तुम्ही हॉटेलमध्ये छुपे चार्जेस देत आहात! समजून घ्या “सर्व्हिस चार्ज” नावाची उघड फसवणूक!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतीय एकवेळ बाकी सगळ्या गोष्टींशिवाय राहू शकतील पण हॉटेलमधील खाण्याशिवाय राहू शकणार नाही. हॉटेलात खादाडी झाल्यानंतर सर्वात नावडती गोष्ट येते ती म्हणजे बिलाची. सर्विस टॅक्सबद्दल मागे उहापोह झाला होता. आता केंद्र सरकारनं सर्व्हिस चार्जेच्या मुद्दयावर लक्ष घातलं आहे.
हॉटेल किंवा रेस्टॉरंटच्या बिलात सर्विस चार्ज लावणे बेकायदेशीर असल्याचे सांगत केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या बिलात सर्विस चार्ज बिलात समाविष्ट करु नये, यासाठी दिशानिर्देश दिले जाणार आहेत. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ़ इंडिया (NRAI) ही संस्था केंद्राच्या सूचनेनुसार निर्देश देणार आहे.
काय असतो सर्विस चार्ज :
हॉटेल किंवा रेस्टॉरंट बिलात जो सर्विस चार्ज समाविष्ट केलेला असतो तो खरं तर ऐच्छिक असतो. ग्राहकाला वाटलं तरच तो हा सेवा कर देऊ शकतो, त्यानं तो दिलाच पाहिजे असं बंधन नसतं. सेवा कर म्हणजे तुम्हाला जी सेवा हॉटेलमधे दिली जाते त्यासाठीचं शुल्क.
जेव्हा आपण एखादी वस्तू अथवा सेवा विकत घेतो तेव्हा त्यासाठी आपल्याला त्याचे पैसे भरावे लागतात. याला सर्विस चार्ज असं म्हणतात. आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेव्हा आपल्याला जेवण वाढले जाते ती एक प्रकराची सेवा असल्याने त्याला सर्विस चार्ज म्हंटलं जातं. ग्राहक देखील कोणत्याही प्रकारचा प्रश्न न विचारता हा चार्ज भरतात. हा चार्ज बिलाच्या वेळी भरला जातो, प्रत्यक्ष सेवा घेताना नव्हे.
बिलाचं स्वरूप :
सर्विस चार्ज हा बिलाच्या सर्वात शेवटी लावलेला असतो. आपण एका उदाहरणातून समजून घेऊयात जर आपलं बिल १००० पर्यंत झालं असेल तर आपल्याला ५% हा सर्विस चार्ज भरावा लागतो. सर्विस चार्ज म्हणजे एक प्रकारची जबरदस्तीची टीप.
मग काय असतो सर्विस टॅक्स ?
सर्विस टॅक्स हा सरकारकडून वसूल केला जाणारा टॅक्स असतो. खरं तर हा टॅक्स जो सर्विस देत आहे त्याने भरायचा असतो. परंतु अखेरीस हा टॅक्स जो सर्विस वापरतो आहे त्यालाच भरावा लागतो.
हॉटेल व्यावसायिकांचे या सर्विस चार्जेबाबात मत काय?
नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ़ इंडिया (NRAI) आणि फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मतानुसार हा चार्ज बेकायदेशीर नाही. सर्विस चार्जे हा एक प्रकारचा पारदर्शक, कामगारांसाठी अनुकूल असलेला हा चार्ज सर्वांना ठाऊक असतो. तसेच या चार्जचा सरकारला देखील फायदा होता.
हॉटेल व्यावसायिक सर्विस चार्जेचा वापर कुठे करतात?
हॉटेल व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार ग्राहकांकडून गोळा केलेल्या सर्विस चार्ज मधील मोठा भाग हा हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना दिला जातो. तसेच कर्मचाऱ्यांच्या चांगल्या वाईट काळात त्यांना मदत करण्यासाठी एका फंडात जमा केला जातो. कर्मचाऱ्यांना पगार दिलाच जातो मात्र सर्विस चार्ज हा त्यांना प्रोत्साहन म्हणून दिला जातो.
–
- ३५ रुपयांचा रिफंड, ५ वर्षांची चिकाटी आणि अखेर न्यायव्यवस्थेची माघार!!
- हॉटेलमध्ये राहताना नकळत होणारी फसवणूक टाळण्यासाठी या ७ गोष्टी फायद्याच्या
–
एखाद्या ग्राहकाला जर हा टॅक्स भरायचा नसल्यास तो तसे करू शकतो. तसेच हॉटेलमध्ये वेटरना जर टीप द्यायची नसेल तर तसेही ग्राहक करू शकतो. सर्विस टॅक्स केवळ वेटरनाच नव्हे तर किचनमध्ये काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांना देखील मिळतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.