Site icon InMarathi

अनेक धक्कादायक पडद्यामागील गोष्टी दाखवणारे हे “राजकीय चरित्रपट” तुम्ही बघितले आहेत का?

tashkand files im 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

धर्मवीर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सिनेमाच्या टीजरपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. प्रसाद ओक यांच्या दमदार अभिनयाने चार चांद लावले आहेत. राजकारण हा विषय तसा सगळ्यांच्या आवडीचा विषय नाही. कारण  ‘या राजकारणी मंडळीचे काही खरे नसते.

सभागृहात एकमेकांना भरभरून शिव्याशाप देतील आणि मग कुठल्याशा समारंभात एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसतील’ ,असे आपण अनेकदा ऐकत असतो, पहात असतो. त्यामुळेच की काय ते नेमकं कशाप्रकारचे जीवन जगतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपल्या सारखे ताण-तणाव ते अनुभवितात का? त्यांच्या एखाद्या कृतीवर होणारी वादळी चर्चा ,त्याला थंडपणे सामोरी जाणारी ही मंडळी, या विषयी नेहमी सर्व सामन्यांच्या मनांत एक उत्सुकता असते . आणि म्हणूनच त्यांच्यावर आधारित चित्रपट बनतात ,तेव्हा ते अधिक चर्चिले जातात.

 

 

कदाचित एक प्रेक्षक म्हणून तुम्हाला ते आवडत असतील किंवा नसतीलही .त्यातच अलीकडे वास्तवात घडलेल्या अनेक गोष्टी बऱ्यापैकी खुलेपणाने दाखवीत असल्याने या चित्रपटाना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे ,तेव्हा अशा काही चित्रपटांवर टाकलेला प्रकाश .

१)ठाकरे –

अभिजीत पानसे दिग्दर्शित ठाकरे हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता . महाराष्ट्राचे झुंजार व्यक्तिमत्व बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय कारकीर्दीवर आधारित असा हा चित्रपट आहे. मुळातच बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तिमत्व जितके भव्य-दिव्य आहे, तितकेच ते सनसनाटी घटनांनी भरलेले आहे .एक व्यंग चित्रकार ते राजकीय नेता असा त्यांचा प्रवास आहे.

 

 

त्यामुळे हे व्यक्तिमत्व साकारताना कलाकार देखील तितकाच ताकदीचा असणे हे ही गरजेचे होते. आणि या भूमिकेला नवजुद्दिन सिद्दिकी ने योग्य तो न्याय दिला आहे. तर माईची भूमिका अमृता राव ने साकारली होती.

२) थलैवी –

जयललिता हे भारतीय राजकारणातले खऱ्या अर्थाने वादळी व्यक्तिमत्व . एके काळी दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी आपल्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या अदाकारीने गाजवली. इतकेच नाही तर मोजकेच हिंदी चित्रपट करून देखील त्यात तिने आपला ठसा उमटविला.

पुढे राजकारणात प्रवेश केल्यानंतर ही चित्रपट तारका काय राजकारण करणार असे वाटत असतानाच, तिने अशी काही जादू केली की, आपल्या १४ वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत ती तब्बल सहावेळा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाली.

 

 

नाट्य ,प्रसिद्धी ,आरोप ,तुरुंगवास आणि पुन्हा एकदा रोल मॉडेल हा जो एका हिट चित्रपटासाठी आवश्यक जो माल मसाला लागतो तो तिच्या प्रत्यक्ष आयुष्यात ही पुरेपूर ठासून भरला होता . त्यामुळे तिच्यावर चित्रपट झाला नसता तर नवलच होते.

या चित्रपटात मुख्य भूमिका कंगना राणावत ने साकारावी हा देखील एक विचित्र योगायोग असावा. ए.एल.विजय यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता .

३. द अॅक्सीडेंटल प्रायमिनिस्टर –

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे राजकरणापेक्षा कॉंग्रेसमध्ये नेमके काय स्थान होते आणि राहुल गांधी यांची कारकीर्द फुलविण्यासाठी त्यांचा कसा वापर केला गेला यावर भाष्य करणारा हा चित्रपट.२०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता .

राजकीय विश्लेषक संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे. अनुपम खेर,अक्षय खन्ना, आहानां कुमरा आणि सुझान ब्रेनेट ही कलाकार मंडळी यात असून आपल्या अदाकारीने हा चित्रपट चांगलाच रंजक केला आहे.

 

 

४. पीएम नरेंद्र मोदी –

चहाची टपरी चालविण्यापासून ते राजकीय क्षेत्रात विविध आघाड्यावर मजल-दरमजल करीत अखेरीस देशाचे १४ वे पंतप्रधान म्हणून मान मिळविणारे मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीचा यात आढावा घेण्यात आला आहे. २०१४ पूर्वी नरेंद्र मोदीजी राजकारणात कसे सक्रीय होते. या भोवती हा चित्रपट फिरतो. मुख्य भूमिकेत विवेक ऑबरोय याने काम केले आहे.

 

 

५. एनटी आर.कथानायकुडू –

हा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला तेलगु चित्रपट. एनटी आर म्हणजे दाक्षिणात्य प्रांतातले झपाटलेले व्यक्तिमत्व. त्यांच्या राजकीय कारकीर्दीवर आधारित असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर तितकासा हिट ठरला नाही . तसे पाहिले तर विद्या बालन हिने या चित्रपटाद्वारे तेलगु चित्रपट सृष्टीत प्रवेश केला होता.

 

 

६. ताश्कंद फाईल –

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ताश्कंद फाईल हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी आणि नंतरही चांगलाच चर्चेत राहिला . दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यु हे आजतागायत न सुटलेले कोडे आहे.

या विषयावर आधारित अनेक पुस्तके आहेत . पण त्यावर चित्रपट काढण्याचे धाडस मात्र विवेक अग्निहोत्री यांनी दाखवले. नसरुद्दिन शाह आणि मिथुन चक्रवर्ती हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

 

याशिवाय महात्मा गांधी आणि त्यांचे पुत्र हरीलाल यांच्या नाते-संबंधावर आधारित गांधी –माय फादर, अरविंद केजरीवाल यांची कारकीर्द दाखविणारा अॅन इनिसगिनिफकंट मॅन, सरदार पटेल असे अनेक चित्रपट आहेत. ही यादी खूप लांबवू शकते. पण यावरून एक गोष्ट लक्षात येते की, प्रेक्षकांना देखील आता निव्वळ गुडी गुडी असणारे चित्रपट बघायला आवडत नाहीत.

राजकारणी मंडळीच्या आयुष्यात जे खरोखरीच घडलेले आहे, त्यामागचे नाट्य, थरार त्यांना देखील अनुभवायचा असतो. आणि ही नस ज्या दिग्दर्शक –लेखक मंडळीना सापडली तेच चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात, हे वेळोवेळी दिसून आले आहे!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version