Site icon InMarathi

लग्नाआधी मुलांनी या ७ गोष्टी शिकल्या नाहीत, तर संसार सुखाचा होऊच शकत नाही!

shreyas prarthana im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आचार्य अत्रे यांनी लिहिलेले ‘लग्नाची बेडी’ हे भन्नाट नाटक तुम्हाला आठवतेय का? किंवा तुम्ही ते पाहिले आहे का? हे विचारण्याचे एकच कारण म्हणजे जसे घर पहावे बांधून तसेच लग्न पहावे करून हा आपल्या वाडवडिलांनी दिलेला सल्ला!

खरंतर आता शादी का लड्डू, खाये तो पछताये; न खाये तो पछ्ताये…अशीच गत असते राव, पण तरीही आपल्या आयुष्यातली लग्न ही अशी घटना आहे जी आपले आयुष्य पूर्णपणे बदलून टाकते.

 

 

 

लग्नानंतर नवीन नाती, नवीन माणसे या सगळ्या नव्या नवलाईत पहिली काही वर्षे भुर्रकन उडून जातात; पण हाच काळ खूप महत्त्वाचा असतो. एकमेकांना समजून घेण्यासाठी.

अगदी छोट्या छोट्या सवयींपासून स्वभाव पर्यंत सगळे हळूहळू उलगडत जाते. एकमेकांचे सूर जुळतात. संसाराचा पाया तयार होतो. एक अतूट नाते तयार होते.

लग्नाआधीचं आपलं आयुष्य स्वत:पुरतंच मर्यादीत असतं लग्नानंतर हे बदललेले आयुष्य सुरळीत असावे अशी आपल्या सगळ्यांचीच ईच्छा असते. मग मित्रांनो हा शादी का लड्डू खायचा असेल तर काही पथ्य तर पाळावीच लागतील. खासकरून मुलांना! काय आणि कोणती आहेत बर ही पथ्ये?

१. सवयी :

लग्नानंतर विशेषत: मुलांना आपल्या अनेक सवयी बदलाव्यात.

जसे की, अंघोळीनंतर आपला ओला टॉवेल बेडवर टाकणे, टुथब्रश दात घासल्यानंतर बाथरूम मध्येच ठेवणे, आपले शेव्हिंग किट शेव्ह केल्यानंतर बेसिनवरच ठेवणे आशा अनेक सवयी बदलाव्या लागतात. ज्यामुळे तुमच्या पत्नीसमोर तुमचे पहिले इंप्रेशन चांगले होईल.

२. अस्वच्छता :

 

जर तुम्ही तुमच्या वस्तु जागेवर ठेवल्या नाहीत, तर तुमचा जोडीदार वैतागू शकतो. तुमची बेडरूम आणखी अस्वच्छ दिसू शकते.

कपडे, मोजे व्यवस्थित ठेवणे, बेडरूम स्वच्छ ठेवणे, तुमची जबाबदारी आहे. कारण अनेकदा अस्वच्छता हे तुमच्या जोडीदारासोबत भांडणाचे कारण होऊ शकते.

३. समंजसपणा :

एकमेकांबद्दल प्रेम, विश्‍वास आदर बाळगा. समोरच्याने बदलण्याची अपेक्षा न धरता स्वतःत बदल घडवा. ज्या दिवशी भांडण होईल, ते “त्याच’ दिवशी मिटवा. एकमेकांशी अबोला धरू नका. बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला.

४. घरात कमी वेळ घालवणे :

मुलं सहसा घरात कमी वेळ घालवतात. त्यांना मित्रांसोबत बाहेर फिरायला, लेट नाईट पार्टी करायला आवडते. मात्र लग्नानंतर मुलांनी आपला जोडीदार आपली घरी वाट पाहतोय, याचे भान ठेवायला हवे.

५. आपल्या जोडीदाराला पुरेसा वेळ द्या :

 

 

लग्नानंतर मुली एकदम अनोळखी वातावरणात आलेल्या असतात, त्या पटकन नवीन ठिकाणी, नवीन माणसांमध्ये रुळू शकत नाहीत. अशावेळी त्यांना आपल्या जोडीदाराचाच आधार असतो, तेव्हा एकमेकांना वेळ द्या (दोघेच फिरायला जा. गप्पा मारा.)

प्रेम आहेच; पण ते व्यक्त करणेही खूप गरजेचे असते. छोट्या-मोठ्या प्रसंगांमधून काळजी, आधार, कौतुक, प्रेम हे भाव व्यक्त होऊ द्या (उदाहरणार्थ: आय लव्ह यू, तू आज छान दिसतेस, किती दमलीस तू…इत्यादी)

६. घरकामात मदत न करणे :

मुलं लग्नाआधी सहसा घरकामास मदत करत नाहीत, मात्र लग्नानंतर मुलाने ही सवय बदलायला हवी. प्रत्येक जोडीदार मुलीला तिच्या पतीने घरकामास मदत केलेली आवडते.

 

 

तुम्ही आपल्या पत्नीला घरकामात केलेली थोडीशी मदत तुम्हाला अधिक जवळ आणू शकते, ज्यातून तुम्हाला एकमेकांना समजून घेण्यास तुम्हाला मदतच होईल.

७. कोणताही निर्णय परस्पर घेणे व तसे वागणे :

बॅचलर आयुष्य जगताना मुलांना ‘मेरी मर्जी’ ची सवय असते. ही गोष्ट लग्नानंतर बदलायला हवी. आधी तुम्ही एकटे असता लग्नानंतर तुम्ही दोघे होता म्हणून कोणताही निर्णय घेण्याआधी तुम्ही आपल्या जोडीदारालाही विश्वासात घ्यायची सवय लावून घ्या.

नात्यातला हा विश्वासच तुम्हाला आयुष्यात पुढे यशस्वी करतो. कोणताही निर्णय परस्पर न घेता जोडीदाराच्या सहमतीने घ्या.

सर्वात महत्वाचे लग्नाआधी आपण काय करत होतो, कोण होतो या सारख्या गोष्टींमध्ये रमू नका. त्याऐवजी आपल्या जोडीदारासोबतचे भविष्य सुरक्षित करा.

मित्रांनो लग्नाआधी ही नियमांची सप्तपदी चांगली रट्टा मारून पाठ करा. कारण संसार सुखी असेल तर घरात सुख-समाधान व शांती नांदेल.

दिवसभर कुठेही असा; संध्याकाळी सगळ्यांनाच घरी परतण्याची ओढ असेल;कधीतरी वाद होणारच; पण त्यांचे प्रमाण “जेवणातल्या मिठाएवढेच!’ असेल हे मात्र नक्की.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version