Site icon InMarathi

नसिरुद्दीन शहांची तक्रार : बॉलिवूडची खान मंडळी पैगंबर मुहम्मद यांच्या अवमानावर गप्प का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजकाल लोकांच्या संवेदनशीलतेत खूपच वाढ झालेली दिसते. कोणत्याही गोष्टीवर एकदम टोकाची मत मतांतरे होताना दिसतात. कधी कधी कुठलाही वाद इतका टोकाला जातो की ट्रोलर्स त्या एकाच मुद्द्याला इतकं लावून धरतात की नुसती रणधुमाळी उडते आणि संबंधित व्यक्तीला एकतर पदसिद्ध अधिकारी असेल तर तिथून पायउतार व्हावं लागतं किंवा भूमिगत व्हावं लागतं.

नुकतीच नुपूर शर्मा यांच्या प्रेषित मुहम्मद यांच्यावरील वक्तव्याने त्यांना त्याचे प्रवक्ते पद सोडायची वेळ आलेली आपण पहिली. त्यांनी माफी मागितली पण या वाद विवादात मुस्लीम राष्ट्रांनी उडी घेतली. सर्व आखाती देश, मालदीव अफगाणिस्तान, वगैरे सर्व मुस्लीम राष्ट्रांनी या त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला.

 

 

अगदी भारतीय जनता पक्षाने त्यांना पक्षातून निलंबित देखील केलं आहे. पण तरीही हा वाद काही शमायचं लक्षण दिसत नाही. आता ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दिन शाह यांनी देखील या वादग्रस्त विषयात विधाने केली आहेत. काय म्हणतात नसिरुद्दीन शाह?

त्याआधी पाहूया हे नुपूर शर्मा काय प्रकरण आहे?

नुपूर शर्मा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय पक्ष प्रवक्ता होत्या. सध्या संपूर्ण देशात खळबळ उडवून टाकणारे ज्ञानवापी प्रकरण सुरु आहे. शुक्रवारी २७ मे रोजी एका वाहिनीवर चर्चेच्या कार्यक्रमात नुपूर शर्मा यांनी वक्तव्य केले की, आजकाल हिंदू धर्माच्या ज्या धर्मिक आस्थेच्या गोष्टी आहेत त्याचा काही लोक जाणीवपूर्वक अपमान करतात.. खिल्ली उडवतात. अशा धर्माचा त्याच्या मान्यतांचा मी पण अपमान करू शकते. त्यावर नमुन्यादाखल त्यांनी काही इस्लामी रीतीरिवाज सांगितले. आणि त्यावरून सर्व मुस्लीम कट्टरपंथीय लोकांत संतापाची लाट उसळली.

कानपूरमध्ये यावरून आंदोलन केलं गेलं त्यांच्यावर टीकेची झोड उठली. मग त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. पक्षाने हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगून हात वर केले. नुपूर शर्मांनी सर्व समुदायाची बिनशर्त माफीही मागितली आहे. पण तरीही हा वाद सारखा उफाळतो आहे.

आता यामध्ये जेष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी पण उडी घेतली आहे. ते म्हणतात सरकारने या विरोधात जे काही केले ती कारवाई अगदी नाममात्र आहे. आणि तीपण उशीरा केली आहे. त्यांनी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे की, त्यांनी हे जातीयवादाचे विष वाढू नये म्हणून काहीतरी केले पाहिजे. त्यांनी हरिद्वार येथील धर्मसंसदेत जे काही वक्तव्य केले त्यानुसार त्यांनी काहीतरी केले पाहिजे. या लोकांना योग्य समज मिळायला हवी.

 

 

नुपूर शर्मा या कुणी साधारण व्यक्ती नाहीत, त्या पक्ष प्रवक्त्या आहेत. त्यामुळे त्यांनी बोलताना तोल सुटू द्यायचा नव्हता. पण एकंदरीत जी भडकाऊ विधाने केली जातात त्यासाठी प्रसार माध्यमे पण तितकीच जबाबदार आहेत.

या विषयावर बॉलीवूडमधील सलमान खान, शाहरुख खान, सैफ अली खान या मंडळींनी पण काहीतरी बोलायला हवे. पैगंबराच्या अवमानावर खान लोक एकही अक्षर बोलेलेले नाहीत आणि हे चूक आहे. त्यांनी यावर काहीतरी बोलायला हवे.

नसिरुद्दीन शाह असेही म्हणतात, खान लोकांकडे बरेच काही आहे. ते गमवायची त्यांना भीती आहे, माझ्याकडे असे काहीही नाही. म्हणून मी बोलू शकतो. त्यांनीही बोलले पाहिजे.

मंडळी, आजवरचा इतिहास पाहता अशा विवादास्पद मुद्द्यांवर कोणीही अभिनेता कधीही बोलायला आलेला तुम्हाला आठवतो का?

त्रयस्थ नजरेने या प्रकरणाकडे पाहिले तर, नुपूर शर्मा यांनी असे अवमानकारक वक्तव्य करायला नको होते. हे बरोबर आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या पक्ष प्रवक्तेपदी असता तेव्हा तुमच्या वैयक्तिक मताला काहीही अर्थ नसतो. तिथे शब्द शब्द जपूनच बोलावा लागतो. पण एकंदरीत धार्मिक तेढ वाद होतात , जेव्हा इतर समुदाय जसे हिंदू दैवतांची टिंगल करतात तेव्हा कुणीही त्याकडे इतक्या गांभीर्याने बघताना दिसत नाही.

नसिरुद्दीन शाह यांना वाटते की खान कंपनीने यावर काहीतरी बोलावे तर ते यावर बोलतील ही अपेक्षा करणंदेखील चूक आहे. कारण धर्म आणि मनोरंजन या दोन्ही गोष्टी अतिशय विभिन्न आहेत. आजवर या खान मंडळीना जनतेने त्यांच्या धर्माच्या पलीकडे जाऊन प्रेम दिलेले आहे. त्यांची लोकप्रियता केवळ मुस्लीम समुदायात नाही. सर्व धर्मीय लोकही त्यांचे चाहते आहेत.

 

 

धर्म हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विश्वासाचा भाग असतो. आणि अभिनेत्यांनी राजकारण आणि अभिनय याची सरमिसळ करायचा प्रयत्न केला तर त्यातून फक्त द्वेष ट्रोलिंग हेच वाढताना दिसते. त्यामुळे आमीर, सलमान, सैफ या मुद्द्यावर मौन धारण करून आहेत. त्यांना जर बोलायचेच असते तर हे प्रकरण झाल्याबरोबर त्यांनी काहीतरी वक्तव्य केले असते.

आज जवळजवळ १४ दिवस झाले पण यांच्यापैकी कुणीही काहीही बोललेले नाही यातच काय ते सगळं आलं.

नसिरुद्दीन शाह मात्र यापूर्वी अनेकदा अशाच मुद्द्यांवरून ट्रोल झाले आहेत. मग ते मुघल हे निर्वासित होते हे विधान असेल, गोहत्येबद्दल विधान असेल, दिलीप कुमार यांच्या बाबत विधान असेल, अनुपम खेर यांच्याबाबत केलेले विधान अशा विविध मुद्द्याला हात घालून लोकांची नाराजी त्यांनी ओढवून घेतली आहे. खान मंडळी ते करतील का?

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version