Site icon InMarathi

काहीही होऊ द्या – वयाच्या १८ ते ३० दरम्यान या १३ चुका अजिबात करू नका!

couple feature im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

किशोरवय हे आयुष्यात येणारं नाजूक वळणं. या टप्प्यावर आलं, की आपल्यात अनेक वेगवेगळे बदल होतात. अनेक गोष्टींची अर्धवट माहिती मिळू लागते त्यामुळे त्यांच्याविषयी कुतूहल असतं.

या वयात आपल्यातल्या बऱ्याच जणांमध्ये नेमकं काय करायचंय हे माहीत नसताना काहीतरी मोठं करण्याचा तात्पुरता आणि बऱ्याचदा अविचाराने असलेला जोश असतो. थोड्याफार प्रमाणात बंडखोर वृत्ती तयार झालेली असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आईवडिलांपेक्षा मित्रमैत्रिणी जवळचे होण्याचा, आपलं जग होण्याचा हा काळ. बऱ्याचदा या टप्प्यावर आयुष्याविषयीची भोळसट समज असते, त्यामुळे सगळंच अगदी छान-छान, गोड-गुलाबी वाटत असतं. पण आयुष्याची हीच वर्षं खूप काही शिकवणारी असतात.

याच टप्प्यावर आपण थोडे जपून, आपल्या आजूबाजूच्या इतरांकडे बघून, त्यांच्या चुकांमधून शिकून सजगपणे वागू शकलो तर आपला पुढचा रस्ता आपण आपल्यासाठी कितीतरी सुकर करू शकतो. त्यामुळे काहीही झालं तरी १८ ते ३० या वयादरम्यान ‘या’ १३ चुका आपल्याकडून अजिबात होणार नाहीत याची काळजी घेऊया.

१. प्रियकर-प्रेयसीसाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, कुटुंबियांना सोडू नका. तुमचे कुटुंबीय आणि तुमचे जवळचे, विश्वासू मित्रच तुमचा खरा आधार असतात, तुमच्यावर खरं प्रेम करणारे असतात हे लक्षात घ्या.

 

 

प्रियकर-प्रेयसीमुळे जर या महत्त्वाच्या नात्यांना सोडायची इच्छा होत असेल तर प्रियकर-प्रेयसीबरोबरचं तुमचं नातं खऱ्या प्रेमावर उभं राहीलेलं नसेल हे लक्षात घ्या.

२. केवळ शरीरसुख मिळवण्यासाठी कुणासोबतही नात्यात येऊ नका. हे असं वय असतं ज्यात बऱ्याचदा आकर्षण आणि प्रेम यातला फरक लक्षात येत नाही. तुम्ही जर पुरेसे प्रगल्भ असाल तर सुरुवातीच्या या आकर्षणाचं रूपांतर हळूहळू प्रेमात होऊ शकतं, पण बऱ्याचदा हे घडत नसल्याचंच दिसतं.

एखाद्याविषयी केवळ तीव्र शारीरिक आकर्षण वाटत असेल तर ते प्रेम नाही हे लक्षात घ्या.

प्रेमाच्या नात्यात आधी समोरच्या व्यक्तीचा आदर वाटला पाहीजे. जर समोरच्याविषयी तो आदर तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीसोबत नात्यात येऊन त्या व्यक्तीची आणि तुमचीही फसवणूक करत असता. त्यामुळे स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिका आणि ही चूक करणं टाळा.

 

 

३. वयाच्या या टप्प्यावर आपल्यातल्या अनेकांना दिखावा करण्यासाठी गोष्टी करायची सवय लागलेली असते. बऱ्याचदा पिअर प्रेशर खाली येऊन आपण आपल्याला खरंच काय हवंय, नकोय याचा, आपल्याला काय करून कम्फर्टेबल वाटतंय याचा विचार न करता दुसऱ्यांना इम्प्रेस करायला जातो.

आपल्याला त्यातून तात्पुरता आनंद मिळत असेलही, पण हा आनंद फार वेळ टिकत नाही, त्यामुळे या वयात दुसऱ्याला इम्प्रेस करायला जाण्यात वेळ घालवू नका. आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारायला शिका.

४. या वयात खूप लोक आयुष्यात तात्पुरते येणार असतात. खूप लोकांशी मैत्री होण्याचा आणि खूप मैत्री तुटण्याचा हा काळ असतो. त्यामुळे आयुष्यातून जी माणसं निघून जातील त्यांच्यात दीर्घकाळ भावना गुंतवून ठेवू नका.

त्यांना उगीचच महत्त्व देऊ नका. त्या व्यक्ती आयुष्यात आल्यामुळे जे धडे शिकणं तुम्ही गरजेचं होतं ते शिका आणि पुढे जा.

५. या वयात यशस्वी होण्याआधीच प्रेमात पडायची घाई झालेली असते, पण यशस्वी झाल्याशिवाय प्रेमात पडू नका.

तुम्ही यशस्वी नसता तेव्हा ते नातं टिकून राहण्यापेक्षा तुटण्याचीच अधिक शक्यता असते आणि जरी ते टिकून राहीलं तरी तुमच्या ध्येय्यांवरून तुमचा फोकस हलतो आणि त्यामुळे तुम्ही तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचाही वेळ फुकट घालवत असतात. तुमच्या दोघांच्याही भविष्याचा रस्ता त्यामुळे खडतर होऊ शकतो.

६. रिस्क घेण्यात मागे पडू नका, पण या बाबतीत व्यवहारी राहा. आपल्या क्षमता ओळखा आणि त्यानुसारच रिस्क घ्या. म्हणजे नंतर उगीच रिस्क घेऊनही काही झालं नाही असा पश्चात्ताप व्हायला नको.

७. मर्यादित गोष्टींवर तुमचं लक्ष केंद्रित करा. नाहीतर ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असं होईल.

 

 

. आपल्या आईवडिलांना आपलं जितकं भलं व्हायला हवं असतं तितक्या पोटतिडकीने जगातलं दुसरं कुणीही आपला विचार करत नाही.

आपल्या आईवडिलांना कधीही निराश करू नका. त्यांना तुमचा नेहमी अभिमान वाटेल यासाठी प्रयत्न करा आणि त्यांची साथ कधीही सोडू नका.

९. आई-वडिलांशिवाय कधीही दुसऱ्या कुणाहीसमोर रडू नका. मन घट्ट करून आवंढा गिळता येणं तुम्हाला शिकावं लागेल. एका वयानंतर त्यांच्यासमोरही रडू नका. एकटे असाल तेव्हा रडून मोकळे व्हा.

१0. बऱ्याचदा आपल्यासमोर ध्येय असतं, पण ते किती काळात पूर्ण करायचंय याचा आराखडा नसतो. कुठलंही ध्येय समोर ठेवताना ते आपल्याला किती काळात पूर्ण करायचंय याची आखणी करा आणि त्यानुसार प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा.

आपलं ध्येय त्या वेळात आपल्याला साध्य करता आलं नाही तरीही त्याच्यावरच वेळ घालवू नका. तुमच्यादृष्टीने अधिक सोयीचा असलेला मार्ग निवडा. अन्यथा, भरकटत जाल.

११. आपला बँक बॅलन्स कसा वाढेल याकडे जातीने लक्ष द्या. कुणालाही तुमची खासगी माहिती देऊ नका. स्कीम्सच्या प्रलोभनांना बळी पडू नका. गुंतवणूक करणं शिका.

 

 

१२. किमान एकतरी छंद जोपासा. अगदी पुलंनीही हे सांगितलंय. विकेंड म्हटला, की आपल्याला आळसात वेळ घालवायचा असतो. पण ठरवलं तर तो वेळ सत्कारणी लावून आपल्याला नव्या आवडी विकसित करता येतील. अधिक अर्थपूर्ण आणि आनंदी आयुष्य जगता येईल. त्यामुळे छंद जोपासा.

वरच्या मुद्द्यांमध्ये नसलेला शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा. या वयात अपयश आलं तरी खचून जाऊ नका. निराश होणं सहाजिक आहे पण म्हणून प्रयत्नच थांबवणं नाही. उद्याचा दिवस नवा असेल त्यामुळे प्रयत्न करत राहा.

आपल्याला उशीर झालाय असं वाटत असलं तरी हिंमत हरू नका. आपली प्रगती कशी साधता येईल याचा विचार करा. दुसऱ्यांबरोबर कधीकधी स्वतःलाही माफ करणं तुम्हाला शिकावं लागेल. ते शिका आणि पुढे चालत राहा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version