फिरायला जात असाल तर पॅकिंगच्या या ७ टिप्स लक्षात ठेवाच, प्रवास सुखाचा होईल
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कामाच्या भाऊगर्दीतून ब्रेक हवा असेल किंवा रोजच्या त्याच त्याच जीवनशैलीचा उबग आला असेल तर बदल म्हणून आपण फिरायला जायचे बेत आखतो. अर्थात हे फिरणे कधी रीतसर नियोजन करून ठरविलेले असते तर कधी आले मनात, निघाले बॅग पॅक करून असे असते.
फिरणे कितीही चांगले असले तरी, बऱ्याच लोकांना बॅग भरण्याचा प्रचंड कंटाळा येत असतो, नेमकं काय भरायचे समजत नाही. मग कधी गरजेपेक्षा जास्त तर कधी कमी सामान भरले जाते.
जर थोडेसे नियोजन करून नीट बॅग भरण्याची सवय लावली तर कमी जागेत देखील व्यवस्थित सामान राहू शकते. यासाठी काही खास टिप्स लक्षात घ्या.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
१) यादी करण्याची सवय बाळगा – तुमची सहल किती दिवसांची आहे त्यानुसार प्रथम लागणाऱ्या सामानाची नीट यादी करा. त्यात कपडे, औषधे, चप्पला, चार्जर्स किंवा तत्सम स्वरूपाच्या इलेक्ट्रोनिक वस्तू अशा सर्व गोष्टींची यादी करा.
कपडे म्हटले की त्यात फक्त कपडेच येत नाही, तर रुमाल, टॉवेल पासून ते घालण्याचे कपडे अशा सर्व गोष्टींचा त्यात समावेश होतो.
औषधांच्या बाबतीत ही तेच. रोजची औषधे, वेदनाशामक औषधे, प्रथमोपचाराची औषधे अशा सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यानुसार मेडिकल कीट तयार ठेवावा .
२) बॅगेची योग्य निवड करा – दरवेळेला सुटकेस घेऊन जाणे जरुरीचे असतेच असे नाही. आजकाल बॅगेमध्ये तऱ्हेतऱ्हेचे पर्याय उपलब्ध झालेले आहेत.
छोट्या प्रवासाची गरज लक्षात घेऊन त्यानुसार डिझाईन केलेल्या बॅगा बाजारात पहायला मिळतात. यामध्ये सध्या बॅगपॅक हा प्रकार लोकप्रिय ठरत आहे. विशेष म्हणजे यात कमी जागेत बऱ्याच गोष्टी मावतात आणि पाठीवर उचलायला ही सहज सोपे होते.
३) कपड्यांची योग्य निवड करा – कपडे निवडताना तुम्ही जिथे जाणार आहात तिथले हवामान प्रथम तपासा. त्यानुसार कपड्यांची निवड करा.
बऱ्याच लोकांना तेच च्या तेच कपडे घालायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मिक्स अॅण्ड मॅच चा पर्याय अवलंबू शकता किंवा एक-दोन जीन्स घेऊन त्यावर वेगवेगळी स्टाईल करू शकता.
जर थंडीच्या ठिकाणी जाणार असाल तर गरम कपड्यांची चळत न बांधता उबदार असणाऱ्या जाकीटचा पर्याय घ्यावा. जेणेकरून फार उबदार कपडे घ्यावे लागणार नाही.
बाजारात लाईट वेट जाकीट परवडण्याजोग्या किंमतीत सहज मिळतात. विचारपूर्वक कपड्यांची निवड केल्यास अर्धे काम होईल.
४) योग्य पादत्राणे निवडा –
फिरायला जाताना बहुतांश वेळेला लोक शूज आणि स्लीपर यांच्याच जोड्या घेऊन जातात, पण फिरायला जाणार म्हणजे आपण नेमके काय करणार आहोत, जसे ट्रेकिंग करणार आहोत की नुसतेच चालणार आहोत या गोष्टी लक्षात घ्या, मग त्यानुसार चपलांची निवड करा.
टीटोज, सॅण्डल या देखील प्रवासात आरामदायी ठरतात. गरज लक्षात घेऊन पादत्राणे निवडा.
५) योग्य कीट बनवा –
साबण, शाम्पू , टूथपेस्ट, ब्रश अशा गोष्टी वेगळ्या न ठेवता एका पाऊच मध्ये या गोष्टी नीट ठेवा. शाम्पू अथवा बॉडीवॉशच्या बाटल्या न घेता सॅशे वापरा. यामुळे वजन ही वाढत नाही आणि गोष्टी ही सुटसुटीत राहतात.
हीच गोष्ट मेकअपचे सामान आणि औषधांच्या बाबतीत ही लागू होते. आवश्यक गोष्टींचे कीट बनवून ते पाऊच मध्ये ठेवल्यास कमी जागेत बऱ्याच गोष्टी ठेवता येतात.
६) इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निवड –
आजकाल मोबाईल हाच सर्वसर्वा असल्यामुळे कॅमेरा, लॅपटॉप या सर्व गोष्टी घेऊन जाण्याची गरज नसते. त्यामुळे जर खरोखरीच या गोष्टींची गरज असेल तरच सोबत न्या. या गोष्टी नेताना चार्जर मात्र आवर्जून न्या.
—
- हॉटेल बुकिंग करण्यापेक्षा जगातील ही सुंदर बेटं भाड्याने घ्या आणि सुट्टीचा आनंद लुटा…
- भारतातील या सुंदर ७ जागा, फॉरेन लोकेशन्सला देखील देतात टक्कर!
—
७) योग्य कागदपत्रे बाळगा – प्रवास करताना बऱ्याचदा तुमची ओळख पटविण्यासाठी काही महत्वाची कागदपत्रे सोबत बाळगावी लागतात. जसे आधार कार्ड,पासपोर्ट आदी.
या गोष्टी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सेव करून ठेवू शकतात, पण कधी कधी गरज म्हणून त्या प्रत्यक्षात बाळगाव्या लागतात. तर त्यासाठी बाजारात छोट्या फाईल्स स्वरुपात मिळणाऱ्या पाकिटांचा वापर करू शकतात. जेणेकरून तुमची कागदपत्रे सुरक्षित राहतात आणि मागितल्यास सहजपणे काढता ही येतात.
जर या छोट्या, पण महत्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन नियोजन करून प्रवासाची तयारी केल्यास प्रवास करणे अधिक रंजक होऊ शकेल. त्याचा कंटाळा येणार नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.