Site icon InMarathi

शाळेतून झाला बेदखल पण ७००० रु लिटरने गाढविणीचं दूध विकून बाबू झालाय श्रीमंत!

donkey im 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पूर्वी पुढे काय करियर करायचं असा विचार केल्यानंतर साधारणपणे डॉक्टर, इंजिनियर, सीए हेच पर्याय उत्तम मानले जायचे. आजही त्यांचं महत्त्व कमी झालेलं नाहीच. पण आपल्याला उद्योजक व्हायचंय अशी इच्छा आज कुणी व्यक्त करतं तेव्हा आपोआपच त्या व्यक्तीकडे आणि त्याच्या स्वतःवरल्या विश्वासाकडे लोकांच्या नजरा वळतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

यशस्वी बिझनेसमन्सची उदाहरणं समोर असायची पण तशी कमी असायची. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आजच्या घडीला उद्योजक व्हायची क्रेझ अनेकांमध्ये दिसते. तरी प्रत्येकाला यशस्वी उद्योजक होता येतंच असं नाही. त्यासाठी तुमच्याकडे वेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता असावी लागते. ग्राहकाची नस ओळखून त्यानुसार कल्पक योजना आखून ग्राहकाच्या मागणीचा आपण पुरवठा करू शकू असा आधी स्वतःवर विश्वास असावा लागतो. ही झाली अगदीच प्राथमिक तयारी.

 

 

खरी आव्हानं तर यानंतर सुरू होतात. प्रचंड मोठ्या भांडवलाची जमवाजमव करणे इथपासून सातत्याने प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देता यावी म्हणून नवनव्या गोष्टी शिकत राहणे, स्वतःला सतत अपडेटेड ठेवणे अशी बरीच तयारी उद्योजकाला करावी लागणार असते. तरुण तरुण मंडळी उद्योजक व्हायचं हे आव्हान अगदी लीलया पेलताना दिसतात तेव्हा थक्क व्हायला होतं. अशीच एक किमया केलीये बाबू नावाच्या एका तरुणाने.

शाळेतून बेदखल झालेला हा बाबू ७००० रुपये लिटरच्या भावाने गाढविणीचं दूध विकून श्रीमंत झालाय. आपण हे करावं ही ठिणगी बाबूच्या मनात नेमकी केव्हा पडली? त्यादृष्टीने त्याने काय पावलं उचलली? समोर आलेल्या आव्हानांचा कसा सामना केला? जाणून घेऊ.

गाढविणीचं दूध विकायला कशी झाली सुरुवात?

बाबू या तरुणाने तिरुनेलवेलीजवळ तामिळनाडूमधलं पहिलंवहिलं ‘डॉंकी फार्म’ उभारलं आहे. मात्र त्यामागे बाबूचे कष्ट होते आणि नशिबाचीही साथ त्याला लाभली. बाबूला शाळेतून ड्रॉपआउट केलं होतं. ११वी पर्यंतचं आपलं शिक्षण त्याने पूर्ण केलं. मात्र त्यानंतर त्याने एक वेगळीच वाट धरली. फार्मा उत्पादनांच्या वितरणाच्या कामात तो उतरला.

नेमकी त्याच वेळी स्त्री आणि पुरुष दोघांनाही वापरता येतील अशी २८ सौंदर्य प्रसाधनं बनवणारी एक कंपनी दर महिन्याला गाढविणीचं १००० लिटर दूध कुठे मिळू शकेल याचा शोध घेत होती. तामिळनाडूमध्ये २००० पेक्षाही कमी गाढवं आहेत आणि प्रत्येक गाढवीण दिवसाला केवळ ३५० मिलिलिटर इतकंच दूध देते आणि तेही केवळ ६ महिनेच देते हे त्याच्या लक्षात आलं. आपण ‘डॉंकी फार्म’ उभारावं हा विचार तेव्हाच त्याच्या मनात आला.

 

 

आपल्याला तिरुनेलवेलीजवळ ‘डॉंकी फार्म’ सुरू करायचं आहे हे त्याने आपल्या घरच्यांना सांगितलं. पण याकरता त्याच्या बायकोसकट कुणाकडूनही त्याला पाठिंबा मिळाला नाही. गाढविणीच्या दुधाला किती मागणी आहे हे त्याने त्यांना सांगायचा प्रयत्न केल्यावरही कुणी त्याला पाठिंबा द्यायला राजी झालं नाही. पण त्यानंतरही हार न मानता बाबूने त्याचे प्रयत्न सुरूच ठेवले.

गाढविणीचं १० मिलीलिटर दूध ५० रुपयांना विकणारे व्रिद्धचलम जिल्ह्यातले काही लोक त्याला आढळले. त्यानंतर बाबूने त्याच्या मित्राकडून १७ एकर जमीन भाड्याने विकत घेतली आणि तिथे ‘डॉंकी पॅलेस’ उभारलं. तिथे त्याने १०० गाढवांना वाढवायला सुरुवात केली. या गाढवांची काळजी घ्यायला त्याने पदालमजवळच्या पूवानुर येथून ५ गाढवांचं कुटुंब आणलं.

सध्या त्याच्या फार्म मध्ये गुजरातची हलारी जातीची गाढवं आहेत, तामिळ नाडूच्या गाढवांच्या स्थानिक प्रजातीतली गाढवं आहेत आणि महाराष्ट्रातील कटियावाडी प्रजातीची गाढवं आहेत. तिथल्या स्थानिक गाढविणींची किंमत ४०,००० आहे तर हलारी जातीच्या गाढविणींच्या दिवसाच्या एक लिटर दुधाची किंमत १ लाख आहे.

दुधाला मागणी का आहे?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दुधाला मागणी का? तर या दुधाचा वापर सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो तसेच हे दूध तान्ह्या बाळांसाठी खूप फायदेशीर ठरते. या दुधाचे औषधी गुण देखील आहेत. सर्वप्रकाराचे वात, अर्धांगवायू, पक्षाघातासारखे रोज या दुधाने बरे होतात.

 

 

गाढवांची काळजी :

 

लग्न मोडलं, पण तिने गरिबांना १९ लाख रुपयांचे जेवण खाऊ घातले…वाचा काय आहे हे प्रकरण!

अशी भन्नाट स्ट्रॅटेजी, की ४ वर्षात उभारला १०० कोटींचा बिझनेस, प्रत्येकाने शिकावे असे बिझनेस धडे

गाढवांच्या चाऱ्यासाठी बाबू वेगवेगळ्या प्रकारचे ऊस, हिरवं गवत, नाचणी इत्यादी गोष्टींचं उत्पादन करतो. गाढवांच्या पुनरुप्तादनाकडे, त्यांच्या पोषणाकडे, स्वच्छतेकडे, गाढविणी दूध देताहेत की नाही याकडे पूवानुर कुटुंब लक्ष देतं. सर्दी झालेल्या गाढवांची विशेष काळजी घ्यावी लागते.

आज अनेकजण तरुण नोकरीच्या मागे न धावता व्यवसायाची वाट धरून त्यात वेगवेगळे प्रयोग करून यशस्वी होत आहे. कधीकाळी शेती सोडून नोकरीच्या मागे लागणारे तरुण आज पुन्हा एकदा शेतीकडे वळत आहेत. येत्या काही वर्षात आपला देश एक समृद्ध आणि शेतीप्रधान देश म्हणून जगभरात आपली ओळख निर्माण होईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version