Site icon InMarathi

“त्या म्हाताऱ्यापेक्षा मी चांगला आहे” म्हणत अरबी माणसाने अंबर हर्डला घातली लग्नाची मागणी

amber heard featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेल्या काही काळापासून जॉनी डेप आणि अंबर हर्ड यांच्या घटस्फोटाच्या खटल्यामुळे जगभरात वातावरण तापलंय. अंबर हर्डने घटस्फोटाचा अर्ज खरंतर २०१६ मध्येच दाखल केला होता. मात्र हे प्रकरण न मिटता या दोघांनी एकमेकांवर केलेल्या नव्या आरोपांमुळे आणखीनच चिघळत गेलं. अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे सुरू असलेल्या या खटल्यात जॉनीने अंबरवर तिने आपली मानहानी केली असल्याचा दावा केला होता.

या मानहानीच्या खटल्यात जॉनीची वकील कॅमिली वासक्वेझ हिने कोर्टात अंबरची अक्षरश: बोलती बंद केलेली सगळ्यांनी पाहिली. इतक्यातच या मानहानीचा खटल्यात कोर्टाने अंबरची हार घोषित केली आहे. अभिनेत्री असलेली आणि घटस्फोटाच्या या खटल्यामुळे चर्चेत आलेली अंबर आता एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलीये.

अंबर मानहानीची केस हरल्यानंतर तिला चक्क लग्नाची मागणी आलीये. सौदी अरेबियातल्या एका इसमाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिला यासंदर्भात व्हॉइस नोट पाठवून लग्नाची मागणी घातली आहे.

 

 

“जॉनी डेप या म्हाताऱ्यापेक्षा मी बरा” असं त्याने त्यात म्हटलंय. ही व्हॉइस नोट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. नेमकं काय आहे हे प्रकरण? जाणून घेऊ.

एकमेकांना बरीच वर्षं डेट केल्यानंतर जॉनी डेप आणि अंबर हर्डने २०१५ साली लॉस एंजेलिसमधल्या त्यांच्या घरात अगदी खासगीपणे लग्न केलं होतं. मात्र, २०१६ मध्ये २३ मे ला अंबर हर्डने जॉनी डेपविरोधात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. गेली अनेक वर्षं घटस्फोटाचा हा खटला सुरू आहे. गेल्या काही काळापासून हा खटला पुन्हा नव्याने सुरू होऊन जगभरात टेलिकास्ट होतोय. हा घटस्फोटाचा खटला पूर्णतः संपायला अजून अवकाश आहे.

मात्र, व्हर्जिनियाच्या फेअरफॅक्स कोर्टात ६ आठवडे चाललेल्या मानहानीच्या केसचा इतक्यातच निकाल लागला आणि कोर्टाने आपला कौल जॉनीच्या बाजूने दिला. अंबरने आपली मानहानी केल्याचा दावा जॉनीने केला होता आणि आपण घरगुती शोषणाची बळी ठरल्याचं अंबर म्हणाली होती.

 

 

अंबरच्या विरोधात जॉनी ५० मिलियन डॉलरची ही मानहानीची केस जिंकली. ज्युरींनी जॉनीला नुकसानभरपाई म्हणून १५ मिलीयन डॉलर्स दिले. जॉनीने आपलं घरगुती शोषण करून आपली बेअब्रू केल्याचा आरोप अंबरने त्याच्यावर केला होता. जॉनीच्या आधीच्या वकिलांनी अंबरचे हे आरोप खोटे असल्याचं म्हटलं होतं. या केसमध्ये अंबर विजयी झाली होती आणि ज्युरींनी तिला २ मिलियन डॉलर्स नुकसानभरपाई दिली होती.

जॉनीविरोधात मानहानीची केस हरल्यानंतर अंबरला मानहानीबद्दल जॉनीला १० मिलियन डॉलर्स द्यावे लागणार आहेत.

अंबर ही केस हरल्याच्या काहीच दिवसांनंतर एका सौदी अरब इसमाने तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर तिला एक व्हॉइस नोट पाठवून तिला चक्क लग्नाची मागणी घातली आहे. “अंबर तुला सगळे दरवाजे बंद झाल्यानंतर माझ्याव्यतिरिक्त तुझी काळजी घेईल असं दुसरं कुणी उरलेलं नाही.

काही लोक तुझा तिरस्कार करतात आणि तुझा छळ करतात हे माझ्या निदर्शनास आलंय. म्हणून, मी तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. अल्लाह आपल्या दोघांना आशीर्वाद देवो. तू म्हणजे ईश्वरी कृपा आहेस. पण लोकांना त्याची कदर नाही. त्या म्हाताऱ्या माणसापेक्षा (जॉनी डेपपेक्षा) मी चांगला आहे.”, असं त्या व्यक्तीने त्या व्हॉइस नोटमध्ये म्हटलंय.

 

 

Bee4andafter_kw असं नाव असलेल्या अकाऊंटवरून ही व्हॉइस नोट पोस्ट केली गेलीये. ही पोस्ट केली गेल्यानंतर अवघ्या तीनच दिवसात तिला १,५६,४०१ व्ह्यूज मिळाले.

ही व्हॉइस नोट व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. “जॉनी डेपला नुकसानभरपाईची भलीमोठी रक्कम देण्याचे आदेश कोर्टाने ज्या अंबर हर्डला दिलेत तिच्याशी लग्न करण्यासाठी एक सौदी इसम आतूर आहे हे आश्चर्यकारक आहे. हे केवळ अभिनेत्रीच्या जखमेवर मीठ चोळणं आहे. बाकी काही नाही.”, असं एका व्यक्तीने म्हटलंय.

“हे भीतीदायक आहे.”, असं दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटलंय. तर अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये हसण्याच्या ईमोजीज टाकल्या आहेत. जॉनीच्या चाहत्यांनी या निमित्ताने अंबरला खिजवायची संधी सोडली नसून तो सौदी अरेबियन इसम तिला जॉनीला १० मिलियन डॉलर द्यायला मदत करू शकेल असं त्यांनी म्हटलंय.

बऱ्याच वृत्तांनुसार, कोर्टाने दिलेल्या निर्णयाला अंबर आवाहन करणार असल्याचं समजतंय. या एकूणच खटल्याची आधीच इतकी चिरफाड झालेली असताना त्यात भरीस भर म्हणून अशी बातमी समोर येणं हा केवळ लोकांच्या मनोरंजनाचा विषय ठरला तरी नवल नाही.

एखाद्या चित्रपटापेक्षाही नाट्यपूर्ण झालेला हा खटला आणखी किती काळ चालेल, मीडियाला आणि लोकांच्या चर्चांना किती काळ खुराक पुरवत राहील हे येणारा काळच ठरवेल.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version