कोहिनूर गमावणारा, बाई, बाटली आणि अय्याशीत मुघलांना कर्जबाजारी करणारा विक्षिप्त राजा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मुघल साम्राज्यातील राजांनी भारताच्या जनतेला नेहमीच त्रास दिला आहे. शेतकऱ्यांकडून शेतीमधील पिकांचा मोबदला घेणे, हिंदू मंदिरांना उद्धवस्त करणे, महिलांची छेड काढणे हे दिल्लीतून सत्ता चालवणाऱ्या मुघल राजांचा नित्यक्रम होता.
जनतेच्या संपत्तीवर कायमच डोळा असणारा आणि नेहमीच बेधुंद असलेल्या राज्यांमध्ये ‘मोहम्मद शाह’ या राजाचा क्रमांक सर्वात आधी येतो. दिल्लीत आपलं ठाण मांडून बसलेल्या या राजाला त्याच्या वागणुकीमुळे ‘रंगीला’ या नावाने ओळखलं जायचं.
औरंगजेबच्या कार्यकाळानंतर मोहम्मद शाह हा राजगादीवर बसला होता. औरंगजेबच्या कारकिर्दीत त्याने जो सत्ता विस्तार केला, दिल्लीवर आपल्या सत्तेचं नियंत्रण प्रस्थापित केलं त्याच्या पूर्णपणे विपरीत काम मोहम्मद शाहने केलं होतं.
असं सांगतात की, औरंगजेबने त्याच्या राज्य काळात फक्त लढाईच केली. त्याचा मृत्यू सुद्धा एका लढाईतच झाला होता. मुघलांच्या इतर राजांप्रमाणे औरंगजेबला संगीत, नृत्य या विषयात अजिबात रुची नव्हती. औरंगजेबच्या काळात दिल्लीतील सर्व कलाकारांवर उपासमारीची वेळ आली होती. पण, त्यानंतर मोहम्मद शाह सत्तेवर आला आणि त्याने हे चित्र बदललं.
दिल्ली सोडून गेलेल्या सर्व कलाकारांना त्याने दिल्लीत परत बोलावलं. त्या काळात ‘ध्रुपद’ गायकी ही मोठ्या प्रमाणावर प्रचलित होती. मोहम्मद शाहने ती पद्धत बदलली आणि त्याने ‘ख्याल’ पद्धतीच्या गायकीची मैफिल भरवण्याची सुरुवात केली. गायकच नाही तर त्यांनी सर्व चित्रकारांना सुद्धा दरबारात स्थान दिलं.
स्त्रीयांच्या बाबतीतही तो अत्यंत संपट होता. सदासर्वकाळ स्त्री सेवक त्याच्या अवतीभवती लागायचे. अनेक महिलांना त्याने जबरदस्तीने गुलाम म्हणून नेमले होते. त्यावरूनच रंगीला ही त्याची उपाधी प्रसिद्ध झाली होती. या सर्वांमुळे राजकारण, प्रजा, सत्ता या गोष्टींचा त्याला विसर पडायचा.
‘निदा’ नावाचा चित्रकार हा दररोज दरबारात येऊ लागला. ‘राजाचे चित्र तयार करणे’ हे एकच त्याला काम देण्यात आलं होतं. ‘राजाबाबू’ मधील गोविंदा प्रमाणे मोहम्मद शाहने आपला पूर्ण दरबार हा स्वतःच्या चित्राने भरवून टाकला होता.
मोहम्मद शाहच्या कारकिर्दीत मुघल साम्राज्याने एकही लढाई लढली नाही. मोहम्मद शाहच्या काळात दिल्ली दरबारात केवळ कोंबड्यांची लढाई व्हायची, घोड्यांच्या स्पर्धा व्हायच्या. विविध नर्तिका, गायिका यांच्या जुगलबंदी ठेवल्या जायच्या.
राज खजिना किती संपत आहे याकडे या राजाचं अजिबात लक्ष नव्हतं. दरबारात अशा काही नर्तिकांना स्थान देण्यात आलं होतं ज्यांच्या सोबत राजा स्वतः स्त्रीवेष परिधान करून दरबारात नाचायचा. एकेकाळी केवळ युद्ध, विजयोत्सव साजरा करण्यात व्यस्त असलेली दिल्ली आता मनोरंजन नगरी झाली होती.
दिल्लीत मुघल साम्राज्याचा वाढता खर्च बघून नादिर शाह यांना चौकशीसाठी पाठवण्यात आलं होतं. तरीही मोहम्मद शाहचा उन्मत्तपणा कमी होत नव्हता. मुघल साम्राज्याकडून आलेली चिठ्ठी नादिर शाहने मोहम्मद शाहला दिली तेव्हा त्याने ती चिठ्ठी दारूत बुडवून टाकली होती. या कृतीचं कारण विचारल्यावर मोहम्मद शाहने हे सांगितलं की, “अशा चिठ्ठी या दारुतच बुडवल्या पाहिजेत.” हे वाक्य ऐकून नादिर शहची तळपायाची आग मस्तकाला गेली. तो दिल्लीतून निघून इराणला गेला आणि त्याने मोहम्मद शाहवर आक्रमण करण्याची घोषणा केली.
नादिर शाह आपलं सैन्य घेऊन दिल्लीत दाखल झाला. मोहम्मद शाहच्या मंत्र्यांनी त्या ‘रंगीला’ राजाला या लढाईला सामोरं न जाता नादिर शाहला शरण जाण्याचा सल्ला दिला. उन्मत्त राजा नादिर शाहचं सैन्य बघून ताळ्यावर आला होता. नादिर शाहला शरण जाण्यास तो तयार झाला. नादिर शाहने या संधीचा फायदा घेण्याचं ठरवलं आणि त्याने मोहम्मद शाहला उपलब्ध असलेली सर्व संपत्ती, दागिने मागितले. नादिर शाहचा डोळा हा कोहिनुर हिऱ्यावर होता. पण, पूर्ण तिजोरी लुटल्यावर देखील तो त्याच्या हाती लागला नव्हता.
मोहम्मद शाहला सुद्धा कोहिनुर हिऱ्याची प्रचंड आवड असल्याने त्याने तो आपल्या मुकुटात ठेवला असल्याची बातमी नादिर शाहपर्यंत पोहोचली होती. शरण गेल्यावर ठरलेल्या बोलणी प्रमाणे मोहम्मद शाहने खजिना देणं क्रमप्राप्त होतं. त्यामुळे नादिर शाह त्याला कोहिनुर हा त्याच्या मुकुटात असलेला हिरा मागू शकत नव्हता. तेव्हा नादिर शाहने एक शक्कल लढवली.
कोहिनुर हिरा मिळावा यासाठी नादिर शाह ५६ दिवस दिल्लीत तळ ठोकून बसला होता. “कोहिनुर हिरा नेमका कुठे आहे ?” याची माहिती त्याने मोहम्मद शाहच्या प्रधान पदावरील व्यक्तीला फितवून काढून घेतली होती.
दिल्लीचा निरोप घेत असतांना त्याने मोहम्मद शाहला सांगितलं की, “आमच्याकडे इराण मध्ये अशी प्रथा आहे की, आम्ही पाहुण्यांना निरोप देत असतांना आमचा मुकुट त्याला देत असतो आणि त्याचा मुकुट आम्ही घेत असतो. तेव्हा आपण आपल्या मुकुटांची अदलाबदली करूयात.” भर सभेत बोललेल्या या वाक्याला दुजोरा देण्याशिवाय मोहम्मद शाहकडे दुसरा पर्याय नव्हता.
मोहम्मद शाहने आपला मुकुट काढून नादिर शाहच्या डोक्यावर ठेवला आणि त्याचा मुकुट त्याने आपल्या डोक्यावर ठेवून घेतला. संपत्ती असतांना त्याची कदर न करणारा राजा आता पूर्णपणे कंगाल झाला होता.
१७०२ मध्ये जन्मलेला मोहम्मद शाह याला वयाच्या १७ व्या वर्षी तैमुरिया या जागेची सत्ता मिळाली होती. कमी वयात आणि सहजतेने मिळालेल्या सत्तेमुळे तो बेजबाबदार होत गेला असं बोललं जातं. मोहम्मद शाहच्या कर्मामुळे त्याला ‘सदा रंगीला’ ही उपाधी देण्यात आली होती.
त्याच्या जन्माच्या वेळी औरंगजेबने ‘इस्लाम’ धर्मातील सर्व नियम पूर्ण भारतावर लादले होते आणि त्याचा विद्रोह म्हणून मोहम्मद शाह असा वागायचा असं ‘मरकए दिल्ली’ या पुस्तकात म्हंटलं आहे.
‘मरकए दिल्ली’ या पुस्तकात इस्लाम धर्म, भारतातील विविध दर्गा, फकीर ‘शरीफ महोत्सव’ यांचा देखील उल्लेख आहे. मोहम्मद शाहच्या मृत्यूबद्दल या पुस्तकात हे लिहिण्यात आलं आहे की, ४६ वर्षांचा असतांना या राजाला हृदयविकाराचा झटका आला होता. ‘हयात बक्ष’ या हकीमाकडे त्याला नेण्यात आलं होतं. पण, सततच्या दारूच्या नशेमुळे मोहम्मद शाहचं यकृत निकामी झालं आणि १५ एप्रिल १७४८ रोजी त्याचं निधन झालं.
मोहम्मद शाह याला मुघल साम्राज्याच्या भारतातील अंत होण्यास जबाबदार ठरवलं जातं. स्वमग्न असलेल्या या राजाने कधीच सैन्य सुरक्षित ठेवण्याचा पण विचार केला नाही. मोहम्मद शाहच्या मृत्यूनंतर अहमद शाह अब्दाली आणि नादिर शाह यांनी पुन्हा भारतावर आक्रमण केलं आणि सत्तांतर झालं.
—
मुघल वंशातील शेवटची बेगम जगतीये कलकत्त्यात हलाखीचे जीवन!
हिंदूंऐवजी मुघल सम्राज्याचं उदात्तीकरण – आपल्याला शिकवला जाणारा फसवा इतिहास!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.