Site icon InMarathi

वेडी की खुळी?! स्वतःशी लग्न…लगेच दुसऱ्याच्या प्रेमात पडून स्वतःबरोबरच घटस्फोटसुद्धा…!

cris galera im feature

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हल्ली  स्वेच्छेने सिंगल राहायचा निर्णय घेणारे अनेकजण दिसतात. पण एखादी व्यक्ती जर वरकरणी स्वतःवर प्रेम असल्याच्या, स्वतःला स्वीकारल्याच्या, सिंगल राहून खुश असल्याच्या बाता करत असेल आणि ते साजरं करायला चक्क स्वतःशीच लग्न करत असेल तर ती केवळ दिखाऊपणासाठी केलेली मूर्खपणाची कृती ठरते.

भारतातल्याच क्षमा बिंदू नावाच्या एका मुलीने आपल्याला जोडीदार नकोय पण लग्न करायचंय असं म्हणत स्वतःशीच लग्न केल्याचं वृत्त इतक्यातच समोर आलं होतं.

 

 

ब्राझीलमधल्या साओ पाऊलो इथल्या क्रिस गलेरा या ३३ वर्षीय फॅशन मॉडेलने या वर्षाच्या सुरुवातीला स्वतःशीच लग्न केलं होतं.

क्रिस गलेराने आपल्याला एकाच जोडीदारावर अवलंबून राहायचा कंटाळा आल्याने आपण स्वतःशीच लग्न करून खुश आहोत असं याआधी म्हटलं होतं, पण आधीचा मूर्खपणा कमी म्हणून आता तिने आणखीनच चक्रावून टाकणारा प्रकार केलाय. तिला कुणीतरी खास व्यक्ती सापडलीये आणि ती त्या व्यक्तीच्या प्रेमात पडलीये त्यामुळे आता तिने स्वतःशी घटस्फोटही घेतलाय.

आज घटस्फोटाच्या बाबतीत पूर्वीसारखा संकुचितपणे विचार केला जात नाही. दोन व्यक्तींचं एकमेकांशी पटत नसेल तर त्यांनी वेगळं व्हायचं ठरवून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेण्यात कुणाला काही गैर वाटत नाही, पण क्रिसने मुळात स्वतःशी लग्न करण्याचाच घेतलेला निर्णय इतका निरर्थक होता की त्यात तिने घटफोट घेतलाय हे कळल्यावर हसावं की रडावं हे कळत नाही. काय आहे ही सगळी भानगड? जाणून घेऊ.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

क्रिसने स्वतःशी लग्न करायचा निर्णय घेतला तेव्हा ती म्हणाली होती, “मी प्रगल्भतेच्या टप्प्यावर पोहोचले. आपण कणखर आणि करारी स्त्री आहोत असं माझ्या लक्षात आलं. मला कायमच एकटं राहण्याची भीती वाटायची, पण स्वतःविषयी चांगलं वाटून घ्यायला मी शिकलं पाहीजे हे माझ्या लक्षात आलं. जेव्हा ते घडलं, तेव्हा मी ते साजरं करण्याचं ठरवलं.”

तिच्या लग्नाच्या दिवशी साओ पाऊलोमधल्या एका कॅथलिक चर्चसमोर तिने आपले फोटोज काढले. तिने एक सुंदरसा व्हाईट ड्रेस घातला होता. मण्यांचा नेकलेस घातला होता आणि फोटोतून आपले टॅटूज ती लोकांना दाखवत होती.

 

 

आपल्या लग्नाचे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, “मी जागी झालेय. हो लोकहो, हे खरंय! मी सोलोगॅमीयाच्या लाटेवर स्वार झाले आणि स्वतःशी लग्न करायचं ठरवलं. मी माझं स्वतःवरचं प्रेम साजरं करतेय आणि बाकी महिलांना स्वाभिमान वाढवण्यासाठी मला प्रेरणा द्यायचीये! ही फॅशन लोकप्रिय होईल याचं तुम्हाला कधी आश्चर्य वाटलं होतं का?!”

ती पुढे म्हणाली, “हा हा.. या बातमीचे ब्राझीलमध्ये आणि ब्राझीलबाहेरही परिणाम झाले?… माझ्याशी लग्न करण्याची इच्छा असलेल्या हजारो पुरुष आणि स्त्रियांचे मला जगभरातून मेसेजेस येत आहेत… हे लज्जास्पद आहे, कारण इतक्यात मी माझ्याशी घटस्फोट घेणार नाहीये… सोलोगॅमी म्हणजे काय हे माहित नसणाऱ्यांसाठी सांगते, यात व्यक्ती स्वतःशीच लग्न करते… मला आता सगळ्यांनी माझं अभिनंदन करायला हवं आहे!”

ती तिच्या लग्नाच्या दिवशी आनंदी असली तरी तिला या सगळ्यामुळे बरंच ट्रोल केलं गेलं, पण यातूनही शहाणी होणारी ती नव्हतीच. आपल्याला तिरस्कारयुक्त प्रतिक्रिया देणाऱ्यांकडे आपण लक्ष देणार नाही आणि यापुढे आपण तिरस्कारयुक्त कमेंट्स वाचणार नाही.

‘मी काय विचार करते यात लोकांच्या मतांमुळे काही बदल होणार नाही आणि भरही पडणार नाही’ असं ती त्यावेळी म्हणाली होती.

 

 

या बयेने लोकांना असं जाहीर निवेदन दिलं खरं, पण त्यानंतर लगेचच तिच्या या तथाकथित स्वप्रेमाचा तिला कंटाळा आला की काय? कारण, स्वतःशी लग्न करून जेमतेम ३ महिने झाले नाहीत तर ती एका खास व्यक्तीला भेटली आणि त्या व्यक्तीच्या ती प्रेमात पडल्यामुळे तिने स्वतःशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

आपल्या घटस्फोटाविषयी ‘डेली स्टार’शी बोलताना ती म्हणाली, “जोपर्यंत मी स्वतःशी लग्न केलं होतं तोवर मी खुश होते.” ती म्हणाली, “ज्या क्षणी मी एका खास व्यक्तीला भेटले त्याक्षणी माझा प्रेमावर विश्वास बसला.”

सारासार विचार करून सिंगल राहण्याचा किंवा नात्यात येण्याचा, लग्न करण्याचा निर्णय घेतला तर त्याला अर्थ असतो. एखादी व्यक्ती एकटी राहतेय याचा अर्थ ती मनाने कणखर असावी असा एक समज असतो, पण अनेक सिंगल व्यक्तीही मनाने कमकुवत असू शकतात आणि आपली स्वतंत्र ओळख जपत नात्यात असणाऱ्याही अनेक व्यक्ती असतात.

ज्यांना हा फरक समजूनच घ्यायचा नसतो , स्वतःशीच लग्न करून आपण कणखर आहोत या भ्रमात राहायचं असतं आणि लोकांना तसं भासवण्याचा प्रयत्न करताना स्वतःचंच हसं करून घायचं असतं त्यांच्यादृष्टीने लग्न काय किंवा घटस्फोट काय, दोन्हीला काहीच किंमत नाही. त्यांच्याकडे दुर्लक्षच करणं योग्य ठरतं. क्रिस आणि तिच्यासारखा मूर्खपणा करणाऱ्यांना देव सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version