दर चार वर्षांनी या खारी करतात सामूहिक आत्महत्या?! चक्रावून टाकणारा प्रकार!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
खार हा तसा निरुपद्रवी आणि अनेकांचा अगदी लाडका प्राणी. आकाराने लहान, दिसायला सुंदर, गोंडस आणि रामायणाशी सुद्धा नातं सांगणारी खार आवडू नये असं काही कारणच नाही.
झुपकेदार शेपटी अणि तुरतुरु धावणं ही खारीची ओळख आहे. अशी ही खार आत्महत्या करते, असं जर तुम्हाला कुणी सांगितलं तर? बरं एकटी-दुकटी नाही, तर सामूहिक आत्महत्या!
दर चार वर्षांनी एका गावातील खारी सामूहिक आत्महत्या करतात असं मानलं जातं. नेमकं कुठलं आहे हे गाव आणि काय आहे या कहाणीमागचं सत्य, चला समजून घेऊया.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
बर्फाळ प्रदेशातील खारी…
टुंड्रा प्रदेशाचं नाव तुम्ही सगळ्यांनीच भूगोलात नक्कीच वाचलं असेल. याच टुंड्रा प्रदेशाचा खारींच्या आत्महत्येशी संबंध आहे बरं का मंडळी. टुंड्रा प्रदेशातील बर्फ़ाळ भागात राहणाऱ्या खारी अशा आत्महत्या करत असल्याच्या अनेक दंतकथा आहेत.
एवढंच नाही, तर या प्रदेशात असे काही पुरावे सुद्धा मिळाले आहेत. टुंड्रा प्रदेशातील हॅमस्टर हा प्राणी म्हणजेच आपली खारुताईचा मोठा भाऊच म्हणायला हवा.
हॅमस्टर हे या भागातील अनेक प्राण्यांचं भक्ष्य आहे. मात्र ८-१० महिन्यांतून एकदा ज्यावेळी टुंड्रा प्रदेशातील बर्फ वितळून नद्या वाहायला सुरुवात होते, त्यावेळी या वाहत्या नद्यांमध्ये अनेकदा हॅमस्टर्सचे मृतदेह पाहिले गेले आहेत.
साधारण ३ ते ४ वर्षातून एकदा आधी घटना घडते. म्हणूनच हॅमस्टर दार चार वर्षांतून एकदा आत्महत्या करत असल्याचं म्हटलं जातं.
दंतकथा काय सांगते?
हॅमस्टर या प्राण्याला लेमिंग सुद्धा म्हटलं जातं. त्याला लेमिंग म्हणण्यामागचं एक विशिष्ट कारण आहे. लेमिंग या शब्दाचा अर्थ, आंधळेपणाने कुणाचंही अनुकरण करून स्वतःचं नुकसान करून घेणारा असा होतो.
हा प्राणी त्याच्या आकारमानाहून मोठ्या असणाऱ्या त्याच्या भक्षकांवर सुद्धा मागचा पुढचा विचार न करता हल्ला करतो. कुणाचीही भीती त्याच्या मनात नसते.
लेमिंग्स आकाशातून अचानक प्रकटतात आणि नंतर दरीत उड्या मारून जीव देतात असं मानोल जातं. खरं तर लेमिंगचं दर्शन अगदीच दुर्मिळ असतं.
तीन-चार महिने चांगला उन्हाळा आला आणि गवत चांगल्यापद्धतीने वाढू लागलं, की मगच लेमिंग्स बाहेर दिसू लागतात. एरवी थंडीचा सामना करण्यासाठी ते आपल्या बिळातच लपून बसलेले असतात.
त्यांची संख्या अगदी अचानक वाढू लागते, त्यामुळेच ते आकाशातून प्रकटतात अशी दंतकथा प्रचिलित आहे. पूर्वी फारसं तंत्रज्ञान अवगत नसताना, त्यांची संख्या अचानक वाढण्याचं कोडं हे एक गूढ रहस्य होतं, मात्र आता शाश्त्रज्ञ या ना त्या मार्गाने टुंड्राच्या उंचीवर आणि थंड प्रदेशात पोचू लागले आहेत. त्यामुळे हे काहीसं उलगडू लागलं आहे.
का वाढते लेमिंग्सची संख्या?
दर ३-४ वर्षातून एकदा लेमिंग्सची संख्या का वाढत असावी यावर जी माहिती मिळाली आहे, ती फारच रंजक आहे. मुख्यतः गवत आणि चारा खाऊन जगणाऱ्या लेमिंग्सना उन्हाळ्याच्या काळात भरपूर खाद्य मिळतं.
३-४ वर्षातून एकदा जेव्हा उत्तम उन्हाळा पडतो, त्यावेळी त्यांना भरपूर गवत मिळू लागतं. चांगलं खाद्य मिळाल्यामुळे त्यांची संख्या वाढू लागते. त्यांच्या विष्ठेतून गवत आणि इतर झाडाझुडपांना खत मिळतं आणि हे चक्र असंच सुरु राहतं.
लेमिंग्सच्या माद्या एका हंगामात जवळपास ८ वेळा प्रजनन करतात. प्रत्येकवेळी ८-१० पिलांना जन्म देतात. जन्माला आलेल्या पिल्लांपैकी ज्या माद्या असतात, त्या पुढच्या महिन्याभरातच त्यांच्या पिलांना जन्म देतात.
आता तुम्हीच हिशोब लावा की तीन महिन्यात लेमिंग्सची संख्या किती वाढेल. ही अशी संख्या वाढू लागली, की मग त्यांना निराळीच ऊर्जा येते आणि आणि ते दरीतून उड्या मारून आत्महत्या करतात असं मानलं जातं.
एका प्राण्याची संख्या अमाप वाढू नये यासाठी निसर्गाने केलेली ही तरतूद आहे असं काही जणांचं म्हणणं आहे.
—
- रात्री का चमकतात प्राण्यांचे डोळे? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक उत्तर!
- माकडाने सेल्फी काढण्यासाठी पळवला फोन… काय गम्मत झाली ते वाचाच…
—
आत्महत्या नव्हे, तर जगण्याची धडपड…
सत्य पाहायला गेलं तर, हे सगळे अंदाज सगळे कयास चुकीचं असल्याचं तुमच्या लक्षात येईल. लेमिंग्सचा मृत्यू म्हणजे आत्महत्या नसून त्यांच्या जगण्यासाठी त्यांनी केलेली धडपड असते. यात अयशस्वी झाल्याने त्यांना जीव गमवावा लागतो.
संख्या अमाप वाढू लागली की पर्वतावरील खाद्य आणि निवारा कमी पडू लागतो. मग खाद्य आणि निवारा अनेक लेमिंग्स पर्वतराजी सोडून सपाट जागेकडे मार्गक्रमण करू लागतात. या वाटेत उन्हाळ्यामुळे सुरु झालेले अनेक ओढे, नद्या लागतात.
या प्रवाहात सापडलेले लेमिंग्स त्यातून बाहेर पाडण्यात नेहमीच यशस्वी ठरत नाहीत. पोहता येत असूनही, प्रवाहाचा जोर अधिक असल्याने ते नद्यांसह वाहून जातात.
जगण्याची धडपड करत असलेले हे लेमिंग्स अखेर आपलं आयुष्यच गमावून बसतात. असेच मृतदेह नद्यांच्या प्रवाहातून वाहत आलेले पाहायला मिळतात.
लेमिंग्स आकाशातून अवतरणं आणि त्यानंतर त्यांनी दरीत उड्या मारून जीव देणं, या दंतकथांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं यामुळे पाहायला मिळतं.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.