Site icon InMarathi

सिंगल राहण्याचे हे फायदे वाचलेत, तर ‘कोणीतरी असावं’ याची गरजच वाटणार नाही

kangana queen feature im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘सुन राजा शादी लड्डू मोतीचूर का, जो खाये पछताये जो न खाये वो पछताये….’

खूप वेळा लोक सांगतात लग्न ही अशी ट्रेन आहे, ज्यात बसलेले लोक बाहेर यायला तडफडतात आणि बाहेर असलेले ट्रेनमध्ये बसायला तडफडतात. आणि दोघे एकमेकांना दोन्हीचे तोटे सांगत असतात, पण सिंगल असण्याचे फायदे आहेत असं कुणी म्हणालं तर? हो आणि चक्क सिंगल डे पण साजरा केला जातो आजकाल… आहे का माहिती?

असं तर माणूस हा समाजशील प्राणी आहे असं म्हणतात. तो एकटा एकाकी राहू शकत नाही. कळपाने, घोळक्यात रहायला त्याला आवडत. एखाद्या माणसाचा स्वभाव माणूसघाणा, तुसडा असतो, पण तो सुद्धा एखाद्या खास माणसासोबत मनाने जवळीक साधून असतो.

 

 

आपली सगळी गुपिते, मनातल्या गोष्टी फक्त त्याच माणसासोबत शेअर करतो. थोडक्यात काय तर माणूस एकटा राहू शकत नाही, पण तरीही त्याला कधी कधी एकटं रहावं असं वाटतं असतं. सारखं कुणीतरी सोबत असण्यापेक्षा कधी कधी स्वत:साठी स्पेस असावी असं नक्की वाटतं.

एकलकोंड्याचा कबिला म्हणजे सोलो …. स्वत:ची कंपनी एन्जॉय करणे म्हणजे सिंगल असणे असे विविध प्रकार या सिंगल लोकांना सुचतात आणि यासाठीच हा सिंगल्स डे साजरा करायची पद्धत सुरु झाली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

तुमचे कॉलेजमधले दिवस आठवून बघा…. ट्रीप ठरली की सॅकमध्ये आवश्यक तेवढ्या, गरजेच्या वस्तू टाकून तुम्ही निकल पडे होत होता ना? तेच लग्न झाल्यावर नाना प्रश्न…. कुठे जाणार? सोबत कोण आहे? परत कधी येणार? मला कधी सोबत न्यावं असं वाटत नाही… असे ढीगभर प्रश्नांचे, कधी टोमण्यांचे चक्रव्यूह पार करत प्रोग्राम होतो. अशा वेळी मिंगल असणं नको वाटू लागतं. आणि सिंगल असणं किती छान वाटू लागतं.

ही झाली पुरुषांची गत… बायकांची तर त्याहून बेकार…. निघताना आधी घरातील अडचणी बघा…आपण नाही त्यामुळे कुणाची जेवणखाणाची आबाळ नाही ना होत? मुलांकडे कोण पाहिल? भाजी संपली आहे ती कोण आणेल? त्याच दिवशी कामवाली बाई नाही आली तर? त्यांच्यापुढे तर प्रश्नांचे चक्रव्यूह तयार असतात.

यातील एखादा जरी व्यूह बाकी राहिला तर त्या सोलो ट्रिपचे वाभाडे निघाले म्हणून समजा….त्यामुळे सहसा बायका असे उद्योग टाळायलाच बघतात.

म्हणून सिंगल असण्याचं सुख सांगणारा सिंगल्स डे चीनमध्ये सुरु करण्यात आला. आहे न धमाल? ११ नोव्हेंबर हा दिवस चीनमध्ये सिंगल्स डे अथवा बॅचलर्स डे म्हणून साजरा केला जातो.

 

 

त्यादिवशी सर्व सिंगल पुरुषांची दिवाळीच असते म्हणा ना! मस्त शॉपिंग करतात आणि झकास एन्जॉय करतात आपलं सिंगल असणं. चीनमधील नानजिंग विद्यापीठातील चार विद्यार्थ्यांनी ही प्रथा सुरु केली. सिंगल आहोत याची खंत न बाळगता हा दिवस मस्त एन्जॉय करावा ही यामागील भूमिका.

आता तर लग्नापूर्वी बॅचलर्स पार्टी करायची टूम सुरु आहे. वाग्दत्त वधू किंवा वर आपल्या मित्र मैत्रिणींसह ही पार्टी करतात. आपले सिंगल असलेले स्टेट्स आता बदलणार त्यापूर्वी धमाल करू हा त्यामागील हेतू.

 

आता सिंगल लोकांची सिंगले सिंगले म्हणून चेष्टा करायची असेल तर त्यांचे प्लस पाॅईंट बघा …

१) वेळेचा वापर – सिंगल लोकांकडे असलेला वेळ ते सत्कारणी लाऊ शकतात. वाचन, करीअर किंवा आराम करण्यासाठी हा वेळ सिंगल लोक वापरू शकतात.

२) मैत्री- सिंगल लोक आपला वेळ आपल्या मित्र मैत्रिणींना देऊ शकतात. मनाप्रमाणे कुणाशीही मैत्री करू शकतात, पण तेच मिंगल लोक आपल्या पार्टनरला न आवडणाऱ्या व्यक्तीशी फारसे संबंध ठेऊ शकत नाहीत. त्यांचा सगळं वेळ मित्रांपेक्षा पार्टनरसोबतच जातो.

३) सोलो ट्रीप- सिंगल लोक मनाप्रमाणे सोलो ट्रीप प्लान करू शकतात. कोणी सोबत असो नसो त्याने काहीही फरक पडत नाही.

 

 

४) फ्लर्ट करणे- सिंगल आहात … मग फ्लर्ट करायला चिक्कार स्कोप. फ्लर्ट करणे म्हणजे काही गुन्हा नाही.. तुमच्या कोणाही मैत्रिणीला किती सुंदर दिसते आहेस तू… किंवा मित्राला आज किती पोरी मरून पडल्या वाटेत असं बिनधास्त म्हणू शकता. ते तुम्हाला पार्टनर असेल तर शक्य होते का?

५) मनासारखं जगणं- आहेत ते दिवस तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगू शकता. त्यात कुणाचीही आडकाठी नसते. हवे ते ड्रेस वापरू शकता. हवी ती फॅशन, हेअर स्टाईल करू शकता. तुमची आवडती कामे करून त्यातून आनंद मिळवू शकता. हे सारे सिंगल असण्याचे फायदे आहेत.

याचा अर्थ तुम्ही कायमस्वरूपी सिंगल एकटं राहावं असं नाही. एका ठराविक टप्प्यानंतर हे सिंगल असणं एन्जॉय करून झालं की सुखदु:खासाठी सोबतीला कुणीतरी हवं ना!!!

प्रत्येक टप्प्याचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. जे एके काळी फायदे वाटतात ते ठराविक काळानंतर तोटे वाटू लागतात. म्हणून दोन्ही स्टेप अनुभवा आणि आयुष्य मजेत जागा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version