Site icon InMarathi

साठीनंतर सुरु केला व्यवसाय, वयाच्या नव्वदीत लाखो कमावणाऱ्या महिलांच्या थक्क करणाऱ्या गोष्टी

feature im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कधी तुम्हाला तुमचे हॉस्टलचे दिवस आठवले तर नक्कीच आई आणि तिच्या हातचे जेवण आठवत असेल हो ना? आणि जर तुम्ही जवळपासच्या गावातून शहरात शिकायला आला असाल तर सकाळी आठच्या एस्टीने घरून पाठवला जाणारा जेवणाचा डबा तर तुम्ही नक्की मिस करत असाल..

काय नसायचे त्या डब्यात? कधी पिठले भाकरी, कधी वांग्याची भाजी आणि सांडग्यांची आमटी… असेच काही बाही आणि आईचे प्रेम. एसटीच्या प्रवासातले टक्के टोणपे बसून एकत्र झालेल्या त्या सगळ्या पदार्थांची चव आणि गंध आज ही आपल्या मनात दरवळत असेल हो ना?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ते सुख काही वेगळेच होते. आज आपण जगभर हिंडतो, अनेक पदार्थांची चव चाखतो पण आईच्या हातची सर काही त्याला नाही. हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे रिटायर झालेली आई पुन्हा पदर खोचून उभी राहते आणि पुन्हा आपल्या स्वयंपाक कौशल्याची जादू दाखवते, तेव्हा काय होत असेल?

हा विचार तुम्ही केलाय का कधी? जर अशीच कोणी आई आपला स्वत: बनवलेल्या खाद्यपदार्थांचा व्यवसाय सुरू करत असेल ते ही वयाच्या ७० वर्षांनंतर , तर? आहे ना अमेझिंग? या लेखात आम्ही अशाच काही जणींची ओळख करून देणार आहोत ज्यांच्यासाठी वय हा फक्त एक आकडा ठरला आहे. कोण आहेत या? एवरग्रीन एंजल्स? चला पाहूया.

उर्मिला आशर :

 

 

‘गुज्जू बेन नास्ता’ च्या करता करविता असलेल्या उर्मिला आशर आणि त्यांचा नातू हर्ष यांना ही किचन सुरू करण्याची आयडिया लॉकडाउन काळात सुचली.

मुंबईतील चाळीत राहणार्‍या आणि एकेकाळी लंडन आणि यूएसमधील अनिवासी भारतीय कुटुंबांसाठी रात्रीचे जेवण बनवणार्‍या उर्मिला बेन घरातच अडकून पडल्या.

घरगुती पद्धतीने बनवलेल्या लोणच्यांची क्रेझ आजही कमी झालेली नाही हे हर्ष याच्या लक्षात आले आणि त्याने त्याच्या आजीला ही लोणची बनवण्याचा आग्रह केला. सोबत ढोकळा, खांडवी, गाठिया, चकली, थेपला अशा खास गुज्जू स्नॅक्स देखील बनवले जाऊ लागले.

एवढे करून उर्मिला बेन थांबल्या नाहीत. तर नातवाच्या मदतीने त्यांनी एक कुकरी चॅनल सुरू केले, ज्यावर खास गुजराथी पदार्थ पारंपारिक पद्धतीने बनविण्यास शिकवले जाते. आज या चॅनलचे 26K पेक्षा जास्त फोलोअर्स आहेत. करणार्‍यासाठी आभाळ ही कमीच पडते हे खरे!

हरभजन कौर :

 

 

“वेला बैठना बिमारी दा घर है” (आळशी बसणे म्हणजे रोगाला आमंत्रण देणे) असे म्हणणार्‍या 95 वर्षांच्या हरभजन कौर म्हणजे शब्दांचा वाहता झरा आहेत.

आपल्या नव्वदाव्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या मुलीशी बोलताना त्यांना हे जाणवले, की त्यांनी कधी पैसे कमावलेच नाहीत. फक्त आठवीपर्यंत शिकलेल्या त्या विधवेचे हेच दु:ख :होते.

मग तू आता स्वत:चा व्यवसाय का सुरू करत नाहीस? त्यांच्या मुलीने विचारलेल्या प्रश्नाने त्यांना विचार करणे भाग पाडले आणि त्यातून ‘हरभजन’स’ चा जन्म झाला.

हरभजन यांनी होकार दिल्यानंतर संपूर्ण कुटुंबच या व्यवसायात उतरले. बेसन की बर्फी हे त्यांचे बेस्ट सेलर आहे जे हरभजन यांच्या वडिलांच्या 100 वर्षे जुन्या रेसेपीवर आधारित आहे. इतकेच नाही तर त्या हंगामी शरबत, लोणची, चटण्या देखील बनवतात.

आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या मुलाखतीनंतर त्या सर्वांच्या नजरेत आल्या.

प्रतिभा कानोई :

 

 

काही वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर आलेला एकटेपणा आणि उदासिनता घालवण्यासाठी ६८ वर्षीय प्रतिभा यांनी आपल्या स्वयंपाक करण्याच्या छ्ंदाचे रूपांतर व्यवसायमध्ये करावे असे त्यांच्या मुलाला वाटत होते. त्याप्रमाणे प्रतिभा यांनी व्यवसाय सुरू केला.

फक्त पदार्थ बनवणे एवढेच नाही, तर बॉक्स ऑर्डर करणे, डिलिव्हरी मेकॅनिझम तयार करणे अशा कामांमध्येही त्या मदत करतात.

त्यांच्या मम्मीज किचनच्या बेंगलोर मधील शाखेचे काम त्यांची मुलगी बघते, तर कोलकता आणि मुंबई येथील शाखा प्रशिक्षित कर्मचारी सांभाळतात.

प्रतिभा बिझनेस शो शार्क टॅंक मध्ये देखील सहभागी झाल्या होत्या. आपल्या संस्थेच्या भारतभर शाखा उघडण्याचे प्रतिभा यांचे स्वप्न आहे.

अमिताभ बच्चन, सोनाली बेंद्रे, अक्षय कुमार, देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे, पिंकी रेड्डी, हे प्रतिभा यांच्या मम्मीज किचनचे नियमित प्रशंसक आहेत.

मीनाक्षी मयप्पन :

एखाद्या ८८ वर्षांच्या आजीबाईंनी देव देव करायचे सोडून जर आपल्या राहत्या वाड्याचे हेरिटेज हॉटेल बनवले तर? ही किमया केली आहे मीनाक्षी मयप्पन यांनी.

तमिळनाडूच्या चेट्टिनाड मधील कराइकुडी इथले आपले राहते घर त्यांनी एका हेरिटेज हॉटेल मध्ये बदलले आहे. मीनाक्षी यांच्या रेस्टोरंटमध्ये मिरची गार्लिक फिश, प्रॉन करी, मसालेदार किंगफिश, चिंच आणि शॉलोट्स असलेली भेंडी, क्रॅब रसम, काळी मिरची असलेले चिकन यांसारखे पदार्थ मिळतात.

 

 

इतकेच नाही तर या प्रदेशातील बारकावे समोर आणण्यासाठी त्यांनी द बांगला टेबल आणि मॅन्शन्स ऑफ चेट्टीनाड ही पुस्तके देखील लिहिली आहेत.

राधा डागा :

८० वर्षीय राधा डागा यांनी १० वर्षांपूर्वी ‘ट्रिगुनी इझी ईट्स’ हा ब्रँड सुरू केला. एक माजी कापड निर्यातदार असलेल्या राधा यांनी खाण्यासाठी तयार पास्तासाठी एक मॅगझिन जाहिरात पाहिली, ज्यासाठी फक्त गरम पाण्याची गरज होती.

त्यांच्या मनात विचार आला की ते इतर पदार्थांवर का लागू केले जाऊ शकत नाही. त्यानंतर त्यांनी प्रथम इडली करून पाहिली, पण ती नीट झाली नाही, तेव्हा त्यांनी लिंबू भात, बिर्याणी करून पाहिली.

आपली उद्योजकीय कौशल्ये वापर करून त्यांनी या पदार्थांचे मार्केटिंग सुरू केले आणि २०१२ मध्ये, इंडिगो या विमान सेवा देणार्‍या कंपनीने तिला बिर्याणी आणि नंतर उपमा या पदार्थांच्या ऑर्डर्स देणे सुरू केले.

 

 

त्यांच्या इतर काही उत्पादनांमध्ये दाल चावल, पोहे, राजमा चावल आणि पोंगल सांबर यांचा समावेश होतो आणि आता त्यांची संस्था रेल्वे प्रवाशांसाठी IRCTC ला अन्न पुरवते.

कोकिला पारेख :

जशा लॉकडाऊनने अनेक लोकांच्या नोकऱ्या हिरावून घेतल्या, तशा वेगवेगळ्या संधी देखील उपलब्ध करून दिल्या. यात वयाचे, व्यवसायाचे किंवा इतर कोणतेही बंधन नव्हते.

मुंबई मधील कोकिळाबेन पारेख यांनाही लॉकडाऊनने अशीच व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध करून दिली. ती त्या बनवत असलेल्या चहाच्या मसाल्याने.

 

 

आले, वेलची, लिंबू आणि इतर जादुई गोष्टींचे मिश्रण असलेला चहा मसाला ही कोकिळाबेन यांची खासियत होती. त्यांच्याकडे आलेला प्रत्येक पाहुणा या मसालायुक्त चहाचा आस्वाद घेऊन आश्चर्यचकीत होत असे.

कोरोना काळात कोकिळाबेन यांनी आपल्या या मसाल्याचे व्यावसायिक तत्वावर उत्पादन करायचे ठरवले, यात त्यांना त्यांचा मुलगा तुषार याने मदत केली आणि KT मसाल्याचे उत्पादन सुरू झाकले.

आता भारतभर शिपिंग करून, KT हे नैसर्गिक मसाला मिश्रण जागतिक पातळीवर नेण्याचा विचार सुरू आहे.

तेव्हा मित्रांनो वरील सर्वांच्या स्टोरीज वाचल्यानंतर ‘आई कुठे काय करते?’ असे प्रश्न सोडा आणि आई काय काय करू शकते हे प्रश्न विचारायला सुरू करा. नक्कीच नवीन काहीतरी जुगाड सापडेल….

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version