Site icon InMarathi

अवघ्या ५ दिवसात ७५ किमीचा रस्ता बनवत भारताने कतारला देखील मागे टाकले

gadkari 2 im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रस्त्यांची दुर्दशा हा महाराष्ट्रासाठी नेहमीचाच प्रश्न झालाय. रस्त्यांची बांधणी व्यवस्थित न केली गेल्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडण्यापासून रस्ते इतके खडकाळ होतात की त्यावर वाहन चालवणंच कठीण होऊन बसतं अशा एक ना अनेक समस्या निर्माण होत असतात.

रस्तेबांधणीकरता सरकारकडून पुरेसा निधी पुरवला गेला तरी रस्त्यांची दुरवस्था का होत असावी? रस्तेबांधणी करणारे कामगार कामात कुचराई करतात आणि ठिकठिकाणच्या शासकीय अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर वचक नसतो का? कामगारांच्या कामाकडे ते जातीने लक्ष देत नसावेत का? असे प्रश्न आपल्याला पडतात.

 

dnaindia.com

 

आता पावसाळा येणार म्हणजे रस्त्यांच्या या कच्चा बांधकामामुळे ठिकठिकाणी पाणी साचणं, खड्डे पडणं आलंच. महाराष्ट्रात रस्त्यांची अशी दैन्यावस्था आहे हेच चित्र आपल्या मनात आजवर पक्कं झालेलं आहे. आपण त्यावरून वेळोवेळी प्रशासनाला नावंही ठेवतो. पण याच वस्तूस्थितीला फाटा देणारी एक सुखद गोष्ट इतक्यातच घडलीये.

३ जून ते ७ जून या अवघ्या ५ दिवसांच्या कालावधीत NH 53चा भाग असलेल्या अमरावतीच्या लोणी गावापासून ते अकोल्याच्या माना गावापर्यंतच्या विभागात तब्बल ७५ किलोमीटर्सचा रस्ता बनवण्यात आलाय. रस्ता वाहतूक आणि महामार्गाचे केंद्रीय मंत्री असलेल्या नितीन गडकरी यांनी बुधवारी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

इतकंच नाही, तर या रस्त्याने कतारचा विक्रम मोडून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नवा विक्रम रचला आहे. हा रस्ता बांधण्यात कुणाकुणाच्या सहयोग होता? रस्ताबांधणीसाठी त्यांनी नेमकी कशी तयारी केली होती? जाणून घेऊ या सगळ्याविषयी.

कशी केली गेली होती रस्ताबांधणीची तयारी?

‘नॅशनल हायवे असोसिएशन ऑफ इंडिया’ NHAI ने ‘राजपथ इंफ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड’च्या सहयोगाने हा रस्ता उभारण्याची कौतुकास्पद कामगिरी गेली आहे. राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पुण्यात बांधकाम क्षेत्रात दमदार कामगिरी करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. आपल्याला जागतिक विक्रम करायचाय हे धेय्य डोळ्यांसमोर ठेवूनच या रस्ता बांधणीची जय्यत तयारी केली गेली होती.

 

 

प्रत्येक भागासाठी वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली. एकूण ७२८ जणांच्या या टीममध्ये प्रोजेक्ट मॅनेजर्स, हायवे इंजिनियर्स, क्वालिटी इंजिनियर्स, सर्व्हेअर्स, सेफ्टी इंजिनियर्स आणि बाकी कामगार होते. प्रचंड मोठी यंत्रसामग्री होती. त्या यंत्रांमध्ये बिघाड होऊ नये म्हणून त्यांच्यावर देखरेख ठेवायला ५ इंजिनियर्स आणि टाटा मोटर्सच्या आणखी ५ अधिकाऱ्यांची साईटवर नेमणूक केली गेली होती.

३ जूनला सकाळी ७.२७ला रस्तेबांधणीचं हे काम सुरू झालं आणि ७ जूनला संध्याकाळी ५ वाजता संपलं. खनिजयुक्त काँक्रीटचा हा तब्बल ७५ किलोमीटर्सचा रस्ता १०५ तास आणि ३३ मिनिटांत पूर्ण झाला.

कतारच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डलाही टाकलं मागे  :

हे बांधकाम पूर्ण झाल्यावर नितीन गडकरी यांनी ट्विटरवर लेखी स्वरूपात या सगळ्या टीमचं कौतुक केलं आहे आणि यासंदर्भात व्हिडियोही शेअर केला आहे. संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं त्यांनी म्हटलंय. २०१९ साली २७ फेब्रुवारीला कतारमधील दोहा येथे १० दिवसांत २५.२७५ किलोमीटरचा सगळ्यात लांबलचक रस्ता बनवला गेल्याचा विक्रम गिनीज बुक मध्ये केला गेला होता.

 

 

NH ५३ च्या भागात अमरावती ते अकोला या जिल्ह्यांदरम्यान ५ दिवसांत जो ७५ किलोमीटरचा रस्ता NHAI आणि राजपथ इंफ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेडने तयार केला त्याने कतारचा हा जुना रेकॉर्ड तोडला असल्याची माहिती गडकरी यांनी दिली आहे.

अमरावती आणि अकोल्याचा हा विभाग नॅशलन हायवे ५३ चा भाग आहे आणि एक महत्त्वाचा पूर्व-पश्चिम कॉरिडॉर आहे असं गडकरी म्हणाले. हा विभाग कलकत्ता, रायपूर, नागपूर, अकोला, धुळे, सुरत अशा महत्त्वाच्या शहरांना जोडतो अशीही माहिती गडकरींनी दिली.

देशाला समर्पित :

देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांनी या भव्य महामार्गाच्या बांधकाम प्रकल्पाला ‘गती-शक्ती’ असं नाव देऊन तो लॉन्च केला. देशातील लोक, माल आणि सेवांच्या वाहतुकींना अखंडपणे जोडणारं काहीतरी असावं असा हा प्रकल्प सत्यात उतरवण्यामागचा हेतू होता. ‘आझादी का अमृतमहोत्सव’चं औचित्य साधून राजपथ इंफ्राकॉनने हा महामार्ग देशाला समर्पित करण्याचं ठरवलं.

 

शरद पवारांना शिव्या घाला, पण त्यांच्यासारखी “विद्या”नगरी कुणीच उभारली नाही, मान्य करा!

रुळांवर माणसे दिसत असून देखील चालक ट्रेन का थांबवू शकत नाहीत?

पाचही दिवस कामगारांनी अहोरात्र काम करून या रस्त्याची उभारणी केली आहे. नेमकं ध्येय्य, त्यासाठी आवश्यक अशी पद्धतशीरपणे आखलेली योजना, योग्य कामगारांची नेमणूक, आवश्यक त्या यंत्रसामग्रीची उपलब्धता आणि प्रचंड मेहनत घ्यायची तयारी या सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर काय किमया घडू शकते याचाच प्रत्यय आपल्याला यातून येतो. बुद्धी आणि बल दोन्हींचा वापर करून हा महामार्ग तयार करणाऱ्या संपूर्ण टीमला सलाम!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version