' पॅकेज सोडा, अरेंज मॅरेज करताना या ५ गोष्टी बघितल्या नाहीत, तर लग्न जुळणं अशक्यच – InMarathi

पॅकेज सोडा, अरेंज मॅरेज करताना या ५ गोष्टी बघितल्या नाहीत, तर लग्न जुळणं अशक्यच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

घरात उपवर मुले –मुली असली, की पालकांना त्यांच्या लग्नाची हमखास काळजी असते. शिवाय, काळानुसार प्रेम विवाह करणं यात देखील फारसे अप्रूप राहिले नाही आहे, पण सगळ्यानाच प्रेम विवाह करायला जमतंच असं नाही. लग्नाच्या गाठी या स्वर्गातच जुळलेल्या असतात , यावर आजही बहुतांश पालकांचा विश्वास आहे.

विवाह विषयक जाहिरातींमध्ये मुला-मुलींचे वर्णन कायम गुडी गुडी स्वरुपात केलेले असते. जसे, मुलगा सालस, निव्यर्सनी, उत्तम पगार किंवा मुलींच्या बाबतीत सोज्वळ, गौर वर्णी, मनमिळाऊ वगैरे.

 

marriage inmarathi

 

खरे तर या तुटपुंज्या अपेक्षांमधून मुलगा किंवा मुलगी कुणाचेच नेमके चित्रण स्पष्ट होत नाही. अशाने नेमके होते काय, की खूप अपेक्षा मनांत निर्माण झाल्याने, प्रत्यक्ष भेट झाल्यावर वेगळेच चित्र पहायला मिळते आणि अपेक्षाभंगाचे दु:ख पदरी पडते.

मग हा नको पुढचा मुलगा / मुलगी बघू, असे करता-करता वय देखील वाढत जाते. मग जे मिळेल ते स्वीकारून बोहल्यावर चढले जाते. लग्नासारखा महत्वाचा निर्णय जर चुकीच्या मापदंडावर आधारला असेल तर त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात.

या निराशेवर मात करण्यासाठी आणि ठरवून विवाह करण्याकडे कल असणाऱ्यांनी जर आपल्या भावी जोडीदार विषयी नेमका विचार केला तर लग्न जमवणं ही तितकीशी त्रासदायक बाब ठरणार नाही. त्यासाठी पुढील बाबींचा आवर्जून विचार करावा.

१) सुसंवाद  –

 

couple im

 

जेव्हा तुम्ही भावी जोडीदारला भेटण्यासाठी जाता, तेव्हा एकाच भेटीत निर्णय न घेता चार-पाच वेळा भेटा. जोडीदाराविषयी नेमक्या अपेक्षा काय आहे, हे स्पष्ट करा.

या भेटी कधी मॉल मध्ये असू द्या, कधी बागेत तर कधी एखाद्या निवांत जागी, जेणेकरून ती व्यक्ती त्या त्या ठिकाणी कशी वागते त्याचबरोबर संवाद साधायाला किती उत्सुक आहे याचा एक अंदाज येतो.

२) ध्येय  –

जोडीदाराला भेटायला जाताना त्याचे/तिचे वैयक्तिक आणि खासगी ध्येय काय आहे हे जाणून घ्या. त्या व्यक्तीची आर्थिक महत्वाकांक्षा जाणून घ्या.

एखादेवेळी असे असते, की जोडीदारपैकी एकाला आयुष्यात बरेच काही करायचे असते आणि त्याचवेळी दुसऱ्याला शांत-सरळ आयुष्य जगायचे असते. नेमके ध्येय कळल्यास आपण एकमेकांना कितपत साथ देऊ शकतो याचा अंदाज येतो.

३) कौटुंबिक विचार –

 

family im

 

पुरेशा भेटी – गाठी झाल्यानंतर तुम्हाला आता बऱ्यापैकी त्या व्यक्तीचा अंदाज आलेला असतो. त्या व्यक्तीचे कुटुंबाशी कशा प्रकारचे नाते आहे, मित्र-परिवार कसा आहे, कौटुंबिक नाते-संबंधाविषयी त्याची काय मते आहेत हे जाणून घ्या.

जसे की,काही माणसे कुटुंबात एकदम लोकप्रिय असतात. त्यांच्या घरी सतत माणसांचा राबता असतो तर काही एकांत प्रिय असतात. यामुळे एखाद्या कुटुंबात आपण कितपत फिट होऊ शकतो अथवा त्यात कितपत तडजोड करावी लागेल याचा अंदाज घेता येतो.

४) तुमच्या विषयी असलेली वागणूक –

 

First meet couple IM

 

जेव्हा तुम्ही तुमच्या भावी जोडीदाराला भेटता, तेव्हा त्या व्यक्ती तुमच्याशी कशा पद्धतीने वागते याचा अंदाज घ्या. अगदी लहान गोष्टींपासून सुरुवात करा.

तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर ती तुमच्यासाठी प्रथम खुर्ची ओढते का? किंवा तुमचे बोलणे लक्षपूर्वक ऐकते का? किंवा तुम्ही हजर नसताना तुमची खिल्ली उडविली जाते का हे देखील जाणून घ्या. जेणेकरून समोर एक आणि मागे दुसरी अशा प्रकारची तर ती व्यक्ती नाही ना याचा अंदाज येऊ शकेल .

५) आतला आवाज  –

इथे ‘दिल तो पागल है’ या चित्रपटाचे उदाहरण द्यावे लागेल. अरुणा ईराणी माधुरीला सांगते, की’ जेव्हा एखाद्या व्यक्तीला बघितल्यावर आपल्या मनात घंटा वाजायला सुरुवात होते, तेव्हा समजावे की, तुम्हाला तुमचे खरे प्रेम मिळाले आहे’. हीच गोष्ट प्रत्यक्ष जीवनात देखील लागू होते.

शेवटी लग्न हा एक जुगारच आहे. मनासारखी पाने मिळाली की जुगार नेहमीच यशस्वी होतो. त्याचप्रमाणे जर आशा –अपेक्षांचे नेमके स्वरूप लक्षात ठेवून जोडीदाराची प्रांजळपणे निवड केल्यास लग्न यशस्वी ठरू शकते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?