गांधी घराण्याशी जवळीक आहे म्हणून मराठी जागेवर युपीचा उमेदवार थेट राज्यसभा खासदार?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
नैऋत्य मौसमी वारे वाहायला लागायच्या आधीच भारतात यावेळी राज्यसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे ते ही साधेसुधे नाही तर बर्याच मोठ्या पडझडीचे संकेत देत! याची सुरवात झाली ती महाराष्ट्र कोंग्रेसचे सरचिटणीस ‘आशीष देशमुख’ यांच्या राजीनाम्याने. सातव्या यादीसह काँग्रेसने आतापर्यंत जाहीर केलेल्या लोकसभेच्या उमेदवारांची संख्या १८१ झाली आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
उर्दू कवी इम्रान प्रतापगढी यांना पक्षाच्या हायकमांडने महाराष्ट्रातून राज्यसभेचे उमेदवारी दिल्याने महाराष्ट्र काँग्रेसमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला आणि नागपूरचे काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. “महाराष्ट्रात काँग्रेसला निकाल देऊ शकणारे पुरेसे सक्षम नेते असूनही, उत्तर प्रदेशातील बाहेरचे इम्रान प्रतापगढी आमच्यावर लादण्यात आले आहेत” असा महाराष्ट्र कॉंग्रेसमधील नेत्यांकडून आळवला जात आहे.
या निर्णयाचा निषेध म्हणून मी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा देत आहे, असे देशमुख म्हणाले. देशमुखांनी राजीनामा असत्राने ही नाराजी व्यक्त केली असली तरी राज्यातील बाकीच्या नेत्यांनीही आपली नाराजी उघडपणे व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ असावी. नगमा सारख्या नेत्यांनी देखील ट्विटरवर द्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राजस्थानमधील मुकुल वासनिक यांना रिंगणात उतरवण्याच्या हायकमांडच्या तर्कावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
जे राजस्थान बद्दल तेच महाराष्ट्राबद्दल! गांधी घराण्यासाठी जवळीक करणारा युपीचा भैय्या महाराष्ट्रात राज्यसभेचा उमेदवार म्हणून दिला जातो हेच कोणाच्या पचनी पडलेले नाही. ते युपी मॅन आहेत इम्रान प्रतापगढी. कॉंग्रेसचे युपी मधील मोरादाबाद येथील विधानसभा उमेदवार असलेले प्रतापगढी ज्यांच्या निवडीमुळे महाराष्ट्र कॉंग्रेस तळापासून ढवळले गेले आहे ते इम्रान प्रतापगढी आहेत तरी कोण?
इम्रान प्रतापगढी :
जसे कवी-राजकारणी कुमार विश्वास संमेलनातून उदयास आले, त्याचप्रमाणे इम्रान प्रतापगढी यांनीही मुशायरातून आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या कवितेत समाज आणि राजकारणावर अधिक भाष्य असते. नरेंद्र मोदी यांचे टीकाकार म्हणून परिचित असणार्या प्रतापगढी यांचा जन्म ६ ऑगस्ट१९८७ रोजी प्रतापगढ जिल्ह्यातील चमरुपूर शुक्लान शमशेरगंज येथे झाला. इम्रान प्रतापगढ़ी यांचे खरे नाव मोहम्मद इम्रान खान आहे.
त्यांचे वडील युनानी चिकित्सक तर आई गृहिणी होती. इम्रानच्या कुटुंबाचा साहित्याशी दूरचाही संबंध नव्हता. गझल-नजम, मुशायरा असे शब्दही कोणाच्या मनात नव्हते. इम्रानने अलाहाबाद विद्यापीठातून हिंदीचे शिक्षण घेतले. हिंदी आणि उर्दू या दोन्ही भाषांवर त्यांची चांगली पकड आहे.
इम्रानने पाचव्या वर्गापासून कविता आणि शायरी लिहायला सुरुवात केली. प्रतापगढी यांनी २००८मध्ये मुशायरात भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांना झटपट प्रसिद्धी मिळवून देणारी नझम म्हणजे ‘मदरसा’. २०१०मध्ये, त्यांना मुंबईतील मुशायरासाठी आमंत्रित करण्यात आले होते, जिथे त्यांच्या सादरीकरणाचे एक रेकॉर्डिंग मोठ्या प्रमाणावर शेअर केले गेले, ज्यामुळे त्यांना अनपेक्षित प्रसिद्धी मिळाली आणी ते प्रकाशझोतात आले.
मुस्लिम समाजात तसेच सर्व कवींमध्ये त्यांचे खूप कौतुक आहे. प्रतापगढीने आता १०० हून अधिक नझ्म लिहिले आहेत, ज्यात फिलिस्टीन (पॅलेस्टिनी लोकांच्या दडपशाही बद्दल), नजीब (जेएनयू विद्यार्थी नजीब अहमद बेपत्ता झाल्याबद्दल), आणि उमर (मॉब लिंचिंगच्या बळींबद्दल) यांचा समावेश आहे.
कहां सोया है चौकीदार, पेट्रोल ने सेंचुरी मार ली, गैस आठ सौ के पार….कहां सोया चौकीदार…। असो की अपना हक हम छीन लेंगे अंबानी के यारों से.. अशा नज्म आणि कवितांमधून आपली भूमिका व्यक्त करणारे इम्रान जेष्ठ कवि प्रसाद मिश्रा उन्मतच्या संपर्कात आले. येथूनच त्यांचे नाव गझल आणि मुशायराच्या विश्वात घेतले जाऊ लागले. केपी इंटर कॉलेजचे माजी प्राचार्य आणि प्रसिद्ध साहित्यिक लाल बहादूर सिंग यांनीही त्यांना मार्गदर्शन केले.
वयाच्या २८ व्या वर्षी त्यांनी ते स्थान प्राप्त केले ज्यासाठी लोकांना आयुष्यभर प्रतीक्षा करावी लागते. यश भारती पुरस्कार मिळवताना सहसा बहुतेक लोकांचे पाय थडग्यात लटकतात, परंतु इम्रानला सुरुवातीच्या प्रवासातच सरकारने हा पुरस्कार दिला आहे.
२०१९ ची मुरादाबाद लोकसभा निवडणूक देखील त्यांनी कॉंग्रेस कडून लढवली होती. त्यांना हिमाचल प्रदेशमध्ये एआयसीसी सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी म्हणजेच आतापर्यंत ते तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये AICC चे प्रभारी सचिव होते. सध्या इम्रान प्रतापगढ़ी यांना भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे आणि आता राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांना महाराष्ट्रातून संधी देण्यात आली आहे.
–
मुस्लिमांचा धर्माभिमान दूर करणारा कुणी वाली का नाही? – अल्पसंख्यांकांचा प्रश्न – भाग २
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या यादीत गडकरी असण्यामागचं त्यांचं हे कर्तृत्व जाणून घ्या
–
काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतलेल्या या निर्णयाचे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अनेक उलट सुलट पडसाद उमटत आहेत. आजपर्यंत राज्यसभेचे उमेदवार नेहमी दिल्लीतील पक्षाच्या हायकमांडद्वारे ठरवले जात असताना, उमेदवार निवडताना पूर्वी राज्याच्या सर्व समीकरणांचा विचार केला जात असे. प्रथम, या निर्णयांमध्ये काही तर्क असायचे. पण आता चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रातील तळागाळातील कार्यकर्ताही हायकमांडच्या या तर्कावर प्रचंड नाराज आहे.
सोशल मीडियावर पोस्ट टाकून काँग्रेसच्या पदाधिका-यांनी देखील यावेळी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे, महाराष्ट्र कॉंग्रेस च्या कानामागून येवून तिखट झालेले इम्रान प्रतापगढी आता हा विरोध शांत करून काय चमत्कार घडवून आणतील हे पाहणे मनोरंजक असेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.