Site icon InMarathi

कोल्हापूर, उदयपूर आणि….: अनेक शहरांच्या नावामागील ‘पूर’ शब्दाचा नेमका अर्थ काय?

kolhapur 1 im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पूर्वी जेव्हा मोबाईलचे अतिक्रमण लोकांच्या आयुष्यावर झाले नव्हते तेव्हा मनोरंजन हा खूप सोपा आणि स्वस्त पर्याय होता. सुट्टीत बरेच बैठे खेळ खेळले जात. त्यात गावाच्या भेंड्या हा एक हमखास खेळला जाणारा खेळ. कुठली कुठली नावे सांगत. रामपूर, राजापूर, ही सर्रास येणारी नावे. मग भारताचा नकाशा बघताना एक लक्षात येणारी गोष्ट म्हणजे अशी कितीतरी पूर असलेली गावे आहेत. तुमच्या आसपास किंवा तुमच्या माहितीमध्येही अशी नावे असतील ज्याला पूर हे संबोधन असू शकेल. कधी विचार केला आहे का हे पूर कुठून आले असेल?

 

 

आता थोडं इतिहासात जाऊन बघितलं तर, हस्तिनापूर हे सगळ्यात पौराणिक नाव ज्यात पूर या शब्दाचा उल्लेख आहे. आता आज काही हस्तिनापूर काही अस्तित्वात नाही पण अशी पुर असलेली बरीच गावे आहेत.

 

 

आपलं गुलाबी शहर जयपुर, जोधपुर, उदयपुर, कानपूर, कोल्हापूर, सोलापूर अजूनही कितीतरी गावे आहेत ज्यात पूर आहे. आणि हे काही आत्ता झालेलं नाही. कितीतरी शहरे पौराणिक आहे, ऐतिहासिक आहेत.आणि त्यांना पूर लावलेलं आहे.

बघा तुमच्या आसपासची अशी गावे, नकाशात असलेली गावे एक शोधायला गेलं तर पन्नास सापडतील.

काय आहे हे पूर?

जगात कोणतीही गोष्ट विनाकारण होत नसते, झालेलीही नाही आणि होणारही नाही. या गावांना पूर असं म्हणण्याचं काहीतरी कारण असलेच ना?

जुने शायर कवी सर्रास आपल्या गावाचं नाव मिळून आडनाव लिहायचे. म्हणजे, नक्ष लायलपुरी, हसरत जयपुरी, मजरूह सुलतानपुरी वगैरे. म्हणजे यांच्या गावाची नावे पूर असलेली होती. थोडक्यात ही परंपरा बरीच जुनी आहे. हे केवळ गावांबाबतीतच नाही तर राजापुरी हळद, कोल्हापुरी मसाला, सोलापुरी चटणी अशा बऱ्याच शब्दांना ही जोड सापडते.

 

 

एखाद्या गावाचे नाव पूर जोडलेले आहे. जर बारकाईने विचार केला तर कुठल्याही खेड्याला पूर असे नाव दिलेले नाही. ज्या ज्या गावांची नावे पूर या शब्दाने संपतात ते गाव मोठे शहर होते. कोणत्याही खेड्याचे, कसब्याचे नाव पूर शब्दाने तयार झाले नाही. काय कारण असेल? हा शब्द आत्ता आत्ता तयार झाला आहे का? नाही, हा शब्द फार फार जुना आहे.

हा शब्द वेदकालापासून आहे. हस्तिनापुर हे तर आपण महाभारतात कौरवांची राजधानी म्हणून ओळखतोच. जयपुर हे गाव राजस्थानचे महाराज राजा जयसिंह यांनी वसवले. म्हणून त्याचे नाव त्यांच्या नावावरून जयपुर ठेवले गेले.

नवनाथांपैकी एक नाथ गुरु गोरक्षनाथ, यांच्या नावावरून गोरखपूर हे नाव दिलं गेलं. तर महाराणा उदयसिंह यांच्या नावावरून उदयपुर या गावाचं नाव ठेवलं गेलं.

 

 

उत्तर प्रदेशातील सहारनपुर या गावाचं नाव शाह रणवीर याच्या नावावरून सहारनपुर ठेवलं गेलं. तर रजपूत राजा कान्ह्पुरीया याच्या नावाने कानपूर ओळखलं जातं.

सोळा गावापासून तयार झालेले म्हणून सोलापूरचे नाव सोलापूर असे ठेवले आहे. कोल्हासुराचा महालक्ष्मीने वध केला. त्याला दिलेल्या वरानुसार कोल्हापुरचे नाव कोल्हापूर ठेवले गेले. अशी कितीतरी गावे आहेत. त्यांचा आपला आपला इतिहास आहे.

 

 

या पूर शब्दाचा अर्थ ऋग्वेदात मोठे शहर किंवा किल्ला असं आहे. मग स्वाभाविकच मोठे शहर, नगर याचे नाव पूर या शब्दानेच होणार.

अशी प्रत्येक शहराच्या नावाची आपली आपली कहाणी आहे. तुमच्या आसपास असलेल्या गावाची अशीच काही ना काही तरी कथा आहेच. कदाचित तुम्हीही एखाद्या पुरचे रहिवासी असाल .. बघा, तुम्हीही शोधा आणि सांगा तुमच्या गावाचा पुर असण्याचा इतिहास.!!!

एक्सप्रेसचे डब्बे निळे-लाल किंवा हिरव्या रंगाचेच असण्यामागे आहे एक खास कारण

रेल्वे स्टेशनच्या बोर्डवर समुद्रसपाटीपासूनची उंची लिहिलेली असते, का ते जाणून घ्या..

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version