' अत्यंत महत्वपूर्ण! सुंदर हस्ताक्षराचा परिणाम थेट आरोग्यावर!! – InMarathi

अत्यंत महत्वपूर्ण! सुंदर हस्ताक्षराचा परिणाम थेट आरोग्यावर!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्याला लहानपणी सुंदर हस्ताक्षर काढण्याची कायम सक्ती होत होती. अक्षर वाईट असेल तर शिक्षा होत असत असंही काही ऐकण्यात आल्याचं आठवत आहे. आता मात्र सुंदर हस्ताक्षर हा एक छंद म्हणून राहिला आहे.

कॅलिग्राफीसारखं तंत्र वापरून अनेक जण त्यांचं सुंदर हस्ताक्षर अधिक सुंदर आणि आकर्षक बनवून लोकांसमोर ठेवतात. आजच्या या डिजिटल युगात लिखावटीपेक्षा लिखाणाला आणि त्याहीपेक्षा फोटो, व्हिडिओला जास्त महत्त्व आलेलं आपल्याला दिसत आहेच.

पूर्वी अनेकजण शाळेत असताना हौसेनं शाईपेन घ्यायचे ते लिहिण्यासाठी म्हणून. काही वात्रट लोक शाईची फेकाफेकी करण्यासाठी म्हणून हे पेन वापरायचे ही गोष्ट वेगळी, पण ज्याचं अक्षर चांगलं असायचं त्याच्याकडं सगळे लोक आदरानं बघायचे हेही तितकंच खरं.

सध्या मीमच्या जमान्यात हस्ताक्षरावरून सगळ्यात जास्त ट्रोल होणारी व्यक्ती असेल तर ती म्हणजे डॉक्टर. डॉक्टरांचं हस्ताक्षर काळात नाही अशी अनेकांची तक्रार असते. त्यावर अनेक विनोदही होताना सगळ्यांनी ऐकले, वाचले असतीलच, पण असं म्हणतात की हस्ताक्षर त्याचंच वाईट असतं, ज्याच्या विचारांच्या स्पीडशी हात बरोबरी करू शकत नाही.

बुद्धिमान लोकांचं हस्ताक्षर वाईट असतं अशी अनेक उदाहरणं आहेत, मात्र याला अपवाददेखील पुष्कळ आहेत. मात्र याच्यासारख्याच काही ऐकिवात असलेल्या गोष्टी निश्चितच खऱ्या आहेत. त्या तर आपण पाहूया, शिवाय सुंदर हस्ताक्षर असण्याचे फायदे आणि अक्षर सुंदर, वळणदार कसं असावं याबाबतच्या काही टिप्सही आपण पाहणार आहोत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

सुंदर हस्ताक्षराचा इतकं महत्त्वाचं का आहे?

१. मेंदूचा विकास होण्यास मदत होते-

जी गोष्ट सुंदर असते, ती आपले डोळे आणि मेंदू प्रसन्न ठेवण्यास मदतच करते. लहान मुलांनासुद्धा ते लिहायला सुरुवात करतात तेव्हा सुंदर अक्षर काढण्याचाच आग्रह केला जातो.

एवढेच नव्हे तर त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांनाही चांगलेच अक्षर काढावे लागते. या चांगल्या अक्षरामुळे मुलांचा मेंदू विकसित होण्यास ते लहान असतानाच सुरुवात होते.

२. लेखनकौशल्य सुधारते-

 

handwriting im

 

ही गोष्ट खूप साहजिक आहे. कारण एखाद्या व्यक्तीने जर सुवाच्य अक्षरात एखादी गोष्ट लिहिली तर तीच गोष्ट पुनः पुन्हा वाचविशी वाटते. याचं कारण आशयापेक्षाही अक्षर हेच आहे. सुंदर अक्षर वाचकालाही आकर्षित करतं.

चांगलं आलेलं अक्षर पाहून लिहिणाऱ्या व्यक्तीची लिहिण्याची इच्छा आणखी वाढते. साहजिक जास्त लिहिल्यामुळे लेखनकौशल्य सुधारते.

३. चांगलं हस्ताक्षर आत्मविश्वास वाढवतं-

चांगले हस्ताक्षर असलेल्या व्यक्तीला जास्त यश मिळते. ती तिच्या कामात अधिक कॉन्फिडन्ट होऊ शकते. म्हणूनच, आपण असे म्हणू शकतो की कधीकधी चांगले हस्ताक्षर यशाची गुरुकिल्ली बनू शकते.

४. व्यक्तिमत्व विकासात मदत होते-

हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे, की ज्यांचे हस्ताक्षर चांगले असते त्यांचे व्यक्तिमत्व चांगले असते. त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो. त्यांची महत्त्वाकांक्षा, त्यांचे ध्येय मोठे असते.

५. चांगली नोकरी मिळविण्यात मदत-

सध्याच्या युगात हे कितपत योग्य आहे ते निश्तिपणे सांगता येत नाही, पण अशा अनेक कंपन्या आहेत ज्या वैयक्तिक मुलाखत घेण्यापूर्वी लेखी परीक्षा घेतात.

कंपन्या हस्तलेखन विश्लेषक नियुक्त करतात. या तज्ज्ञ लोकांमध्ये त्यांच्या हस्ताक्षरावरून व्यक्तीला न्याय देण्याची क्षमता असते. ते फक्त त्यांचे हस्ताक्षर पाहून किंवा त्यांचे शब्द किंवा त्यांच्या मजकुरातील नीटनेटकेपणा पाहून त्या व्यक्तीच्या गुणांचा अंदाज लावतात. इथे चांगले हस्ताक्षर असलेल्या व्यक्तीचा नक्कीच फायदा होतो.

पण हे हस्ताक्षर सुंदर होण्यासाठी काय केलं पाहिजे?

 

handwriting im1

 

१. आपण लिखाणासाठी जे साहित्य वापरतो ते व्यवस्थित आहे की नाही हे सर्वप्रथम तपासलं पाहिजे. काही लोक सांगतात की शाईपेन वापरल्यानं अक्षर चांगलं येतं. पण शाईपेन सगळ्यांना वापरता येईलच असं नाही.

ज्यांना वेगानं लिहिण्याची सवय असते त्यांनी जेलपेन वापरावा किंवा पेन्सिल वापरावी असा सल्ला दिला जातो. हस्ताक्षर चांगलं हवं असेल तर सुरुवातीच्या काळात बॉलपेन वापरू नये असा सल्लाही दिला जातो.

त्याचबरोबर आपल्याला कोणते साहित्य योग्य प्रकारे वापरत येईल याचाही विचार आपण केला पाहिजे. उगाच दुसरा कोणीतरी मस्त पेन वापरतो आहे म्हणून आपणही ते वापरायला जाऊ नये.

२. कोणतेही लिखाण करण्याआधी ताठ बसलं तर अक्षर सुंदर येण्यास अधिक मदत होते. काही जण आडवं पडून लिखाण करतात. मात्र अशा पोझिशनमध्ये अक्षर चांगले येत नाही. सुंदर हस्ताक्षर हवे असल्यास टेबल आणि खुर्चीचा वापर आवश्यक आहे.

३. लिहिताना दुसऱ्या हाताचा वापर हा वही किंवा कागद धरण्यासाठी केला तर ग्रीप चांगली पकडता येऊ शकते, तसेच लिहिण्याआधी आपल्याला पेनावरील पकड कशी हवी आहे ते ठरवून घ्यावे. पेन पकडताना फार ढिली किंवा घट्ट असू नये. अति घट्ट पकड असेल तर बोटे दुखण्याची शक्यता आहे.

४. लिखाण करताना वेगात लिहिणे शक्यतो टाळावे. वेगात लिहीत असताना अक्षरांचे वळण बिघडण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे सुरुवातीला हळूहळू लिहावे आणि त्याचवेळी अक्षरांचे वळण आणि त्यांच्यामधील अंतराकडे लक्ष द्यावे.

५. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सराव. कोणतीही गोष्ट ही सरावाविना पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळं सुंदर आणि वळणदार हस्ताक्षर काढताना सुरुवातीला कंटाळा आला तरीही प्रयत्न सुरू ठेवलेच पाहिजेत, त्याला पर्याय नाही.

काही लोकांचं अक्षर आधीच खूप सुंदर असतं. पण ज्यांचं नसतं त्यांनाही वळणदार हस्ताक्षर काही सोप्या टिप्सचा वापर करून काढता येऊ शकतं हे आता आपल्याला समजलं आहे. त्यामुळं कोणावर इम्प्रेशन मारण्यासाठी नव्हे तर स्वतःसाठी वळणदार हस्ताक्षर काढूया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?