Site icon InMarathi

महाराष्ट्रात “भैय्यां”वरून गोंधळ होतोय – तिकडे उत्तरप्रदेशात अख्खं गाव मराठी आहे!

bithoorr up im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

”महाराष्ट्रात जिकडे तिकडे युपीवाले लोक येऊन राहिले, ते त्यांची भाषा बोलतात. मराठी बोलत नाहीत” असे विविध तक्रारीचे सूर येतात. हे भय्ये आले आणि आपले लोक बेकार झाले असं जरी म्हणत असले तरीही तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे? हे भय्ये लोक आपल्याकडे विस्कटून राहतात पण उत्तरप्रदेशात एक संपूर्ण गाव मराठी आहेत. बसला का धक्का?

मराठी आणि हिंदी भाषक वाद आता तसा नवा राहिलेला नाही. आपल्या महाराष्ट्रात येऊन उत्तर प्रदेशातील भय्या लोकांनी कसा जम बसवला, अगदी दूध देण्यापासून, कपडे इस्त्री करणं, भाजी विकणं, फर्निचर बनवणं अशी सारी कामे हे लोक करतात. कोणतेही काम करायला लाजत नाहीत त्यामुळे बघता बघता या लोकांनी आपल्या लोकांचे रोजगार हिरावून घेतले असे सर्रास बोललं जातं.

 

 

हो, ही खरी गोष्ट आहे. उत्तरप्रदेशातील बिठूर या गावात सगळे मराठी लोक राहतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

राज ठाकरे म्हणतात की महाराष्ट्र हा मराठी माणसाच्याच मालकीचा आहे. इथे राहणाऱ्या उत्तर भारतीयांना हाकलून द्या. त्यांनी यासाठी आंदोलने वगैरे केली. अगदी त्यांच्या छठपुजेवरून पण वादंग झाले. पण त्यांनी ही गोष्टप पण ध्यानात घ्यावी की उत्तरेत पण मराठी माणसे राहतात आणि आजकाल नाही तर गेली कित्येक वर्षे.

होय. बिठूर या गावात मराठी लोक राहतात. उत्तरप्रदेशच्या मध्यावर असलेले हे गाव मराठवाड्यातील एखाद्या गावाची प्रतिकृती आहे असं म्हणायला हरकत नाही. या गावातील रहिवासी पण टोपे, सप्रे, शेजवलकर, आठवले,हर्डेकर, मोघे अशी महाराष्ट्रीय आडनावे असलेले, आणि ते सारे मराठी संस्कृती जपतात.

कारण हे सारे पेशव्यांचे वंशज आहेत. हो, शेवटचे पेशवे नानासाहेब पेशवे.. नानासाहेब हे दुसऱ्या बाजीरावाचे दत्तक पुत्र!

 

 

१८१८ साली इंग्रजांशी लढताना आलेल्या अपयशामुळे दुसरे बाजीराव पेशवे मजल दरमजल करत बिठूर येथे रहायला आले. त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबियांसह जवळपास अडीच हजार लोक शिवाय सैन्य होते. साडे तीन एकर जागा त्यांना दिली.

त्या काळात ब्रिटीशांनी वार्षिक आठ लाख रुपये पेन्शन मंजूर केली. पेशव्यांनी इथे येऊन पण आपले छोटेसे का असेना राज्यच निर्माण केले. तिथेही शनिवार वाड्यासारखाच वाडा बांधला. त्याचे नावही शनिवार वाडा असेच दिले.

 

 

ब्रिटीशांनी त्यांना काही अधिकार दिले होते. पेशव्यांनी त्या गावात काही मंदिरे उभारली. गंगेच्या तीरावर घाटही बांधले.

त्यांना मुलगा नव्हता म्हणून बाजीराव पेशव्यांनी ११ लग्ने केली. पण त्यांना दोन मुलीच झाल्या. म्हणून त्यांनी धोंडूपंत अर्थात नानासाहेब पेशवे यांना दत्तक घेतलं. आणि दुसरे बाजीराव १८५१ साली निवर्तले. गंगेच्या घाटावर त्यांची समाधी बांधली आहे.

 

 

त्यांनी जरी इंग्रज सत्तेला कधीही उठावाचा झेंडा दाखवला नाही तरी १८५७ चा उठाव झाला त्याचे बिठूर हेच मुख्य केंद्र ठरले. कारण बाजीरावांचे दत्तक पुत्र नानासाहेब पेशवे यांना ब्रिटिशानी पेन्शन देण्यास नकार दिला. त्यामुळे नानासाहेबांनी ब्रिटीशांच्या विरुद्ध बंड पुकारायचे ठरवले आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या नेतृत्वाखाली इथेच बंडाचे शिंग फुंकले.

पण ते बंड मोडण्यात ब्रिटीश यशस्वी झाले. त्यांनी कानपूरवर हल्ला केला. ब्रिटीशांनी पुन्हा बिठूरवर हल्ला केला तेव्हा तो वाडा तोफांचा मारा करून पाडला. मंदिरे सुद्धा पाडली. परंतु शनिवारवाड्यातील सात विहिरी त्यात खजिना आहे या अफवेमुळे वाचल्या.

नानासाहेबांना पळून जावं लागले .आता मात्र त्या वाड्यात कुणीही राहत नाही. एखाद्या पडीक जागेसारखा झाला आहे तो! त्याच्या शेजारीच एक वस्तू संग्रहालय उभारलेलं आहे त्याचं नाव नानाराव पार्क. आणि त्या वस्तू संग्रहालयात १८५७ सालच्या बंडातील सर्व गोष्टी हत्यारे, तात्या टोपे, झाशीची राणी, नानासाहेब पेशवे यांची सारी माहिती जतन केली आहे.

 

 

पेशव्यांच्या सोबत आलेली मराठी कुटुंबे पण आजही तिथेच राहतात. आणि ते सर्व मराठीच बोलतात. कानपूर, बिठूर परिसरात जवळपास २००० मराठी कुटुंबे राहतात. गेल्या सात एक पिढ्या ते तेथे रहात आहेत.

खूप जणांनी जमिनी पण खरेदी केल्या आहेत. मराठी असूनही ते उत्तरप्रदेशात राहतात आणि आपली मराठी संस्कृती न विसरता. मराठीच बोलतात.

कानपुरमध्ये जवळपास २० हजार मराठी लोक आहेत. सगळे मराठी सण दणक्यात साजरे केले जातात. नानाराव पार्कमध्ये तर झाशीची राणी, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे यांचे पुतळे उभारले आहेत.

 

 

कसं असतं बघा, जगात काहीही शाश्वत नाही. ना आज ना काल ना उद्या… म्हणून हे याचे, ते त्याचे, याने इथे कशाला यावे, इथून निघून जावे असे सांगणारे आपण कोण असतो? जिथे ज्याचा हिस्सा लिहिलेला असतो तो तिथे पोहोचतो हेच खरे. साहीर लुधियानवी आपल्या एका गीतात म्हणून गेले आहेत…

कुदरत ने तो बख्शी थी हमे एक ही धरती, हमने कही भारत काही ईरान बनाया…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version