चक्क सलीम खान यांच्या ‘फ्लॉप’ सिनेमावर बेतलाय घईंचा ‘राम लखन’ हा सिनेमा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
एखादा चित्रपट सुपरहिट ठरला, की त्याचा रिमेक होणं ही गोष्ट काही नवी नाही. गेल्या काही काळापासून साऊथ इंडस्ट्रीने एकूणच जो दबदबा निर्माण केलाय त्यामुळे एका पेक्षा एक हिट साऊथ इंडियन चित्रपटांचे हिंदी आणि बाकी भाषांमध्ये रिमेक होताना दिसत आहेत आणि तेही तुफान हिट ठरत आहेत.
पूर्वी सुपरहिट ठरलेल्या काही चित्रपटांचे आजच्या प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार बदल करून रिमेक केले जातात. प्रसिद्ध पुस्तकांवरदेखील हल्ली चित्रपट, वेबसिरीज काढल्या जातात.
एखाद्या फ्लॉप ठरलेल्या चित्रपटाचा रिमेक करण्याचं एखाद्या दिग्दर्शकाने ठरवलंय आणि त्या रिमेक केलेल्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई झाल्याचं तुम्ही कधी ऐकलंय?
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
१९८९ साली ‘राम लखन’ हा चित्रपट आला तेव्हा त्याची चांगलीच हवा झाली होती. अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, माधुरी दीक्षित आणि डिम्पल कपाडिया यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘राम लखन’ या चित्रपटातची कथा, त्यातले डायलॉग्ज, गाणी लोकांनी डोक्यावर घेतली होती. त्या वर्षी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा तो दुसरा चित्रपट ठरला होता.
चित्रपटाची इतकी लोकप्रियता पाहून अनेकांना या चित्रपटाचा रिमेक बनवायची इच्छा आहे. पण हे अजून तरी घडलेलं नाही. एकेकाळी इतका गाजलेला हा चित्रपट खरंतर एका फ्लॉप चित्रपटावर बेतलेला होता हे आज कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही, पण वस्तुस्थिती हीच आहे.
सुभाष घईंचा ‘राम लखन’ हा चित्रपट चक्क सलीम खान यांनी लिहिलेल्या ‘फलक’ या चित्रपटावर बेतलेला आहे. ‘फलक’ चित्रपटाच्या कथानकावरून सुभाष घईंनी ‘राम लखन’ चित्रपट बनवण्याचं ठरवलं त्यामागचा किस्सा नेमका काय आहे? जाणून घेऊ.
झालं असं, की १९८८ साली प्रसिद्ध लेखक सलीम खान यांनी ‘फलक’ नावाचा चित्रपट लिहिला होता. शशीलाल के. नायर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. दोन भाऊ आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतात अशी चित्रपटाची कथा होती.
या चित्रपटात जॅकी श्रॉफ आणि शेखर कपूर यांनी दोन भावांच्या भूमिका केल्या होत्या. शेखर कपूर यांनी यात पोलिसांची भूमिका केली होती.
मुंबईतील सांताक्रूझमधील ‘लाईट बॉक्स’ येथे सलीम खान यांनी या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन केलं होतं. इंडस्ट्रीतली अनेक मंडळी या स्क्रीनिंगला आली होती.
चित्रपटातल्या दमदार डायलॉग्जची बऱ्याच जणांनी वाहवा केली, पण चित्रपट फारच संथ गतीने पुढे जाणारा आहे यावर सगळ्यांचं एकमत झालं.
चित्रपटाची कथा सलीम खान यांनी लिहिली असली तरी चित्रपटाचे डायलॉग्स सलीम-जावेद या जोडगोळीने लिहिले होते. चित्रपटातले डायलॉग्ज जरी मस्त असले तरी एकूण चित्रपट निकृष्ट दर्जाचा ठरला. त्यावेळी त्या स्क्रीनिंगला दिग्दर्शक सुभाष घईदेखील उपस्थित होते.
घई यांचे विधाता, कर्मा, कर्झ, हिरो असे चित्रपट त्यावेळी चांगलेच गाजल्यामुळे ते यशस्वी दिग्दर्शक ठरले होते. ते सलीम खान यांना भेटले आणि आपल्याला चित्रपट आवडला नाही मात्र चित्रपटाची संकल्पना आवडली असं त्यांनी त्यांना सांगितलं.
चित्रपटाची पटकथा आपल्याला खूप निरस वाटली मात्र चित्रपटाच्या कथानकाचं आपल्याला कमर्शिअल व्हर्जन बनवायचं आहे असं सुभाष घईंनी सलीम खान यांना सांगितलं. सलीम खान यांनी यावर काहीच हरकत घेतली नाही.
त्यानंतर वर्षभराने म्हणजेच १९८९ मध्ये सुभाष घईंनी ‘राम लखन’ हा चित्रपट बनवला. दोन भावांविषयीच्या या चित्रपटात मोठा भाऊ पोलीस असतो आणि ते दोघे आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतात.
हिंदी चित्रपटसृष्टीत ‘राम लखन’ हा सिनेमा व्यावसायिक चित्रपटांचा वस्तुपाठ समजला जातो इतकं घवघवीत यश या चित्रपटाच्या वाट्याला आलं होतं.
—
- आपल्याकडे प्रत्येक चित्रपट शुक्रवारीच का रिलीज होतो?
- आईच्या स्वप्नातून उभा राहीला ‘निळ्या’ भूमिकांचा चित्रपट – जगभरात कमावला सर्वाधिक गल्ला
—
‘कन्टेन्ट इज द किंग’ असं म्हटलं जातं. पण कधीकधी चांगलं कथानक असलं तरी ते व्यावसायिक ढाच्यात कसं बसवायचं याचं कसब सगळ्या दिग्दर्शकांकडे असतंच असं नाही. प्रेक्षकांची नस ओळखून त्यांना जे हवंय ते देता येण्यासाठी वेगळी हुशारी लागते.
घईंच्या पारखी नजरेने ‘फलक’ हा चित्रपट पाहून प्रेक्षकांना मजा येणार नाही मात्र सलीम खान यांनी लिहिलेल्या या चित्रपटाचं मूळ कथानक चांगलं आहे हे हेरलं आणि आपली व्यावसायिक कौशल्यं वापरून मूळ चित्रपटाचा चेहरामोहराच बदलला. दोन्ही चित्रपटांचं कथानक तसं सारखंच होतं, पण घईंच्या वेगळ्या दृष्टिकोनाने त्याला चार चाँद लावले.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.