केवळ कंटाळा आला म्हणून या पठ्ठ्याने थेट ३ करोडच्या नोकरीवर पाणी सोडलंय!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मित्रांनो तुम्ही अभिनेता सलमान खान याचा काही वर्षांपूर्वी आलेला ‘किक’ हा सिनेमा नक्कीच पाहिला असेल ज्यात तो सतत “वो काम मै नाही करता जिसमे मुझे किक नाही मिलती” असे म्हणताना दाखवला आहे. मित्रांनो अशाच एका व्यक्तीने किक मिळत नाही म्हणू चक्क ३.५ करोड रुपये पॅकेज असलेली नोकरी सोडली. बरोबर! वाचून तुमचे डोळे विस्फारले ना? पण हे खरे आहे.
कामात समाधान, आनंद मिळत नव्हता या कारणासाठी त्याने चक्क मनोरंजन विश्वातील ‘A HUGE CHERRY’ सोडून दिली. कोण आहे ही वल्ली? त्याने असे का केले असावे? इतकी चांगली हाय पॅकेज ची नोकरी सोडण्याची वेळ त्याच्यावर का आली असावी? चला जाणून घेऊया.
२०१७ मध्ये अमेझॉनमधील नोकरी सोडल्यानंतर मायकेल लीन याने बिग एन्टर्टेनिंग प्लॅटफॉर्म ‘नेटफ्लिक्स’ जॉईन केले. जिथे वार्षिक ३.५ कोटी रुपयांचे पॅकेज त्याला मिळाले होते. त्याच बरोबर पगारी रजा, फ्री कॅंटीन सुविधा अशा काही सवलती देखील त्याला मिळाल्या होत्या.
नेटफ्लिक्ससारख्या कंपनीत काम करणे हे स्वप्नवत असते असे लीन याला सुरवातीला वाटत होते. असा ड्रीम जॉब का सोडला याचे कारण सांगताना लीन म्हणाला की, नेटफ्लिक्स सोबत काम करताना सुरवातीला खूप काही नवीन शिकायला मिळाले. हे म्हणजे एखाद्या MBA प्रोजेक्टवर काम करत असताना मिळालेल्या आर्थिक मोबदल्यासारखे होते.
सुरवातीला त्यांनी सर्व कर्मचार्यांना निर्णय प्रक्रियेत सोबत घेतले आणि प्रत्येक नवीन कामाची प्रोसीजर आम्हाला सांगण्यात येत असे, पण कालांतराने त्यात तोचतोचपणा येवू लागला. नवीन काही करण्यास वाव देखील नव्हता. कंपनी आपल्या पॉलिसी बदलण्यास तयार नव्हती,त्यामुळे नवीन कल्पना राबवल्या जात नव्हत्या.
त्याच दरम्यान संपूर्ण जगावर प्रभाव टाकणार्या कोविडचा शिरकाव झाला आणि सगळ्याच गोष्टी बदलत गेल्या. लिनने प्रथम नेटफ्लिक्समध्ये उत्पादन व्यवस्थापकाची भूमिका मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु तसे करण्यात अयशस्वी झाल्यानंतर, त्याने हळूहळू काम करण्याची सर्व प्रेरणा गमावली.
त्याच्या कामगिरीच्या पुनरावलोकनात, त्याला काम करायचे असल्यास “स्वतःला पुन्हा सिद्ध करावे लागेल” असे त्याला सांगितले गेले. त्याचा जीवन आणि कामाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यावर साथीच्या रोगाचा महत्त्वपूर्ण परिणाम झाला.
लिनने कबूल केले की नोकरी त्याच्या सर्व भत्त्यांसह त्याला सुरवातीच्या काळात इंप्रेसिव्ह वाटली होती, परंतु कोविड-१९ साथीच्या रोगानंतर, काम करण्यातली मजा संपली कारण पगार तर मिळत होता पण भत्त्यांमध्ये यापुढे कोणतेही सोशल लाईफ किंवा सहकारी सोबत नव्हते,फक्त काम आणि कामच शिल्लक राहिले होते.
दरम्यान, नेटफ्लिक्सने संपूर्ण कंपनीतील १५० कर्मचाऱ्यांना मेमो दिला होता. हॉलिवूड रिपोर्टरच्या अहवालानुसार, नेटफ्लिक्सच्या एकूण कर्मचार्यांपैकी दोन टक्के कर्मचारी कपातीचे बळी ठरले. हे देखील नोंदवले गेले आहे की सर्वात जास्त टाळेबंदी यूएस मध्ये होत आहे.
अहवालात असेही म्हटले गेले आहे की नेटफ्लिक्सने स्ट्राँग ब्लॅक लीड, गोल्डन, कॉन टोडो आणि मोस्ट यासह सोशल मीडिया आणि प्रकाशन चॅनेलवर काम करणाऱ्या ६० ते ७० कंत्राटदारांना कामावरून कमी केले आहे.
नेटफ्लिक्सने पहिल्या तिमाहीत दीर्घकालीन सदस्य गमावल्यानंतर आणि दुसऱ्या तिमाहीत सुमारे २ दशलक्ष सदस्य गमावल्यानंतर ही टाळेबंदी झाली, दोन महिन्यांत कंपनीने केलेल्या कपातीची ही दुसरी फेरी होती.
त्याच्या निर्णयावर सर्वप्रथम आक्षेप घेणारे त्याचे पालकच होते. त्याच्या गुरु ने देखील त्याला नोकरी न सोडण्याचा सल्ला दिला. तरीही, सुमारे तीन दिवसांनी, लिनने नेटफ्लिक्स मधील नोकरी सोडली. आता त्याने आपला व्यवसाय सुरू केल्यामुळे त्याला, तो समाधानी असल्याचे जाणवत असल्याचा दावा त्याने केला आहे.
—
- विश्वास बसणार नाही, पण महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्याचा साखरपुडा चक्क जेलमध्ये झाला होता
- “नोकरी करतो, राजकारण नाही. वर्दीवर जाऊ नका” पोलिसाने आमदाराला सुनावले होते! पहा व्हिडीओ..
—
तो म्हणाला की तो आता स्वत:साठी काम करण्याच्या कल्पनेशी पूर्णपणे वचनबद्ध आहे आणि जरी त्याने नुकतीच सुरुवात केली असली आणि अद्याप त्याच्याकडे उत्पन्नाचा “विश्वसनीय” प्रवाह नसला तरीही, सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा त्याचा खूप सकारात्मक दृष्टीकोन आहे.
मित्रांनो, कोणाला कशाची किक असते तर कोणाला इतर कशाची… पण आपल्याला ज्यातून समाधान मिळते तीच गोष्ट करण्यात शहाणपणा असतो हेच लीनच्या उदाहरणातून सिद्ध होते.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.