' हॉटेल धंद्याच्या ५ ट्रिक्स समजून घेतल्यात, तर बाहेर खायला गेल्यावर तुमचे खूप पैसे वाचतील – InMarathi

हॉटेल धंद्याच्या ५ ट्रिक्स समजून घेतल्यात, तर बाहेर खायला गेल्यावर तुमचे खूप पैसे वाचतील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कसं असतं, बऱ्याचदा आपल्याला घरी जेवायचा कंटाळा येतो. कधी कधी कामाचं प्रेशर जास्त असल्याने आपण घरी जेवण बनवण्याचा कंटाळा करतो.

आजकाल जरी ऑनलाइन फूड मागवू शकत असलो, तरी काही वेळा आपल्याला बाहेर जेवायला जावंसं वाटतं आणि आपली पावले फूड हब किंवा हॉटेल, रेस्टोरंट कडे वळतात.

आपण कधीतरी हॉटेलमध्ये जेवायला जात असू तर आपल्याला त्यांचे नियम किंवा त्यांच्या ट्रीक्स माहीत नसतात, अशाने आपण हवा तसा जेवणाचा आस्वाद घेऊ शकत नाही, पण बिल मात्र आपल्याला भरपूर भरावे लागते. अशावेळी आपण जर काही टिप्स, हॅक किंवा उपाय केले तर आपण त्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकतो आणि बचत करू शकतो.

कोणत्या आहेत या टिप्स? 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१. एपेटायजर्स :

रेस्टॉरंटमध्ये बिल कमी करण्याचा एक उत्तम उपाय म्हणजे प्रथम स्वतःसाठी ‘एपेटाइजर’ ऑर्डर करणे. बर्‍याच वेळा लोकांना असे वाटते की केवळ मुख्य कोर्समुळे त्यांचे पोट भरेल आणि एपेटाइजरमुळे पैशाचा अपव्यय होईल, पण एपेटायझरमुळे देखील पोट भरू शकते.

जर तुमचा मूड असेल, की तुम्हाला काहीतरी नवीन ट्राय करायचंय, तर ही युक्ती एकदा नक्की करून पहा . मेन कोर्सच्या जवळपास अर्ध्या बिलात तुमचे पोटही भरेल आणि काहीतरी नवीन करून पहा.

२. खास डिश/पदार्थ :

 

hotel inmarathi

 

बर्‍याच रेस्टॉरंटमध्ये शेफची खास ऑर्डर असते आणि ती खूप महागडी डिश असते. अनुभव असा येतो, की बर्‍याच वेळा हे पदार्थ तितकेसे चांगले नसतात आणि पदार्थ मागवल्यानंतर पश्चाताप होतो तुम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर आधी त्याबद्दल विचारा. मगच या खास डिश ऑर्डर करा.

३. हॉटेलच्या सवलतींचा लाभ घ्या :

वेगवेगळ्या लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ आणि पेयांवर वेगवेगळ्या ऑफर असतात, त्याची माहिती करून घ्या.

या ऑफर सहसा संध्याकाळी ७ किंवा ७.३० पर्यंत संपतात. तेव्हा त्यावेळात त्या हॉटेलमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि कमी खर्चात अधिक पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

४. रेस्टॉरंट गिफ्ट कूपन आणि सवलत :

असे अनेक ऑनलाइन अॅप्स आहेत, जे कोणत्याही रेस्टॉरंटसाठी भेट कूपन किंवा सूट देतात. आजकाल ‘Dineout’ खूप लोकप्रिय होत आहे आणि याचे एकमेव कारण म्हणजे ते त्यांच्याद्वारे बुक केलेल्या रेस्टॉरंटच्या बिलांवर सवलत ऑफर देतात.

झोमॅटो प्लस, फूड पांडा इत्यादीसारख्या अनेक अॅप्सवर सवलतीच्या ऑफर असतात ज्या तुम्ही अॅप्सद्वारे घेऊ शकता.

५. तुम्ही सेवा शुल्क नाकारू शकता :

 

service tax im 3

 

ही एक महत्वाची गोष्ट आहे, की रेस्टॉरंट तुमच्याकडून सर्व्हिस चार्ज आकारेल असे लिहिलेले नसेल आणि तरीही तुम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये जेवत असाल तर तुम्ही सर्व्हिस चार्ज भरण्यास नकार देऊ शकता.

लक्षात ठेवा, की सेवा शुल्क आणि सेवा कर दोन्ही भिन्न आहेत आणि सेवा शुल्क कायदेशीर नाही. आजकाल अनेक रेस्टॉरंट्स त्यांच्या बिलांसह सेवा शुल्क आकारत असल्याचे आधीच स्पष्ट करतात. जर तुम्हाला हे पैसे द्यायचे नसतील, तर तुम्ही दुसरे रेस्टॉरंट निवडू शकता.

मित्रांनो, या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवून एखाद्या हॉटेल किंवा रेस्टोरंट मध्ये गेलात तर नक्कीच तुम्ही तुमच्या आवडत्या मेन्यूचा मनापासून आस्वाद घेवू शकाल ते ही कमी खर्चात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?