजे जगत सेठ! आता जगत सेठ हे काही त्याचं नाव नाही, त्याला मिळालेली पदवी होती. मग त्याचं खरं नाव काय? तो एवढा श्रीमंत सावकार कसा काय झाला? आणि मुख्य प्रश्न म्हणजे त्याच्या वारसांचं पुढं काय झालं? या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया.
बिझनेसमन ते जगत सेठपर्यंतचा प्रवास
राजस्थानातल्या नागौर इथं हिरानंद साहू यांच्या पोटी माणिकचंद यांचा चौथं अपत्य म्हणून जन्म झाला. हिरानंद यांना सहा मुलगे आणि एक मुलगी होती. (काहींच्या म्हणण्यानुसार सात मुलगे होते).
सतराव्या शतकाच्या मध्यात पोटापाण्यासाठी म्हणून हिरानंद बिहारला गेले. तिथं त्यांनी सॉल्टपेट्रेचा व्यवसाय करून पैसा कमावला. त्यातून कारखाना टाकला आणि ईस्ट इंडिया कंपनीला त्यावेळी बऱ्यापैकी पैसा दिला. माणिकचंद यांनी पुढं आपल्या वडिलांचा हा व्यवसाय सांभाळून त्या अनेक वाटा फोडल्या.
सावकारीचा व्यवसाय ही त्यातलीच एक वाट होती. पाटणा ते ढाका असा आपला व्यवसाय विस्तारात असताना माणिकचंद यांनी मुर्शिद कुली खान या बंगालच्या नवनियुक्त दिवाणाशी मैत्री केली. त्यांची ही मैत्री पुढं आयुष्यभर टिकली.
औरंगजेबानं या खानाची बंगालचा दिवाण म्हणून नेमणूक केली होती. प्रांताचा मुख्य महसूल अधिकारी, कर महसूल गोळा करणे आणि तो शाही राजधानीत सुरक्षितपणे पाठवणे या त्याच्या जबाबदाऱ्या होत्या. माणिकचंद यांची मुर्शिद कुली खानाला पुष्कळ मदत झाली होती. या दोघांनी मिळून राज्याच्या महसुलाची गळती थांबवण्याचा प्रयत्न केला होता.
माणिकचंद यांनी त्या वेळी बंगाल प्रांताला सर्वाधिक महसूल देणारा प्रांत बनवण्यास मदत केली होती. त्या वेळी त्यांच्या एकूण संपत्तीची किंमत अंदाजे १४ कोटी रुपये होती. जी आजच्या काळात बघायची झाली तर ४, ००० ते १०,००० कोटी रुपयांच्या मध्ये असू शकते.
अठराव्या शतकाच्या सुरुवातीला मुघल सम्राटानं त्यांना जगत सेठ म्हणजे जगाचा बँकर ही पदवी बहाल केली होती. माणिकचंद आणि त्यांच्या वारसांनी एकूण ५० वर्षं बंगालच्या आर्थिक बाजारपेठेवर राज्य केलं.
त्याची हवेली हे त्याकाळी आकर्षण असायचे.
मग त्यांच्या वारसांचं नंतर काय झालं?
साधारण ३०० वर्षांपूर्वी माणिकचंद बंगालचे बँकर होते. व्यापारी आणि राज्य यांच्यात जी युती होती, ती टिकेपर्यंत बंगाल हा त्यावेळी देशातला सगळ्यात श्रीमंत प्रांत होता. मात्र ही युती तुटल्यावर बंगाल आणि जगत सेठ एकत्रच रसातळाला गेले आणि ईस्ट इंडिया कंपनीनं भारतावर राज्य करण्यास सुरुवात केली.
बंगालमध्ये जेव्हा राज्य करण्याची संधी आली होती तेव्हा माणिकचंद यांचा उत्तराधिकारी मेहताब राय यानं ती संधी ईस्ट इंडिया कंपनीच्या पारड्यात टाकली. तो त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीला एक ग्राहक समजत होता. पण प्रत्यक्षात ईस्ट इंडिया कंपनी ही त्याची स्पर्धक होती.
काही ब्रिटिश रिपोर्टनुसार जगत सेठ यांच्या कुटुंबाकडं इंग्लंडच्या सगळ्या बँकांपेक्षा जास्त पैसे होते तर काही रिपोर्ट्सनुसार १७२० च्या दशकात ब्रिटिश अर्थव्यवस्था जगत सेठच्या संपत्तीपुढं लहान होती. पण हे कुटुंब रसातळाला जाण्याबाबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे इंग्रजांनी केलेला विश्वासघात!
जगत सेठने इंग्रजांना खूप मोठे कर्ज दिले होते; पण नंतर इंग्रजांनी जगतसेठचे ईस्ट इंडिया कंपनीवर कोणतेही कर्ज नाही असा स्पष्टपणे नकार दिला. हा या कुटुंबासाठी मोठा धक्का होता.
इसवी सन १९१२ पर्यंत या कुटुंबातील सेठांना ब्रिटीशांकडून जगतसेठ या पदवीमुळं काही प्रमाणात पेन्शन मिळत राहिली. मात्र नंतर ही पेन्शनही बंद झाली.
त्यानंतर या कुटुंबाची संपत्ती रसातळाला गेल्याचा उल्लेख आहे. अर्थात जगत सेठच्या मृत्युनंतर इतिहासातून हा अध्याय पुर्णपणे संपला.
—
- चुलत बहीणींशी लग्न करणारा, अरबोंच्या महालात राहणारा रंगेल आणि विक्षिप्त राजा!
- मुघल वंशातील शेवटची बेगम जगतीये कलकत्त्यात हलाखीचे जीवन!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.