Site icon InMarathi

दोन वेगळ्या प्रजातीच्या माणसांपासून जन्माला आलेली, सामान्यांपेक्षा वेगळी दिसणारी मुलगी!

denny im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगाची प्रगती होण्यासाठी माणसाची संशोधन करण्याची चिकित्सक वृत्ती कारणीभूत आहे असं नक्कीच म्हणता येईल. क्षेत्र कोणतंही असो, विषयाच्या खोलात जाणे, संपूर्ण माहिती मिळवणे आणि जगासमोर ती सादर करणे हे घडतंय, म्हणूनच आपलं पाऊल रोज पुढे पडतंय.

कोणत्याही देशाला संशोधनाचा काय फायदा? तो खर्च जीवनावश्यक क्षेत्रांवर करावा असं काहींचं मत असतं. पण, मुळात संशोधन हा खर्च नसून ती सत्य शोधण्यासाठी केलेली एक गुंतवणूक असते हे मान्य केलं पाहिजे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

२०१८ मध्ये रशियाच्या पुरातत्व विभागाला त्यांच्या संशोधनात काही चांदीच्या रंगाचे हाडं सापडली होती. ही हाडं कोणाची असतील? यावर संशोधन करण्याचा निर्णय घेण्यात आला. संशोधन करत असतांना, रशियन पुरातत्व खात्याच्या हे लक्षात आलं की, ही हाडं ज्या मनुष्याची आहेत त्यामध्ये नंदेर्थल आणि डेनीसोव्हन या दोन वेगवेगळ्या प्रजातींचे गुणधर्म आहेत.

 

 

‘नंदेर्थल’ ही ती मानव प्रजाती आहे जी पश्चिम आशिया आणि युरोपमध्ये ३०,००० वर्षांपुर्वी आढळायची. ही प्रजाती विविध ठिकाणी प्रवास करायची, शस्त्रातस्त्र तयार करायची आणि प्राण्यांची शिकार करून आपली उपजिविका करायची.

‘डेनीसोव्हन’ ही मानव प्रजाती केवळ सायबेरिया येथील ‘डेनीसोव्हा’ गुहेत सापडायचे. त्यांचे अवशेष हे रशियामध्ये याआधी देखील सापडले होते. या प्रजातीच्या लोकांची लोकसंख्या अत्यंत कमी होती. ते कसे जगायचे ? याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाहीये.

रशियात सापडलेल्या हाडांमध्ये नंदेर्थल आणि डेंनीसोव्हन या दोन्ही प्रकारच्या लोकांचे अंश आहेत अशी माहिती ‘डीएनए’चा अभ्यास केल्यानंतर संशोधनांती रशियन शास्त्रज्ञांनी जाहीर केली होती. रशियात सापडलेल्या या हाडाच्या अवशेषावर काही दिवसांनी ‘ऑक्सफोर्ड’ विद्यापीठाने सुद्धा अभ्यास केला होता. त्यांनी या मुलीला ‘डेंनी’ हे नाव दिलं होतं.

 

 

आपल्या संशोधनात या शास्त्रज्ञांनी हे देखील सांगितलं आहे की, ” रशियात सापडलेली हाडं ही एका १३ वर्षांच्या मुलीची आहेत. संशोधन कार्य सुरू असेपर्यंत आम्ही तिला ‘डेंनीसोव्हा ११’ हे नाव देत आहोत. ५०,००० वर्षांपूर्वी तिचा मृत्यू झाला होता. मृत्यूसमयी तिचं वय १३ वर्ष होतं. आमच्या संशोधनानुसार तिची आई ही नंदेर्थल प्रजातीची होती तर वडील डेंनीसोव्हन प्रजातीचे होते.”

नंदेर्थल आणि डेंनीसोव्हन या दोन्ही मनुष्य प्रजाती या सध्याच्या मनुष्य प्रकार असलेल्या ‘होमोसॅपीयन’ प्रकाराच्या आधीचा मनुष्य प्रकार असल्याचं पुढील अभ्यासात समोर आलं आहे. आजच्या एशियन मनुष्यात डेंनीसोव्हन प्रकारचा डीएनए असतो आणि आफ्रिकन मनुष्यात २-४% इतका नंदेर्थल डीएनए असतो असं सांगितलं जातं.

‘डेंनीसोव्हा ११’ या मुलीच्या डीएनए अभ्यासात समोर आलेली माहिती हे सांगत होती की,

१. नंदेर्थल ही मनुष्य प्रजाती पश्चिम आणि पूर्व युरोपमधून भ्रमण करायची. तिच्या डीएनए मध्ये तिचा जन्म पश्चिम युरोपमध्ये झाला असावा असं प्रतीत झालं होतं.

२. ‘डेंनीसोव्हा ११’चा डीएनए अभ्यास होइपर्यंत अशी माहिती होती की, नंदेर्थल हे आफ्रिकेच्या बाहेर पडत नसत. मग नंदेर्थल आणि डेंनीसोव्हन या दोन प्रजातीतील लोक भेटले कसे असावेत? त्यांच्यात संवाद कसा झाला असेल? तो कधी झाला असेल आणि का ? हे प्रश्न त्यानंतर उपस्थित झाले आणि त्यावर संशोधन करण्याचा निर्णय रशियन पुरातत्व विभागाने घेतला.

३. ‘डेंनीसोव्हा ११’च्या सापडलेल्या हाडावरून तिचा मृत्यू हा एखाद्या गंभीर आजाराने झाला की अपघाताने? हा हाडाचा तुकडा कशाने मोडला असावा? यावर संशोधक सध्या अभ्यास करत आहेत.

 

 

‘डिस्कव्हरी चॅनल’वर दाखवणाऱ्या सिरीयलमध्ये अशीच प्रश्न विचारले जातात आणि त्यावर सखोल माहिती दिली जाते. ‘डेंनीसोव्हा ११’ या पहिल्या ‘हायब्रीड’ मुलीच्या अभ्यासात मात्र असं लक्षात आलं होतं की, हा डीएनए स्वतःपेक्षा आपल्या पालकांबद्दल जास्त माहिती सांगत आहे. ती जिवंत होती आणि १३ वर्ष जगली हे मात्र निर्विवाद सत्य या अभ्यासात समोर आलं होतं.

‘ऐंशीयंट डीएनए’ या जागतिक मासिकात प्रसिद्ध झालेली ही माहिती महत्वाची आहे कारण, ‘डेंनीसोव्हा ११’ ही अशी पहिली मुलगी होती जी दोन वेगवेगळ्या मानव प्रकारच्या अंश होती. या माहितीला ‘न्यू सायंटिस्ट’ या मासिकाने सुद्धा दुजोरा दिला होता.

‘डेंनीसोव्हा ११’च्या आधी ‘ओएस १’ या माणसाच्या हाडांचा तुकडा रोमानिया मध्ये सापडला होता. तेव्हा सुद्धा संशोधन झालं होतं आणि समोर आलं होतं की, ही व्यक्ती ३७,००० वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात होती.

 

जमीन खोदल्यावर पाण्याऐवजी या गावातून निघतंय सोनं !

जगात सर्वत्र कुतूहलाचा विषय असलेले हे महाकाय “शिंपले” देतात पृथ्वीवरील चमत्काराची साक्ष…

नंदेर्थल आणि डेंनीसोव्हा यांच्या जीवनशैलीवर जर्मनीच्या मानववंशशास्त्र अभ्यास करणाऱ्या ‘मॅक्स’ या संस्थेने देखील अभ्यास केला आहे. त्यांनी ‘डेंनीसोव्हा ११’ ही अशी मिश्र प्रजातीतून जन्म झालेली पाचवी मुलगी असल्याची माहिती दिली आहे. “नंदेर्थल आणि डेंनीसोव्हा ही प्रजाती ही एकमेकांच्या सतत संपर्कात असायची” असं भाकीत ‘स्वेन्ट पाबो’ या संस्थेच्या संचालकांनी आपल्या अभ्यासात व्यक्त केलं आहे.

एका हाडाच्या तुकड्यावरून इतकं संधोधन होऊ शकतं असा विचार देखील सामान्य माणूस करत नसावा. संशोधकांना असलेली अभ्यासवृत्ती आणि चिकाटी जितकी सामान्य माणसांमध्ये येईल तितकी पुढची पिढी हुशार निर्माण होईल असं ‘डेंनी’च्या संशोधनाबद्दल वाचून आपण म्हणू शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version