लाल रंग पाहिल्यावर बैल उधळतात? अफवा की सत्य?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
तुम्ही अनेक मराठी / हिंदी सिनेमांमध्ये बैलगाडीच्या शर्यतीचा प्रसंग पाहिला असेल. शर्यत अगदी रंगात आलेली असताना खलनायक गुपचुप खिशातून लाल रुमाल काढून नायकाच्या बैलांसमोर नाचवतो आणि नायकाचे बैल उधळतात, सैरावैरा धावू लागतात, त्याला शर्यतीपासून बाजूला नेऊ लागतात.
इकडे प्रेक्षक जीव मुठीत धरून तो थरार अनुभवत राहतो. त्यावेळी ‘बैल लाल रंग पाहून चवताळतात’ ही कधीतरी ऐकलेली गोष्ट चटकन आठवते, मात्र त्यामागील नेमकं विज्ञान आजपर्यंत कधी वाचलं आहे का?
मराठी सिनेमातील ही काही हमखास पैसा वसूल दृश्ये आहेत. यात नायक-नायिका असले तरी खरा हीरो असतात ते त्या सीन मधले ते बैल! तर महत्वाचा मुद्दा म्हणजे बैल उधळण्यास कारणीभूत ठरतो तो लाल रंग!
आधीच आपल्या काही रूढी आणि समजांमुळे लाल रंग पाहिला की गाय, बैल असे प्राणी बिथरतात असे आपल्याकडे मानले जाते म्हणून आज देखील आपण लाल रंगाचे काही घातले असेल तर अशा प्राण्यांसमोरून जाणे टाळतो. खरंच असे आहे का? गाय ,बैल किंवा तत्सम प्राण्यांना लाल रंगाचे वावडे असते का? नक्की काय आहे मामला? चला जाणून घेऊ .
तुम्हाला बुल-फाईट हा खेळ माहिती आहे का? कोरिया,चीन, ईजिप्त, ग्रीस व रोम या देशांसोबतच आफ्रिकेतील मूर लोकांनी स्पेन जिंकल्यानंतर हा खेळ तेथे खेळला जाऊ लागला. पुढे तो स्पेनचा राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता पावला. तिथे तो ‘कॉरिदा दी तोरोस’ या नावाने ओळखला जातो.
स्पेन प्रमाणे मेक्सिको, मध्य व दक्षिण अमेरिका, मोरोक्को, द. फ्रान्स या भागांतही हा खेळ खेळला जातो. माणूस आणि बैल यांच्यातील झुंजीचा हा रोमहर्षक रंजनप्रकार! एका विस्तीर्ण रिंगणात (प्लाझा दी तोरोस) ही झुंज खेळली जाते.
अठराव्या शतकात स्पॅनिश अमीर-उमरावांमध्ये हा खेळ फार लोकप्रिय होता, तथापि पुढे हा प्रकार मागे पडला व त्यात व्यावसायिक खेळाडूंनी पदार्पण केले, परिणामतः झुंजीच्या पद्धतीस नवे वळण मिळाले.
घोड्यावर बसून बैलाशी झुंज देण्याची ही पद्धत सुमारे ६०० वर्षे रुढ होती. परंतु फ्रान्सीस्को रॉमेरो या आद्य व्यावसायिक खेळाडूने १७२६ च्या सुमारास केवळ एक तांबडे निशाण आणि तलवार या साधनांनिशी बैलाशी झुंज देण्याची पद्धत सुरु केल्याने तीच पुढे कायम स्वरुपात रुढ झाली. या झुंजीतील महत्वाचे घटक म्हणजे मेटेडोर, बैल आणि तो जगप्रसिद्ध लाल रुमाल, जो फडकावून बैलाला लढण्यासाठी आमंत्रित केले जाते.
पण यातले खरे गुपित काय आहे हे माहिती आहे का? वास्तविक बैलालाच काय, पण कोणत्याच जनावराला रंगांची दृष्टी असत नाही. विविध रंग ओळखणाऱ्या पेशी त्यांच्या डोळ्यात असत नाहीत. तेव्हा लाल रंगाचा नेमका वेध घेण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. पण मग स्पेनमध्ये खेळल्या जाणाऱ्या बुलफाइटिंगच्या खेळातही तो मेटेडोर लाल रंगाचा कपडा घेऊन त्या माजलेल्या वळूला का उकसावत असतो?
खरं तर त्याच्या हातातला कापडाचा लाल रंग हा परंपरेचा भाग आहे त्या लाल रंगाऐवजी त्यानं दुसऱ्या कोणत्याही रंगाचा फलक घेतला तरी काहीही फरक पडणार नाही बैल मुसंडी मारतो तो त्या कापडी फलकाच्या हेलकाव्यामुळे!
सुरुवातीला दुरून तो फलक फडफडवून मेटेडोर बैलाचं लक्ष वेधून घेतो, त्या फलकाच्या हेलकाव्याने बैलाला डिवचत राहतो. त्या फलकावर धावून जायला त्याला उद्युक्त करतो.
मग त्या फलकावर बैल धावून आला की ऐन वेळी त्याची जागा बदलत त्या बैलाला दमवून सोडतो त्यानंतर तो फलक हळुवारपणे जवळून फडकवला तरी बैलाजवळ त्याच्यावर धावून जाण्याइतकी शक्ती राहिलेली नसते. त्या वेळी तो फलक त्याच्या समोर ठेवला तरी तो त्याच्यावर हमला करत नाही. अगदी डोळ्यांसमोर लाल रंगाचा फलक असूनही तो एका जागीच बसून राहतो. त्यावरूनही त्या लाल रंगाचा आणि त्याच्या उधळण्याचा संबंध नाही हेच स्पष्ट होते.
तेव्हा मित्रांनो आता बैलासमोरून लाल रंगाचे कपडे घालून जायला काहीच हरकत नाही कारण तो बैल देखील मनात म्हणत असेलच की, ये लाल रंग कब मुझे छोडेगा….
—
- “माझ्यासाठी हा फोटो म्हणजे अब्जावधींची श्रीमंती आहे”
- नंदीच्या कानात सांगितलेली इच्छा पूर्ण होते असं का म्हणतात? यामागची पौराणिक कथा वाचाच
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.