एम.एफ हुसेन यांनी हिंदू देवतांची नग्न चित्रं रेखाटली आणि कतारने त्यांना नागरिकत्व दिलं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आखाती देशांना केवळ त्यांच्याकडे असलेल्या तेलाच्या साठ्यांमुळे जगात मान दिला जातो. जागतिक चलनात वरच्या स्थानावर असलेल्या या देशांनी वैद्यकीय किंवा क्रीडा किंवा माहिती व तंत्रज्ञान किंवा संशोधन क्षेत्रात जगाने दखल घ्यावी अशी कोणतीही कामगिरी आजवर केलेली नाहीये.
पर्यटनासाठी आकर्षण असलेलं युएई मधील दुबई हे शहर सोडलं तर आखातातील इतर सर्व देशांनी नेहमीच धर्माचा अतिरेक केला आहे आपणच इस्लाम धर्माचे रक्षक आहोत असं जगाला भासवलं आहे.
कतार या देशाने नुकतंच नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावरून तिथल्या भारतीय राजदूताला धारेवर धरलं होतं हे आपण वाचलंच असेल. पण, हे काहींना माहीत नसेल याच कतारने २०१० मध्ये आपल्या भारतीय ‘गजगामिनी’वाल्या एम. एफ.हुसेन ला हिंदू देवीचे नग्न चित्र काढल्यामुळे डोक्यावर बसवलं होतं.
कोणत्याही परदेशी नागरिकाला सहजपणे न मिळणारं कतारचं नागरिकत्व दिलं होतं. हे म्हणजे असं झालं की, “आमचा तो बाप्या, आणि तुमचं ते कारटं…”
नुपूर शर्मा यांचं व्यक्तव्य चुकीचं आणि आक्षेपार्हच होतं. पण, इतर वेळी अंतर्गत मतभेद असलेले इराण, इराक, कुवैत, कतार, सौदी अरेबिया, ओमान, युएई, जॉर्डन, अफगाणिस्तान, बहरीन सारखे १५ देश या विषयावर एकत्र येतात आणि भारताचा निषेध करतात हे बघणं जरा आश्चर्याचं होतं. जगात कित्येक ठिकाणी हिंदू देवतांची विटंबना होत असते. पण, तेव्हा किती हिंदू देश एकत्र येऊन त्या विरुद्ध बोलतात हा प्रश्न सुद्धा यावेळी पडल्याशिवाय रहात नाही.
नुपूर शर्मा यांना अल-कायदा या अतिरेकी संघटनेकडून येणाऱ्या आत्मघातकी धमक्या सुद्धा आखाती देशांना माहीत आहे. पण, त्याबद्दल आज कोणीही काहीच बोलत नाहीये हे देखील सत्य आहे.
सुसंस्कृतपणाची अपेक्षा या देशांकडून करणं हे पण चुकीचं आहे. कारण, युग बदलले पण ह्या देशांनी अजून आपल्या देशातील राजेशाही पद्धतीत कोणता बदल केला नाही यावरूनच त्यांच्या लेखी लोकांच्या मताचं असलेलं महत्व लक्षात येतं. “हा आमचा देश आहे आणि आम्ही असाच चालवणार” या तोऱ्यात या देशातील प्रशासन वागत असतं आणि भारत आणि इतर देशातील नागरिक तिथे जाऊन आयुष्यभर आपल्या सेवा देत असतात. पण, तरीही ते त्या देशाचे नागरिक बनण्यास पात्र होत नाहीत. “तुम्ही हिंदू धर्माविरुद्ध बोला, लिहा, चित्र काढा आणि कतारचं नागरिकत्व मिळवा” असा जणू या देशाचा अलिखित नियम असल्यासारखं एम.एफ.हुसेन यांना दिलेल्या कतारी नागरिकत्वावरून आपण म्हणू शकतो.
किती हा द्वेष? कोणताच धर्म इतर धर्माला कमी लेखा असं कधीच शिकवत नाही हे या स्वघोषित धर्मरक्षक देशांना कधी कळेल का एक प्रश्नच आहे.
२००६ या वर्षी फेब्रुवारी मध्ये एम. एफ. हुसेन हे ‘भारत माता’चं नग्न चित्र काढल्यानंतर भारतात होत असलेल्या बदनामीला कंटाळून कतारमध्ये पळून गेले होते. त्यांच्यावर भारतात एकूण ९०० ठिकाणी केसेस दाखल असतांना ते भारतातून कसे निसटू शकले? हा एक प्रश्नच आहे.
असं सांगितलं जातं की, हुसेन याने हिंदू देवतांचे अभद्र चित्र १९७० मध्ये काढले होते जे की, १९९६ मध्ये ‘द हिंदू’ या वर्तमानपत्रात प्रकाशित झाले होते.
कतारमध्ये जाऊन हा चित्रकार तिथली राणी ‘शेख मोझा’च्या आदेशावरून अरब देशांच्या इतिहासाबद्दलचे चित्र काढायचा. कतार मध्ये वास्तव्यास असतांना एम.एफ. हुसेनने काढलेले सर्व चित्र कतारची राजधानी ‘दोहा’ येथे एका संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आले आहेत.
२०१० मध्ये त्यांनी आपला भारतीय पासपोर्ट रद्द केला आणि वयाच्या ९४ व्या वर्षी कतारचं नागरिकत्व स्वीकारलं.
कोणताही कलाकार हा भावनिक असतो असं म्हणतात. पण, १९१५ मध्ये पंढरपूर येथे जन्म झालेल्या या चित्रकाराला ज्या देशात त्याचा जन्म झाला, ज्या देशाने त्यांच्या कलेचं इतकं कौतुक केलं, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं त्या देशाचं नागरिकत्व रद्द करतांना या कलाकाराला काहीच वाटलं नाही हे एक आश्चर्य आहे.
“नुपूर शर्मा यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक मत असून हे भारत सरकारचं मत नाहीये” हे कतार मधील भारतीय राजदूताने कतारच्या ‘फॉरेन मिनिस्ट्री’ला आधीच सांगितलं आहे. “या घटनेमुळे कतार मध्ये रहाणाऱ्या भारतीय नागरिकांविरुद्ध कतारने कोणताही गैरसमज बाळगू नये” अशी विनंती कतार मधील ‘एम्बेसी ऑफ इंडिया’ने केली आहे.
—
- सद्दामशी हातमिळवणी करणाऱ्या या अणूशास्त्रज्ञाने पाकिस्तानचीच प्रतिमा मलिन केली!
- इराकमध्ये अपहरण: मुंबईच्या पत्रकाराची चक्क अमिताभ बच्चनमुळे झाली सुटका!
—
२९ लाख इतकी लोकसंख्या असलेला कतार सारखा एखादा देश १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारताला एखाद्या प्रकरणावरून ऐकवू शकतो आणि माघार घेण्यासाठी भाग पाडू शकतो इतकी इस्लामबद्दलच्या धार्मिक बाबींची ताकत असते हे सध्या जग बघत आहे.
हे प्रकरण इथेच संपलं नसून या घटनेनंतर भारताचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू हे ५ जून २०२२ रोजी कतारला गेले होते. ‘शेख खालिद बिन खलिफा बिन अब्दुल अजीज अल सैनी’ या कतारच्या परराष्ट्र मंत्र्याची त्यांनी भेट घेतली होती. आपल्या पक्षाला, देशाला सर्व धर्माबद्दल असलेला आदर याची ग्वाही आपल्या भेटीत वेंकय्या नायडू यांनी कतारला दिली.
एम. एफ. हुसैन यांना न मागताही देशाचं नागरिकत्व देणाऱ्या कतारने भारताने या प्रकरणाची घेतलेली गंभीर दखल बघून हे प्रकरण इथेच थांबवावं अशी अपेक्षा सध्या कतार मधील भारतीय करत आहेत.
२००६ मध्ये दुबईत रहायला गेलेल्या एम.एफ. हुसेन हे त्यानंतर भारत सोडून इंग्लंड आणि इतर आखाती देशांमध्ये मुक्त विहार करायचे. ९ जून २०११ रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांचं लंडन येथील एका हॉस्पिटलमध्ये वृद्धापकाळाने निधन झालं होतं.
कतारचं हे दुटप्पी वागणं सध्या जरी भारताने खपवून घेतलं असलं तरीही याचं प्रत्युत्तर त्यांना कोणत्यातरी इतर मार्गाने मिळेल असं भारताच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्यांचं मत आहे.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.