आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
अनेकदा आयुष्यात अतर्क्य गोष्टी घडतात. त्याला काहीही नाव देता येत नाही. अगदी विज्ञान पण त्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकलेलं नाही. काही गोष्टी आपल्या नजरेला दिसतात. पण या डोळ्यांना न दिसणाऱ्या पण मनाला जाणवणाऱ्या काही गोष्टी अस्तित्वात आहेत. त्याचा बरा वाईट परिणाम आपल्याला दिसतो, जाणवतो. पण डोळ्याला मात्र काहीही दिसत नाही.
मात्र काही शक्ती या डोळ्यांनाही दिसतात. मंदिराच्या खांबावर चढलेली वयस्क आजी, किंवा उलट्या कोलांटी उड्या घेणारी तरूण मुलगी पाहिल्यानंतर बुद्धीला पटत नसलं तरी या अतर्क्य शक्तीवर विश्वास बसतो. हेच दृष्य़ आजही भारतातील काही मंदिरांमध्ये पहायला मिळतं. लाखो लोक रोज आपल्या प्रियजनांना घेऊन मंदिरात येतात, आणि त्यानंतर मंदिरात जे काही दृष्य दिसतं, ते थक्क करणारं असतं.
आजही फेसबुकवर पण देवा धर्माचे, भल्या बुऱ्या पंथांचे, गूढ विद्या संप्रदायाचे विविध ग्रूप आहेत. आणि शेकडो लोक त्याचे सदस्य आहेत. कधी अशा ग्रुपवर चक्कर मारली तर लोक काय काय प्रश्न विचारतात हे बघून थक्क व्हायला होतं.
असंही भारतात विविध धार्मिक स्थळे आहेत. विविध धर्म, जातीमधील लोक आपले असे अतर्क्य प्रश्न घेऊन त्या धार्मिक ठिकाणी जातात. तिथे मुस्लीम लोक पण मंदिरात जाताना दिसतात तर हिंदू लोक पण दर्ग्यात जातात. त्या अशक्यप्राय वाटणाऱ्या विचित्र प्रश्नांवर उत्तरे मिळवताना दिसतात.
वरवर ही गोष्ट किरकोळ वाटते, काही लोक अंधश्रद्धा म्हणून पण खिल्ली उडवतील पण काही ठिकाणे अशा अतर्क्य शक्तीचा पुरावा देतात. त्या डोळ्यापलीकडे असलेल्या जगाची पुसटशी जाणिव करून देतात. अशा काही स्थळांविषयी.
१) मेहन्दीपूरचा बालाजी
मेहंदीपुरच्या बालाजीचे मंदिर जादू टोण्यासाठी जगात ओळखले जाते.या ठिकाणी हजारो लोक बालाजीच्या दर्शनासाठी येतात. इथे लोकांना साखळदंडांनी बांधतात. जादूटोणा, करणी धरणीमुळे कथित आजार बरे करण्यासाठी चक्क उकळते पाणी टाकतात.
या मंदिराच्या आसपास नकारात्मक शक्ती वास करतात असे मानले जाते. आणि याच कारणास्तव या मंदिरातील प्रसाद घरी आणला जात नाही. तिथेच ठेवून दिला जातो. कारण लोकांची अशी धारणा आहे की, प्रसादासोबत वाईट शक्ती पण घरी येतात.
२) हजरज आली मीरा दाता दर्गा (गुजरात)
भूतबाधा झालेल्या स्त्रीयांना इथे बरे करण्यासाठी आणले जाते. उनीवा या गावात हा दर्गा आहे.
ज्या महिलांना भूतबाधा झाली आहे असे मानून त्यांना साखळदंड बांधून त्यापासून सुटका करण्यासाठी सर्व धर्मीय लोकांची रीघ लागलेली असते.
३) कष्टभजन देव हनुमान मंदिर (गुजरात)
मारुती हा संकटमोचन देव मानला जातो. भूतबाधा निवारण्यासाठी या देवाला लोक आपला तारणहार मानतात. त्यामुळे या ठिकाणी शेकडो लोक भूत पिशाच्च मुक्ती मिळवण्यासाठी येतात.
हे मंदिर प्रसिद्ध आहे. आणि लोक तिथे श्रद्धेने येतात.
४) देवी महाराज मंदिर (मध्य प्रदेश)
मध्य प्रदेशातील हे अत्यंत प्रसिद्ध असलेले मंदिर. पौर्णिमेच्या रात्री येथे भूतबाधेवर उपाय केला जातो. लोक इथे सैरावैरा धावत असतात आणि झाडूने त्यांना झाड फुंक करून मंत्र तंत्र करतात. इतकेच नव्हे तर भूत पिशाच्छाच्या तावडीतून सुटका व्हावी म्हणून लोक हातावर कापूर पण जाळतात.
दरवर्षी इथे भूतांची जत्रा भरते. ही अतिशय विचित्र गोष्ट आहे.
५) दत्तात्रेय मंदिर गाणगापूर (कर्नाटक)
हे एक प्राचीन दत्ताचे देऊळ आहे. इथेही भूतबाधा झालेले लोक पौर्णिमेच्या दिवशी येतात.
हे सर्व बाधित लोक एकत्र आले की ११.३० वाजता महामंगल आरती सुरु होते. ही आरती सुरु झाली की हे बाधित लोक अत्यंत विचित्र चाळे करू लागतात. त्यांच्यात वाईट शक्तींचा संचार होतो आणि ते ओरडा आरडा करू लागतात, भिंतीवर चढू लागतात. त्यांच्यात असलेल्या वाईट आत्म्याची ही करणी असते.
मात्र दत्तमहाराजांच्या पादुकांसमोर या शक्तींचा निभाव लागत नाही आणि त्यामुळे अनेकजण या शक्तींच्या विळख्यातून मुक्त होऊन घराकडे परतात अशी धारणा आहे.
६) निजामुद्दीन दर्गा (दिल्ली)
दिल्ली, देशाची राजधानी आहे. एम्स सारखी मोठमोठी हॉस्पिटल इथे आहेत. सर्वात मोठी संसद दिल्लीतच आहे पण त्याच बरोबरीने हा दर्गा केवळ भूतबाधा झालेल्या लोकांवर इलाज करणारा दर्गा पण इथेच आहे.
या दर्ग्यात भाविकांची गर्दी असतेच पण या गर्दीतही एक वेगळी जागा आहे. या दर्ग्यात भूत उतरवण्यासाठी एक वेगळी खोली आहे. या ठिकाणी हाजी, मौलवी लोक पिशाच्च बाधा झालेल्या लोकांचे भूत उतरवत असतात. या खोलीतून चित्रविचित्र आवाज येत असतात.
७) चंडीदेवी मंदिर (हरिद्वार)
हरिद्वारमधील चंडी देवीचे मंदिर या कामासाठी उत्तम पर्याय मानले जाते. जारण मारण, किंवा इतर कारणांनी ज्या वाईट शक्तींचा संचार झालेला असतो त्याचा इलाज करण्यासाठी लोक या मंदिरात येतात.
नवरात्रात तर या मंदिरात प्रचंड गर्दी होते. चंडी देवीच्या कृपेने सर्व आजार बरे होतात अशी लोकांची श्रद्धा आहे. अगदी गंभीरात गंभीर आजारही देवी आपल्या कृपेने बरे करते अशी समाजमान्यता आहे.
८) हरसू ब्रह्म मंदिर (बिहार)
बिहार आणि उत्तरप्रदेशच्या सीमारेषेवर असलेले हे मंदिर वसलेले आहे. नवरात्रात श्रद्धाळू लोक मोठ्या संख्येने लांब या ठिकाणी येतात.
करणी किंवा पिशाच्च बाधा झालेल्या माणसाला या ठिकाणी आल्यानंतर आराम पडतो असं लोकांचा विश्वास आहे. अशीही एक धारणा आहे की गंभीर रोगांपासून इथे आल्यावर मुक्ती मिळते.
९) संत साबीर शाह दर्गा (चैनपूर)
हा दर्गा पाहतानाच भीती वाटेल अशी जागा आहे. भूत प्रेत, मंत्र तंत्र, अशा कामासाठी हा दर्गा लोकांच्या चर्चेत असतो. इथे बहुतांश महिलांची गर्दी असते.
पिशाच्च बाधेने ग्रासलेले तरुण कधी कधी इथे साखळीने बांधून आणले जातात.
१०) वेताळ मन्दिर (भुवनेश्वर)
ओडिशामधील या मंदिरात चामुंडा मातेची मूर्ती आहे आणि येथे सतत मंत्र तंत्र सुरु असतात.
भूतबाधा झालेले लोक इथे येतात आणले जातात आणि त्यांच्यावर इलाज करून बाधा मुक्ती करून दिली जाते.
११) काली घाट मंदिर (कोलकता)
भारतात सर्वात जास्त जादू टोणा बंगाल मध्ये केला जातो असं म्हणतात. कोलकता मधील या काली घाट मंदिरात मंत्र तंत्र साधना शिकवली जाते. भूत पिशाच्च बाधित लोक येथे येतात आणि त्यांना त्यावर इलाज करून दिला जातो.
आपण वैद्यकीय क्षेत्रात कितीही भरारी घेतली, किंवा विज्ञानाची कितीही कास धरली तरी आपल्याच देशातील या काही मंदिरांमध्ये आजही हे प्रकार पहायला मिळतात. आता प्रत्येकाच्या विश्वासानुसार या घटनांकडे पाहिलं जातं. यात चूक की बरोबर? खरं की खोटं? या मुद्द्यांवर वाद घालण्यापेक्षा हा निर्णय ज्याचा त्याने घ्यावा.
—
या ठिकाणांचा अनादर करणे किंवा कोणत्याही जात,धर्म,पंथ यांविषयी गैरसमज निर्माण करणे अथवा कोणाच्याही श्रद्धा, बावना दुखावणे हा या लेखाचा उल्लेख नसून भारतातील या काही ठिकाणांची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
—
या अजब मंदिरात होतात अशा काही गोष्टी ज्यांची कुणी स्वप्नातही कल्पना केली नसेल!
या लंका मिनारमध्ये बहिण-भाऊ एकत्र जाऊ शकत नाहीत, का? ते जाणून घ्या…
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.