' चिंताजनक! काश्मीरमध्ये पंडितांनंतर आता राजपूत झालेत अतिरेक्यांचे भक्ष्य! – InMarathi

चिंताजनक! काश्मीरमध्ये पंडितांनंतर आता राजपूत झालेत अतिरेक्यांचे भक्ष्य!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काश्मीरमधून कलम ३७० हटवणे असो की ‘मिशन काश्मीर’ चित्रपटाचे प्रदर्शन, काश्मीर सतत जिहादींच्या हीटलिस्ट वर राहिले आहे. सतत धगधगणाऱ्या काश्मिरमध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांचा रक्तरंजित इतिहास काही नवा नाही, मात्र याच भूमीत आता हिंदू समाजाला टार्गेट केलं जातंय. भविष्यातील धोका टाळायचा असेल अतिरेक्यांनी नेमकं हिंदूंविरोधात हत्यार का उगारलंय? याचा शोध घेतलाच पाहिजे.

कश्यप ऋषींच्या नावाने निर्माण झालेला हा प्रदेश कधीकाळी संस्कृत भाषेचे अधिपीठ होता. इतकेच नाही तर देवी शारदा हिचे निवासस्थान म्हणून लौकिकप्राप्त होता. कल्हण यांच्या राजतरंगिणी या ग्रंथात काश्मीरचा सांस्कृतिक, राजनैतिक इतिहास आपल्याला वाचायला मिळतो.

मूल दूर्गरा या शब्दापासून अपभ्रंश झालेल्या डोगरा राजवंशाची सत्ता या प्रदेशावर होती. १९४७ मध्ये शेवटचे राजे हरिसिंह यांनी आदिवासी समुहांच्या बंडाविरुद्ध तत्कालीन भारत सरकारकडे मदत मागितली मोबदल्यात त्यांना स्वतंत्र भारतात सामील होण्याच्या करारावर सही करावी लागली. इथे एका गोष्टीला ट्विस्ट मिळाला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

काश्मीर पाकिस्तानचा हिस्सा असावे असा पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा मनसुबा होता जो या कराराने उधळला गेला. याचाच परिणाम आजवर कश्मीरला भोगावा लागला आहे. यात भरडल्या जाणार्‍यांमध्ये सामान्य जनता, राजघराणे, अमीर उमराव असा कोणताच भेद राहिला नाही.

 

kashmir im 1

 

स्वातंत्र्यानंतर झालेल्या फाळणीने होत्याचे नव्हते झाले. त्यानंतर सारी संस्थाने भारतात विलीन झाल्याने राजसत्ता संपली तशी घराणी देखील विभागली गेली. या डोगरा राजवंशाची एक शाखा ‘ जमवाल’. ज्यांच्या पूर्वजांची रावी नदीकाठाला सत्ता होती. हा परिवार स्थलांतरित होत होत पहाडी इलाख्यात स्थिरावला आणि आज काश्मीरमध्ये अल्पसंख्यांक हिंदू म्हणून गणला जातो.

काश्मिरी पंडितांवर केल्या गेलेल्या अत्याचाराच्या घटना सुरूच आहेत पण आजवर या राजपूत समाजाकडे अतिरेक्यांनी कधी नजर वळवली नव्हती पण गेल्या काही महिन्यातील घटना पाहता अतिरेक्यांनी आपला अजेंडा बदलला आहे असे वाटते. हे सगळे लिहिण्यामागचे कारण म्हणजे राजपूत जमवाल वंशाच्या सतीश सिंह या पेशाने ड्रायव्हर असलेल्या राजपुताची अतिरेक्यांनी केलेली हत्या!

काकरन हे गाव दक्षिण काश्मीरमधील पीर पंजाल टेकड्यांमध्ये वसलेले आहे. दहशतवाद्यांची फॅक्टरी म्हणून ओळखले जाणारे, खोऱ्यात रक्तपाताचा सामना होत असतानाही कुलगाम जिल्ह्यातील हे गाव दहशतवादापासून अस्पर्श राहिले. हजारो काश्मिरी पंडित रातोरात घर सोडून गेले होते, त्यानंतरही जवळपास ८० घरांच्या या गावात काहीही झाले नाही.

या गावात फक्त ८ घरे हिंदू राजपूतांची होती, बाकीची मुस्लिम घरे. ती आठ घरे आजवर सुरक्षित होती .मात्र आता या गावात हिंदूंची हत्या होत आहे. हे पंडित नाहीत, राजपूत आहेत.

याच वर्षी १३ एप्रिलला दहशतवाद्यांनी सतीश सिंह यांची हत्या केली होती. सतीश सिंह यांची बहीण मीना सिंह जामवाल सांगते की,  ”अतिरेक्यांनी राजपूत ड्रायव्हरच्या केलेल्या हत्येमुळे कुलगाम जिल्ह्यातील काकरन गावातील या लहान समुदायाच्या सदस्यांमध्ये भीती आणि अनिश्चिततेची भावना निर्माण झाली आहे, आपण इतके अनामिक आहोत की इथले सरकारही आपल्याला ओळखत नाही. मग दहशतवाद्यांना आमची माहिती कशी काय?

 

kashmir im

 

खोऱ्यात हिंदू राजपूतही आहेत, हे बहुधा सरकारी आकडेवारीतही नाही. हे लोक जामवाल राजपूत आहेत. दाव्यानुसार ते काश्मीरचे शेवटचे शासक राजा हरिसिंग यांचे वंशज आहेत.

सतीश हा ट्रक चालक होता. त्याची वृद्ध आई, दोन मुली आणि पत्नीची जबाबदारी त्याच्यावर आहे. एक मुलगी अपंग आहे. ते दहशतवाद्यांच्या गोळ्यांचे लक्ष्य बनले, पण सरकारने त्यांच्या कुटुंबाला मदत केली नाही. घराबाहेर सुरक्षेसाठी पोलिस बसले होते. आता तुम्हीच सांगा, घरीच राहिलो तर काम कसं करणार, असं नाही केलं तर उपाशी मरणार असा सवाल तेथिल नागरिक विचारतात.

काश्मीर खोर्‍यातील अल्पसंख्याक समुदायांच्या सदस्यांवर लक्ष्यवेधी हल्ले होत असताना बुधवारी संध्याकाळी सतीश कुमार सिंग यांची त्यांच्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेचा सिंग यांच्या मुस्लिम शेजाऱ्यांना धक्काच बसला. हल्ला करण्यासाठी, एकट्या अतिरेक्याने ‘इफ्तार’ची वेळ निवडली,

जेव्हा मुस्लिम शेजारी रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास सोडण्यासाठी मशिदींमध्ये प्रार्थना करण्यात व्यस्त होते. सिंह यांचे शेजारी अब्दुल रेहमान यांनी संगितले की “आम्ही रात्रीचे जेवण किंवा काहीही घेतले नाही. संपूर्ण गावात शोककळा पसरली. सिंग एक सज्जन होते,” सिंह यांचा अंतिम संस्कार सार्‍या गावाने मिळून केला.

बुधवारी उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील वीरान गावात एक “धमकी” पत्र प्रसारित करण्यात आले. लष्कर-ए-इस्लामी या अज्ञात संघटनेच्या वतीने काश्मिरी पंडित रहात असलेल्या गावाला धमकावण्यात आले होते.

 

terrorist inmarathi

 

गेल्या एका महिन्यापासून, काश्मीरमधील धार्मिक अल्पसंख्याक सदस्यांवर आणि स्थलांतरित कामगारांवर झालेल्या हल्ल्यांमुळे पुन्हा एकदा अल्पसंख्याक आणि गैर-स्थानिकांमध्ये भीती आणि दहशत निर्माण झाली आहे. काश्मिरी भाषिक हिंदूंच्या ८०० हून अधिक कुटुंबांप्रमाणे काश्मीरमध्ये राहिलेला राजपूत समुदाय आता सुरक्षित ठिकाणी जाण्याचा विचार करत आहे. कुलगाम जिल्ह्यात सुमारे ४० राजपूत कुटुंबे आहेत ज्यात काकरानमधील आठ कुटुंबे आहेत,

१९९६-२०१८ या कालावधीत कुलगाम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे सीपीआय(एम) नेते मोहम्मद युसूफ तारिगामी यांनी सांगितले की, या भागातील राजपूत समाजाला लागोपाठच्या सरकारांनी दुर्लक्षित केले आहे. “काश्मिरी स्थलांतरितांसाठीच्या पंतप्रधान पॅकेजमध्येही कुलगाममधील राजपूत समुदायाला वगळण्यात आले. या कुटुंबांना त्यांच्या उन्नतीसाठी पॅकेजमध्ये समाविष्ट करण्यासाठी मी पंतप्रधानांना पत्र देखील लिहिले होते, परंतु अद्यापपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही,”

१९४७ मध्ये फाळणी होण्यापूर्वीपासून राजपूत कुटुंबे कुलगाममध्ये राहत आहेत. यावेळी घाटीत टार्गेट किलिंगचा टप्पा सुरू असताना त्यात आणखी किमान ३ राजपूतांनाही गोळ्या घातल्या गेल्या आहेत. दोघे कुलगामचे असून शोपियातील एक मजूर राजपूत ठार झाला.

आमच्यातील कोणी मारला गेला तरी त्याला काश्मिरी पंडितांच्या नावाखाली दाबवले जाते. जणू काश्मीर मध्ये दुसरे हिंदू नाहीतच असे चित्र उभे केले जाते. असे तेथिल राजपुत सांगतात.

 

kashmiri pandit inmarathi 5

 

काश्मीरमध्ये वाढत्या टार्गेट किलिंगच्या संख्येत असहाय्य वाटणाऱ्या या समाजासमोर गरिबीची समस्या आधीच होती, पण मृत्यूची भीती कधीच नव्हती. मात्र, आता खोऱ्यातील बदलत्या वातावरणात त्यांच्यासमोरही स्थलांतराचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.

हिंदूंना त्रास देणारी अशी कोणतीही दहशतवादी संघटना अस्तित्त्वात नसून आम्ही खबरदारी घेतो असे पोलिसांनी सांगितले. काहीही असो सतीश सिंह याची हया हे नव्याने तयार झालेल्या हिमनगाचे टोक तर नसेल ना?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?