आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कॅन्सर, एक असा आजार ज्याचं नाव काढलं तकरी काळजात धस्स होतं, पुढील महागड्या आणि वेदनादायी उपचारांची कल्पना करूनच घाम फुटतो, आणि एवढं सगळं सोसूनही जीव वाचेल की नाही? याची शाश्वती नसते. अनेक घरांनी आजपर्यंत हा दाह सोसला आहे, मात्र आता केवळ औषधांच्या साथीने कॅन्सरवर विजय मिळता येणार असल्याचा एक आशेचा किरण नुकताच समोर आला आहे. हा शोध नक्की कुणी लावला? हा नवा प्रयोग काय आहे? भारतीयांना याचा लाभ घेता येईल का? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात.
सध्या संशोधन क्षेत्रात काही आश्चर्यजनक प्रयोग सुरू होते. त्यातून नुकताच स्टेम सेल्स च्या मदतीने अनेक गंभीर आजारांवर उपचार होवू शकतो किंवा वराहाचे हृदय माणसामध्ये प्रत्यारोपित करता येईल असे काही महत्वाचे संशोधन केले गेले त्यामधला एक महत्वाचा टप्पा आहे कर्करोगावरील उपचार आणि त्यादृष्टीने होणारे संशोधन!
जगभरात कर्करोगाच्या रुग्णांची कमी नाही. हा असा आजार आहे ज्यावर आजतागायत कोणतेही अचूक उपचार किंवा औषध सापडलेले नाही. कॅन्सरच्या रुग्णांना बरे करण्यासाठी विज्ञान अजूनही उपाय शोधत आहे. या आजारामुळे जगभरात दरवर्षी लाखो लोकांचा जीव जातो. पण, आता सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी आली आहे.
जिथे गुदाशयाच्या कर्करोगाने ग्रस्त रुग्ण आता बरे होऊ शकतात. कोलन कॅन्सरच्या मुख्य लक्षणांपैकी एक म्हणजे मुलमुत्राव्दारे रक्त येणे. याशिवाय गुदद्वाराच्या भागात खाज येणे, लालसरपणा येणे ही त्याची लक्षणे आहेत.
गुदाशय हा शरीराच्या व्यापक पचनसंस्थेचा एक भाग आहे. अहवालानुसार, गुदाशय कर्करोगासाठी एकूण जगण्याचा दर ६३ टक्के आहे. तर गुदामार्गातून न पसरलेल्या कर्करोगांमध्ये तो दर ९१ टक्के आहे.
पण रेक्टल कॅन्सरशी झुंज देत असलेल्या एका ग्रुपसोबत एक चमत्कार घडला आहे. प्रयोग म्हणून एका उपचारात या रुग्णांचा कर्करोग पूर्णपणे बरा होऊन त्यांना नवजीवन मिळाले.
या छोट्या क्लिनिकल चाचणीमध्ये १८ रुग्णांचा समावेश होता ज्यांना सहा महिन्यांसाठी ‘डॉस्टारलिमॅब’ नावाचे औषध देण्यात आले होते. सहा महिन्यांनंतर या सर्वांचा कर्करोग पूर्णपणे बरा झाला.
औषध-विज्ञान शास्त्रात हा एक मोठा चमत्कार मनाला जात आहे. या संशोधनामुळे कर्करोगाच्या इतर प्रकारांवर मात करण्याची आशा संशोधकांमध्ये निर्माण झाली आहे. तेव्हा चला आपणही जाणून घेवू या संशोधनाबद्दल.
अहवालानुसार, क्लिनिकल ट्रायलमध्ये सामील असलेल्या रुग्णांना कर्करोगापासून मुक्त होण्यासाठी पूर्वी दीर्घ आणि वेदनादायक उपचार केले जात होते. जसे की केमोथेरपी, रेडिएशन आणि शस्त्रक्रिया तथापि, गटातील १८ रुग्ण, हे त्यांच्या उपचारातील पुढचे पाऊल आहे असा विचार करून चाचणीत सामील झाले होते.
त्यानंतर त्यांना हे जाणून खूप आश्चर्य वाटले की आता त्यांना आणखी उपचारांची गरज नाही. क्लिनिकल ट्रायल्सच्या या निकालाने वैद्यकीय जगतालाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅलिफोर्निया विद्यापीठातील कोलोरेक्टल कॅन्सर तज्ज्ञ डॉ. अॅलन पी. वेणूक म्हणाले की या गटातील १८ रुग्ण आता पूर्णपणे बरे झाले आहेत, जे ‘अभूतपूर्व’ आहे. उपचारादरम्यान या सर्व रुग्णांमध्ये चाचणी औषधाचे दुष्परिणाम दिसून आले नाहीत. त्यामुळे हे संशोधन जागतिक दर्जाचे आहे.
चाचणी दरम्यान सर्व रुग्ण कर्करोगाच्या एकाच टप्प्यावर होते. ज्यांना सहा महिन्यांसाठी दर तिसऱ्या आठवड्यात औषध दिले जात होते. कर्करोग रुग्णाच्या गुदाशयात पसरला होता, परंतु त्याचा इतर अवयवांवर परिणाम झाला नाही.
या औषधाचा आढावा घेणाऱ्या कर्करोग संशोधकांच्या मते, ही उपचारपद्धती आशादायक वाटत असली तरी त्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाचणी आवश्यक आहे. जेणेकरुन हे औषध इतर रुग्णांमध्ये तितकेच प्रभावी आहे की नाही आणि कर्करोग बरा होऊ शकतो की नाही याची पुष्टी करता येईल. मात्र, या प्रयोगामुळे लोकांमध्ये आणि वैद्यकीय क्षेत्रात आशेची लाट निर्माण झाली आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे की या चाचणीमध्ये औषध म्हणून वापरले गेलेले ‘Dostarlimab’ एक प्रायोगिक औषध आहे. ते पर्यायी प्रतिपिंड म्हणून कार्य करते. हे Gemperly या ब्रँड नावाखाली विकले जाते. युनायटेड स्टेट्स आणि युरोपियन युनियनमध्ये २०२१ मध्ये औषध वैद्यकीय वापरासाठी मंजूर करण्यात आले.
या औषधाच्या दुष्परिणामांमध्ये उलट्या, सांधेदुखी, खाज, पुरळ, ताप इ. चा समावेश आहे मात्र, कर्करोगाने बरे झालेल्या रुग्णांमध्ये अशी कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत.
गुदाशयाचा कॅन्सर असलेल्या सर्व रुग्णांना समान औषध देण्यात आले. उपचाराचा परिणाम असा झाला की सहा महिन्यांनंतर, सर्व रूग्णांचा कर्करोग पूर्णपणे नाहीसा झाला होता जो एंडोस्कोपीसारख्या शारीरिक तपासणीद्वारे शोधला जाऊ शकत नव्हता.
मोठ्या स्तरावर हा प्रयोग यशस्वी झाला तर कर्करोगाचा सामना करणार्या अनेक रुग्णांसाठी ते वरदान ठरेल आणि तो औषध विज्ञान शास्त्रातील मोठा चमत्कार असेल जो भविष्यातील नवनव्या संशोधनाच्या पाऊलवाटा निर्माण करेल हे नक्की!!!
—
- आईच्या कॅन्सरची बातमी ऐकून मुलाने स्वतःच्या व्यवसायात केला हा मोठा बदल!
- कॅन्सर उपचारांमध्ये जीवघेण्या केमोथेरपीची आता गरज नाही, संशोधकांचा दावा
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.