Site icon InMarathi

”मी पार्वती, शिवाशी लग्न करणारच”: भारत-चीन सीमेवर एका महिलेचा विचित्र हट्ट

lord shiv im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

इंटरनेटवर कधी, काय व्हायरल होईल हे सांगण कठीणच! एखादी मुलगी स्वतःशीच लग्न करणार असल्याचं जाहीर करते, तर कुणीतरी अब्जावधी रुपये खर्च करून कुत्र्याचं आयुष्य जगत असल्याचं कळतं. एकंदरित या सर्वांना नेमकं झालंय काय? हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. असाच प्रश्न उत्पन्न करणारा एक दावा एका महिलेने केला आहे. ‘मी पार्वती असून मला माझ्या शिवाशीच लग्न करायचंय’ असा एक वेगळाच हट्ट तिने केला आहे. एवढंच नाही, तर त्यासाठी तिने भारत-चीनच्या सीमेवर घरही बांधलंय. ही भानगड नेमकी काय आहे? कोण आहे ही महिला? विकृत मनोवृत्ती की पब्लिसिटी स्टन्ट? जाणून घेऊयात.

प्रेम म्हटले की विषयच संपला राव! कारण…, प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे लेणे, बरोबर की नाही? आता तुम्हाला तर माहितीच आहे की पाश्चात्य जगात अॅडम आणि इव्ह यांना आद्य प्रेमी समजले जाते,पण त्यापेक्षाही पुरातन आहे शिव- सती किंवा शिव- पार्वती यांची प्रेमकथा.

 

 

पार्वतीने भगवान शिवाला आपला पती मानले होते. तिचा निर्धार होता की तिचे लग्न झाले तर ते भोलेनाथ यांच्यासोबतच होईल. दुसरीकडे देवांनाही तेच हवे होते. देवतांनी माता पार्वतीच्या विवाहाचा प्रस्ताव काम देवांकडून भगवान शिवाकडे पाठविला. ज्याला शिवाने नाकारले आणि तिसर्‍या डोळ्याने नष्ट केले. पण पार्वती यापासून परावृत्त झाली नाही आणि तीने कठोर तपश्चर्या सुरू केली.

देवता भगवान शिवाकडे मदतीसाठी पोहोचले. महादेव शिव पार्वतीच्या तपश्चर्येने प्रसन्न झाले आणि दर्शन देऊन तिला म्हणाले की तू एखाद्या राजकुमाराशी लग्न करून घे. कारण, माझ्यासोबत राहणे सोपे नाही. पण पार्वतीने नकार देत संगितले की तिने त्यांनाच आपला पती म्हणून स्वीकारले आहे. इतकेच नाही तर प्रत्येक जन्मात ती त्याच्यावर प्रेम करेल.

पार्वतीचे हे असीम प्रेम पाहून महादेवांनी लग्नास होकार दिला आणि शिव-पार्वतीचा विवाह संपन्न झाला. हे सगळं सांगण्यामागचे कारण सुद्धा खूप भारी आहे, अगदी ट्रेंडिंग आहे.

 

 

झालंय असं की लखनौच्या अली गंज भागात राहणार्‍या एकीला आपण पार्वतीचा अवतार असल्याचा चक्क साक्षात्कार झाला आणि तीने मग कैलास पर्वताच्या पायथ्याशी मुक्काम ठोकला. ” मी पार्वती आहे आणि मला शंकराशी विवाह करायचा आहे. त्यासाठी मी इथेच राहून तपश्चर्या कारेन, माझ्या साधनेत व्यत्यय आला किंवा आणला गेला तर मी आत्महत्या कारेन.” असे तिचे म्हणणे आहे.

आता हा पब्लिसिटी स्टंट आहे की खरेच तिला महादेवाशी लग्न करायचे आहे हे गुलदस्त्यातच आहे पण यामुळे स्थानिक प्रशासन मात्र चक्रावले आहे. आता या महिलेला कसे रोखावे यावर चर्चा सुरू आहे.

स्वत:चे नाव हरमिंदर कौर सांगणारी ही महिला एसडीएम धारचुलाच्या परवानगीने १५ दिवसांसाठी तिच्या आईसोबत गुंजी येथे, जे कैलास मानसरोवरा च्या वाटेवर आहे, तेथे गेली होती.

 

 

२५ मे रोजी परवानगीची मुदत संपल्यानंतरही त्या दोघींनी प्रतिबंधित क्षेत्र सोडण्यास नकार दिला. पोलिसांनी धारचुला येथून दोन उपनिरीक्षक आणि एका निरीक्षकाच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक त्यांना परत आणण्यासाठी पाठवले होते, मात्र त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

हरमिंदर कौर हिच्या म्हणण्यानुसार तिला साधनेमध्ये साक्षात्कार झाला की ती पार्वतीचे रूप आहे, त्यानंतर तिने ठरवले की आता गुंजी येथे राहून तपश्चर्या करायची आणि भगवान शिव यांना प्रसन्न करून घेवून त्यांच्याशी लग्न करायचे.

आता इथे ट्विस्ट असा आहे की ती ज्या भागात राहिली आहे तो भाग आंतराष्ट्रीय सीमेच्या अधीन आहे. उत्तराखंडच्या पिथौरागढ येथील कैलास मानससरोवराच्या मार्गावर भारत-चीन सीमेनजीकचे हे प्रतिबंधित क्षेत्र आहे. त्यामुळे या परिसरात फिरण्यासाठी काही दिवसांसाठी सरकारी परवानगी लागते भारत-चीन सीमेजवळील नाभिधंगचा हा भाग प्रतिबंधित क्षेत्र असल्याने तेथील प्रशासन या महिलेला या प्रतिबंधित क्षेत्रातून हटवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “महिलेच्या सुटकेसाठी वैद्यकीय कर्मचार्‍यांसह १२ जणांचे मोठे पोलिस पथक पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

 

 

पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, महिलेने टीमला धमकी दिली की, जर तिला जबरदस्तीने घेऊन जाण्यात आले तर ती आत्महत्या करेल.

आता दुसरी टीम पाठवण्यात येणार आहे. ती जर येण्यास तयार नसेल तर तिला बळजबरीने आणले जाईल. हरमिंदर कौर ही मानसिक दृष्ट्या अस्थिर असल्याने पार्वती असल्याचा दावा करत असल्याचे प्रशासनाचं म्हणणं आहे.

सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत असून नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

दोस्तानो पूर्वी प्रेमासाठी काय पण असे म्हणणारे आता प्रसिद्धीसाठी काय पण करू लागले आहेत असेच या निमित्ताने म्हणावे लागेल, नाही का?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version