Site icon InMarathi

CBI ने मृत घोषित केलेली स्त्री चक्क कोर्टात हजर झाली आणि …

women im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोणत्याही व्यक्तीचा जन्म आणि मृत्यू हे विधिलिखित असतं अशी आपली मान्यता आहे. कोणी कितीही ग्रेट असला तरी त्याला मृत्यू अटळ आहे. मृत्यू हे असं अंतिम सत्य आहे ज्यानंतर कोणताही मनुष्य पुन्हा दिसत नाही, बोलत नाही हे सर्वश्रुत आहे. पण, भारताच्या इतिहासात एक अशी पण घटना घडली होती, जेव्हा सीबीआय चौकशी नंतर कागदोपत्री मृत घोषित करण्यात आलेली एक व्यक्ती चक्क न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी हजर झाली आहे.

बिहार मधील मुजफ्फरपूर येथे घडलेली ही सत्यघटना फार जुनी नाहीये. ‘बदामी देवी’ हे त्या महिलेचं नाव आहे. ४ जून २०२२ ही रोजी ही महिला आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन न्यायालयात हजर झाली आणि तिने सांगितलं की, “सीबीआयने मला जिवंत असूनही मृत घोषित केलं. यामागे काही तरी मोठं षडयंत्र आहे. मला वाचवा.”

 

 

कोणत्याही गुन्ह्याचा छडा लावू शकणाऱ्या सीबीआयकडून अशी चूक कशी होऊ शकते ? असा प्रश्न न्यायालयात उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला पडला होता. ‘राजदेव रंजन’ या पत्रकाराच्या खुनाची चौकशी करत असतांना सीबीआयने या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार ‘बदामी देवी’ यांना मृत घोषित केलं होतं. पण, ‘बदामी देवी’ जिवंत आहेत हे कळल्यावर न्यायालयाने सीबीआयला ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

काय आहे हे पूर्ण प्रकरण ? जाणून घेऊयात.

“बिहार मध्ये काहीही घडू शकतं” हे आपण तिथल्या गुन्हेगारी कथा ऐकून, वाचून नेहमीच म्हणत असतो. पण, यावेळी इतकी मोठी चूक घडावी आणि ती सुद्धा ‘सीबीआय’च्या हातून हे सामान्य माणसाचं न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहे.

२४ मे २०२२ रोजी ‘सीबीआय’ने मृत घोषित केलेली ‘बदामी देवी’ ही महिला ४ जून २०२२ रोजी जिवंत कशी झाली ? याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पोलिसांनी लाच घेऊन खोटा रिपोर्ट तयार केला असावा इतपत गोष्टी आपण मान्य करत असतो. पण, सीबीआय आणि तत्सम चौकशी संस्थांच्या अहवालावर आपण अगदी डोळे झाकून विश्वास ठेवत असतो. पण, यावेळी वकील सिन्हा यांच्या म्हणण्यानुसार “या प्रकरणाची चौकशी करतांना सीबीआय कडून इतकं मोठं दुर्लक्ष कसं झालं? भारतातील सर्वात मोठ्या सत्यशोधक संस्थेकडून अशी चूक झाली तर सामान्य माणसाने कोणाकडे बघावं ?” हे प्रश्न सध्या बिहारच्या आणि पर्यायाने देशाच्या जनतेला पडले आहेत.

 

 

‘राजदेव रंजन’ यांच्या खुनाची केस कोर्टात लढणारे वकील सिन्हा यांनी कोर्टात हे देखील सांगितलं की, ” ज्या ‘बदामी देवी’ यांना सीबीआयने मृत घोषित केलं त्यांना सीबीआयने कधी संपर्क साधायचा प्रयत्न सुद्धा केला नाही.”

राजदेव रंजन कोण होते? आणि बदामी देवी यांचं काय नातं होतं?

राजदेव रंजन हे ‘हिंदी डेली – हिंदुस्तान’ या वर्तमानपत्राचे पत्रकार होते. बिहार मधील सिवन या गावातील गुन्हेगारी घटनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांच्यावर जबाबदारी होती.

मे २०१७ मध्ये ते उत्तर बिहारमध्ये घडलेल्या एका गुन्ह्याची माहिती गोळा करत होते. एका रात्री सिवन स्टेशन रोडवर चालत असतांना त्यांच्यावर अज्ञात बाईकस्वारांनी हल्ला केला आणि त्यामध्ये राजदेव रंजन यांचा खून झाला.

 

 

राजदेव रंजन यांच्या पत्नी आशा रंजन यांनी पोलिसात जाऊन या घटनेची रीतसर तक्रार नोंदवली. आशा रंजन यांनी पोलिसांना माहिती दिली की, राजदेव हे सध्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते शहबुद्दीन आणि तेज प्रताप यादव यांनी केलेल्या एका गुन्ह्याची माहिती गोळा करत होते आणि त्यामुळेच त्यांचा खून करण्यात आला आहे.

२०१७ मध्ये आशा रंजन यांनी केलेल्या ‘एफआयआर’ नंतर या प्रकरणाची चौकशी सीबीआयवर सोपवण्यात आली होती. सीबीआयने ‘मोहम्मद शहाबुद्दीन’ याची या प्रकरणात संशयित म्हणून अटक केली होती. पण, ‘राजद’ या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असलेल्या मोहम्मद शहबुद्दीन यांनी आपलं राजकीय वजन वापरलं आणि मार्च २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयातून आपला जामीन घेऊन आले होते.

राजदेव रंजन यांचा खून झाला होता तेव्हा ‘बदामी देवी’ या घटनास्थळी हजर होत्या असं त्यांचं म्हणणं आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या मोहम्मद शहाबुद्दीन आणि तेजपाल यादव यांचा ‘बदामी देवी’ यांचं मोक्याच्या जागेवरील घर बळकावण्याचा विचार असल्याचं सांगितलं जात आहे. ‘

राजदेव रंजन’ हे या प्रकरणाची माहिती ‘हिंदी डेली – हिंदुस्तान’ या वर्तमानपत्रात छापून आणणार होते. ही माहिती समोर आल्यास दोन्ही राजकीय नेत्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात आलं असतं म्हणून त्यांनी राजदेव रंजन यांचा काटा काढला अशी या संपूर्ण प्रकरणाची माहिती सध्या चर्चेत आहे.

४ जून २०२२ रोजी जेव्हा ८० वर्षीय ‘बदामी देवी’ जेव्हा कोर्टात प्रत्यक्ष हजर झाल्या तेव्हा न्यायालयात घडलेल्या या घटनेचे इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावर लगेच पडसाद बघायला मिळाले.

 

 

आपल्याला मृत घोषित केल्याचं कळल्यावर झालेलं दुःख बदामी देवी यांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर येऊन बोलून दाखवलं. काही वेळातच हा कागदोपत्री मृत असलेल्या व्यक्तीच्या बोलण्याचा विडिओ व्हायरल झाला आणि हा देशाच्या चर्चेचा विषय झाला.

बदामी देवी जेव्हा न्यायालयात हजर झाल्या तेव्हा पुनीत कुमार गर्ग हे न्यायाधीश होते. त्यांनी बदामी देवी यांची बंद खोलीत चौकशी करून जवाब नोंदवून घेण्याचे आदेश दिले. चौकशी दरम्यान बदामी देवी यांनी सांगितलं की, “सीवान या गावातील पत्रकार राजदेव रंजन यांच्या खुनाची प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून मला सीबीआयने नियुक्त केलं होतं. पण, नंतर मला कोणीही संपर्क साधला नाही.”

सीबीआयकडून ‘गौरव मिश्रा’ हे या प्रकरणाची चौकशी करत होते. या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया नोंदवतांना त्यांनी सांगितलं की, “आम्ही गोरखपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर राकेश सक्सेना आणि सीवान येथील पचरूखी येथे राहणाऱ्या ‘गौरीशंकर बैठा’ यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हा अहवाल सादर केला होता. हे प्रत्यक्षपणे सांगण्यासाठी आम्ही त्यांना न्यायालयात हजर रहाण्याची विनंती करत आहोत. पण, ते न्यायालयात येत नसल्याने आम्ही नुकतंच या दोघांविरुद्ध अटक वॉरंट जाहीर केलं आहे.”

राजदेव रंजन यांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीला बदामी देवी यांच्या समक्ष समोर येण्याने एक वेगळंच वळण लागलं आहे.

 

 

सीबीआय मधील कोणत्या अधिकाऱ्याने फितूर होऊन असा खोटा अहवाल तयार केला हे लवकरच समोर येईल आणि राजदेव रंजन यांच्या गुन्हेगारांना सुद्धा शिक्षा होईल असा आशावाद आपल्या न्यायवयवस्थेवर विश्वास ठेवत व्यक्त करूयात. सामान्य माणूस तसंही त्यापेक्षा अधिक काहीच करू शकत नाही.

ते दोघे ९ वर्षं जिवंत होते, हे भारतीय न्यायव्यवस्थेचं अपयश म्हणावं का?

वॉरंट घेऊन CBI लालूंना अटक करायला गेली आणि एका भलत्याच संकटात अडकली!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version