आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
यशस्वी झालेल्या अनेकांच्या यशामागचं एक सिक्रेट असतं ते त्यांच्या सवयी. कुठलीही सवय आपल्यासोबत दीर्घकाळ राहते, पण वाईट सवयी पटकन लागतात आणि सहजासहजी सुटतही नाहीत.
दरवर्षी अशा अनेक वाईट सवयी बदलायचा आपण तात्पुरता निर्धार करतो आणि वर्ष सुरू होऊन काहीच दिवस झाले की सोडूनही देतो. त्यावर विनोदी करतो, पण सवयी ही गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे हे आपल्या प्रत्येकालाच माहीत असतं.
वाईट सवयी पटकन बदलणार नसतातच, पण तरी २१ दिवसांत सवय बदलता येते हे आपण अनेकांकडून ऐकलेलं असतं. आपल्याला झटपट परिणाम हवा असतो त्यामुळे यावर आपला चटकन विश्वासही बसतो.
खरंच एखादी सवय २१ दिवसांत बदलता येते का? सवयी बदलण्याचा असा एकच एक फॉर्मुला असू शकतो का? जाणून घेऊन विज्ञान याविषयी काय म्हणतं ते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
२१ दिवसांत सवय बदलता येते हा नियम/मिथक आलं तरी कुठून?
डॉ. मॅक्सवेल माल्ट्झ या प्लास्टिक सर्जनला शस्त्रक्रियेनंतर किती काळात रुग्ण बदलांना सरसावतात याचा शोध घ्यायचा होता. यासाठी किमान २१ दिवस लागत असल्याचं त्याच्या लक्षात आलं.
त्याने त्याच्या ‘सायको-सायबरनेटिक्स’ या सेल्फ-हेल्प पुस्तकातल्या बऱ्याच प्रिस्क्रिप्शन्सचं मूळ म्हणून हा २१ दिवसांचा नियम वापरला. तेव्हापासून एखादी सवय बदलायला किती दिवस लागतात या प्रश्नावर सगळे सेल्फ-हेल्प गुरू ‘२१ दिवस’ हेच प्रमाण उत्तर देऊ लागले.
सवयी बदलायला ‘किमान’ २१ दिवस लागतात या म्हणण्याकडे लोकांनी दुर्लक्ष केलं आणि सरसकटपणे २१ दिवस हेच उत्तर स्वीकारलं. इथेच मुळात गफलत झाली.
काही सेल्फ-हेल्प मार्गदर्शकांच्या मते आपल्याला सवयी बदलून नव्या सवयी लावायला २८ ते ३० दिवस लागतात. “तुम्ही चार आठवडे स्वतःत काय बदल करायचेत यावर ठरवून लक्ष केंद्रित करून जागरूकपणे जगलं पाहीजे. एकदा ४ आठवडे झाले की केलेले बदल तसेच सुरू ठेवायला तुम्हाला थोडेच कष्ट घ्यावे लागतील.” असे काही तज्ञ सांगतात.
मात्र, बऱ्याच जणांनी २८-३० दिवसांच्या नियमाच्या तुलनेत २१ दिवसांच्या नियमालाच पसंती दर्शवली. कारण, तो त्यांना सोपा आणि झटकन पाळता येईल असा नियम वाटला.
प्रत्येकाला सवयी बदलण्यासाठी लागणारा वेळ कमी-जास्त आणि वेगवेगळा असतो :
२००९ साली युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनने ‘द युरोपियन जरनल ऑफ सोशल सायकॉलॉजी’मध्ये आपला एक अभ्यास प्रसिद्ध केला होता. यात सहभागी झालेल्या ९६ जणांवर ते कशाप्रकारे सवयी लावून घेतात हे पाहण्यासाठी १२ आठवडे लक्ष ठेवलं गेलं होतं.
वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया सवयीच्या व्हायला वेगवेगळा वेळ लागतो हे यातून लक्षात आलं. एखादी सवय लावून घ्यायला १८ ते २५४ दिवस लागू शकतात हे या अभ्यासातून समोर आलं. नवी सवय लावायला सरासरी ७६ दिवस लागतात असा निष्कर्ष काढला गेला.
जुन्या सवयी सोडायला नव्या सवयी लावा :
ओरेगॉन युनिव्हर्सिटीतील मानसशास्त्र विभागाच्या ‘सामाजिक आणि भावनिक न्यूरोसायन्स प्रयोगशाळेचे’ संचालन असलेले डॉ. एलियट बर्कमन म्हणतात, “वाईट सवयी बदलून त्यावेळी दुसरं काहीच न करण्यापेक्षा चांगल्या सवयी लावणं तुलनेने सोपं असतं.”
वाईट सवयींचं आपल्या मेंदूत इतकं घट्ट प्रोग्रामिंग झालेलं असतं, की त्या अशा नुसत्याच सोडता येत नाहीत. त्या सोडायचा प्रयत्न करताना एक पोकळी निर्माण होते. जर ती पोकळी आपण चांगल्या सवयी लावून भरून काढली नाही तर वाईट सवयी सोडता येणं कठीण जातं.
जर एखाद्याला सिगारेटचं व्यसन असेल तर ती सवय सोडताना त्याने सिगारेट ओढण्याची तलफ आली की काहीतरी वेगळी चांगली सवय लावून त्यात स्वतःला गुंतवून घेतलं आणि ती तेवढी अवघड वेळ मनावर ताबा मिळवला तर त्याला अधिक पटकन सिगारेट सोडता येणं शक्य होऊ शकतं.
सवय बदलायला किती वेळ लागेल याचा नीट विचार करा :
आपली सवय बदलण्यासाठी आधी आपल्या मनाची ती सवय बदलण्यासाठी किती तयारी झालेली आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. सवयी बदलण्याच्या बाबतीत सध्याची परिस्थिती काय आहे हे ओळखून त्यानुसार आपल्याला किती दिवसांत सवय बदलायचीये याचा नीट विचार करा.
२१ दिवसांत सवय बदलेल या भरवशावर राहू नका. स्वतःसमोर एक टार्गेट ठेवा, पण त्यात पुढे मागे झालं तर खट्टू होऊ नका. कुणाला सवयी बदलायला २ महिने लागतील, कुणाला जास्त काळ लागेल.
तुमचा निर्धार किती आणि ती सवय किती जुनी आहे त्यानुसार तुमची सवय बदलण्यासाठी किती वेळ लागेल हे ठरेल. तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवणं, संयम आणि सातत्य ठेवणं फार महत्त्वाचं असतं.
जर तुम्हाला वाईट सवयी असतील तर तुम्ही तुमचं बेस्ट व्हर्जन होऊ शकणार नाही हे लक्षात ठेवा. तुमच्या वाईट सवयींमुळे तुम्ही अकार्यक्षम, आजारांनी ग्रासलेले आणि दुःखी होता. तुमच्या नातेसंबंधांवर त्याचा परिणाम होतो. चांगल्या सवयी असतील तर तुम्ही सगळ्याच बाबतीत यशस्वी होऊ शकाल.
—
- मेंदू तल्लख करण्यासाठी या १० सवयी तात्काळ थांबवा, नाहीतर…
- काहीही होऊ द्या – वयाच्या १८ ते ३० दरम्यान या १३ चुका अजिबात करू नका!
—
केवळ वेळेचाच विचार करणं उपयोगाचं नाही :
आपल्याला एखादी सवय बदलायची असेल तर ती किती दिवसांत बदलतात येईल यावरच केवळ लक्ष केंद्रित करणं पुरेसं नसतं.
तुम्हाला खरंच किती मनापासून सवय बदलायची आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो. किती खोलवर ती सवय रुजलेली आहे? हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न असतो. नवी सवय मोडणे जुनी सवय मोडण्याच्या मनाने सोपे असते. ती सवय मोडली नाही तर त्याचे काय परिणाम होतील? हा तिसरा महत्त्वाचा प्रश्न असतो.
जर तुम्हाला स्वतःला व्यायामाची सवय लावायची असेल पण तुम्हाला वर्षानुवर्षे विनासायास गोष्टी करायची सवय असेल आणि काय होणार आहे वजन कमी करून अशी तुमची याबाबत उदासीन वृत्ती असेल तर तुम्हाला व्यायाम करायची सवय लागणं फार अवघड जाईल.
तुमच्यासमोर ती सवय बदलता येण्यासाठी काहीतरी ध्येय असलं पाहीजे. आपली सवय जर आपण बदलली नाही तर ते ध्येय्य साध्य करणं आपल्याला अशक्यप्राय होईल हा विचार तुमच्या मनात पक्का पाहीजे. तेव्हाच तुम्ही आळस झटकून ती सवय बदलाल.
२१ दिवसांत सवयी बदलता येणं हा विचार कितीही आकर्षक वाटला तरी तो वास्तवाला धरून नाही. आपल्याला एखादी सवय बदलायची असेल तर मनाचा निर्धार होण्याआधी ती का बदलायचीये हे लक्षात घेतलं आणि त्यानुसार स्वतःसमोर एकेक करत छोटी छोटी आणि व्यावहारिक ध्येयं ठेवली, स्वतःवर अती ताण न आणता एखाद दिवस ठरवल्याप्रमाणे गोष्टी करता आल्या नाहीत म्हणून नाराज होऊन लगेचच प्रयत्नच न सोडून देता दुसऱ्या दिवशी आपण पुन्हा नव्या उत्साहाने ठरल्याप्रमाणे गोष्टी करत राहीलो तर सवयी बदलण्यात यश मिळण्याची शक्यता नक्कीच जास्त असेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.