Site icon InMarathi

सोने आपण खरेदी करतो पण खिशे मात्र विदेश्यांचे भरतात! कसे? जाणून घ्या!

gold-marathipizza00

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

सोन्याबद्दल आपल्याला नेहमीच भारी अप्रूप असतं. आजही कित्येक घरात भरवश्याची गुंतवणूक म्हणून सोन्याकडेच पाहिले जाते. असो आज पण सोन्याबद्दल अश्या काही सत्य गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या कधीही तुमच्या कानी पडल्या नसतील.

jagoinvestor.com

एका आकडेवारी नुसार आजपर्यंत जगात अंदाजे १७१, ३०० टन सोन्याचे उत्खनन झाले आहे. सरकारी तिजोरीत असणाऱ्या जागतिक सोन्याची २०१६ची यादी :

अमेरिका : ८१३३ टन
जर्मनी : ३३७८ टन
आंतरराष्ट्रिय नाणेनिधी : २८१४ टन
ईटली : २४५१ टन
फ़्रान्स : २४३५ टन
चिन : १८२३ टन
रशिया : १४९८ टन
स्वित्झर्लंड : १०४० टन
जापान : ७६५ टन
नेदरलॅंड : ६१२ टन
भारत : ५५७ टन

पाकिस्तान ४४ व्या क्रमांकावर ६४ टन ,१०० व्या क्रमांकावर येमेन १ टन !

indianexpress.com

आजपर्यंत उत्खनन झालेल्या एकुण १,७१,३०० टन सोन्यापैकी अंदाजे ८४,३०० टन सोने दागिने स्वरूपात आहे. ३३,००० टन सोने विटा, बार या गुंतवणूकी स्वरूपात आहे. मध्यवर्ती बँकेत २९,५०० टन, औद्योगिक क्षेत्रात २०,८०० टन आणि ३,७०० टन सोने इतर स्वरूपात आहे.

सोने उत्पादक देशामध्ये चिन आघाडीवर असुन २०१५ या वर्षी चिनने ४५० टन सोने उत्पादित केले. त्याखालोखाल ऑस्ट्रेलिया २७४ टन, रशिया २४७ टन, अमेरिका २१० टन अशी क्रमवारी आहे. सोने उत्पादक देशांमध्ये येण्यासाठी कमित कमी ३ टन सोने उत्पादन करणे आवश्यक आहे. त्यामुळे भारत सोने उत्पादक देशांमध्ये कुठेही नाही.

२०१५ साली एकुण १,०६४ टन सोन्याची उलढाल झाली. त्यातील ५१३ टन सोन्याचे दागिने, तंत्रज्ञानासाठी ८४ टन, गुंतवणुकीसाठी १८६ टन ई.स्वरुपात त्याची खरेदी झाली.

सोन्याच्या दागिन्यांची सगळ्यात मोठी मागणी नोंदवणारा देश आहे चायना! चिन्यांनी २१४ टन सोने खरेदी केले, त्यातील १६९ टन सोने दागिने स्वरूपात खरेदी झाले. त्यानंतर दुसरा क्रमांकावर आहे “भारत”. भारतियांनी २०१५ मध्ये १५९ टन सोन्याची खरेदी केली. या १५९ टन सोन्यात १२२ टनाचे दागिने स्वरूपात खरेदी झाली.  ( मागील वर्षी एक किलो सोने २५ लाख रुपये,एक टन २५० कोटी रुपये )

असो, गुंतवणुकीसाठी म्हणजे बिस्किट, नाणी स्वरुपात भारतीयांनी मागिल वर्षी ३७ टन सोने गुंतवणुकीसाठी खरेदी केले. (हे आणखी add झाले.)

ichowk.in/

एका अंदाजानुसार भारतात आजपर्यंत १५,००० ते ३०,००० टनाच्या दरम्यान सोने खाजगी मालकिचे आहे. त्यात धार्मिक स्थळं, वैयक्तिक मालकीचे असे समाविष्ट आहे. एक टन सोन्याची किंमत सध्या ३०० कोटी रूपये होते, मग १५/३० हजार टन सोन्याची किंमत किती याची आकडेमोड करणे मला शक्य नाही , तुम्हाला कुणाला जमल्यास नक्की लिहा.

हा लेख लिहित असताना भारतावरिल या क्षणी असलेल कर्ज आहे 57,727,336,972,468,569 रूपये ($ 864,199,087,857). प्रत्येक सेकंदाला व्याज आहे ११५,१५० रूपये आणि १२९,५०००००० लोकसंख्येपैकी प्रत्येक माणसावरील कर्ज आहे ४४,५७७ रूपये.

हे सगळे लिहायचे कारण काय, तर भारतात सोन्याचे उत्पादन होत नाही याचा सरळ अर्थ आहे कि हे सगळे सोने आयात करावे लागले. नुसत्या मागिल वर्षी १२२ टनाचे दागिने. म्हणजे माझी आकडेवारी चुकीची नसेल, तर अंदाजे 30 हजार कोटी रुपये स्वहस्ते परकियांच्या खिशात फक्त हौसेसाठी टाकले. तेच युरोपिय देशांकडे सरकारी सोने आपल्या पाचपट आहे, पण तेथिल सामान्य जनतेची सोन्याचे खरेदी विस पंचविस टनाच्या पुढे नाहिये.

कमाई आणि खर्च यांचे प्रमाण व्यस्त असेल तर माणुस नेहमी कर्जबाजारी रहातो तेच सुत्र देशाला लागु होते. भारताची सर्व क्षेत्रातील निर्यात हि आयाती पेक्षा कितीतरी पट जास्त असेल, तर आपण श्रीमंत असु पण देश कर्जबाजारीच राहणार.

livemint.com

हे फक्त सोन्याचे उदाहरण झाले, भारतात निम्म्या लोकसंख्येकडे मोबाईल आहे असे समजुन त्यातील ९०% मोबाईल परदेशी आहेत. सरासरी ७,००० रूपये एक मोबाईल म्हटले तरी ४० हजार कोटी परदेशात गेले. परदेशी चलनात खरेदी असल्यामुळे डॉलर, पौंड , युरोचा दर भारतीय लोकांना कधी परवडत नाही आणि वस्तु अवाढव्य किंमतीला घ्याव्या लागतात तसेच याचा परिणाम आपल्या वैयक्तिक जीवनावर हरतऱ्हेने होतो.

यावर उपाय म्हणजे शक्य तितक्या स्वदेशी वस्तु बनवणे आणि वापरणे, त्यासाठी स्वदेशी उत्पादनं स्वस्त, किफायतशीर, टिकाऊ अशी उत्पादीत करणे इ आहे.अत्यावश्यक ठिकाणीच परदेशी वस्तु घेणे आणि सोने खरेदी करताना हा लेख जरूर लक्षात ठेवणे.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Exit mobile version