आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेलं रशिया-युक्रेन युद्ध अद्याप थांबण्याचं नावं घेत नाहीये. हे युद्ध थांबावं म्हणून पाश्चिमात्य राष्ट्रांनी बलाढ्य रशियावर आर्थिकदृष्ट्याही दबाव आणायचा प्रयत्न केला तरीदेखील हे युद्ध थांबलं नाही. या युद्धामुळे तिसऱ्या महायुद्धाची शक्यताही वर्तवली गेली होती.
सर्वसामान्य युक्रेनियन जनतेला, बाहेरदेशातून युक्रेनमध्ये आलेल्यांना आणि युद्धामुळे तिथेच अडकून बसलेल्यांना युद्धाच्या झळा सोसाव्या लागल्या. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा किती दरारा आहे याचा एकूणच आवाका सगळ्यांच्या लक्षात आला.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
या सगळ्या काळात व्लादिमिर पुतीन यांच्याबद्दलची पुष्कळ माहिती प्रसारमाध्यमांनी समोर आणली. आधीच लोक कोरोनामुळे वैतागलेले आणि त्यात ही युद्धपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर पुतीन यांच्यावर लोकांनी अक्षरश: मिम्सही केले.
पुतीन स्टेरॉइड्स घेतात इथपासून त्यांच्या प्रेयसीपर्यंत अनेक वादग्रस्त कारणांसाठी पुतीन चर्चेत आले. पण सध्या समोर आलेल्या पुतीन यांच्याविषयीच्या एका नव्याच माहितीने गहजब उडवला आहे. MI6 या ब्रिटिश गुप्तचर संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुतीन यांच्याविषयी एक खळबळजनक दावा केला आहे.
पुतीन यांचा मृत्यू झालेला असू शकतो आणि पुतीन यांच्याऐवजी त्यांच्यासारखाच हुबेहूब दिसणारा एक तोतया पुतीन म्हणून सार्वजनिक समारंभांमध्ये उपस्थित राहत असू शकतो असा दावा त्यांनी केलाय. नेमका काय आहे हा प्रकार? जाणून घेऊ.
ब्रिटिश अधिकाऱ्यांनी यापूर्वीही पुतीन यांच्याविषयी दावे केले होते. पण आताच्या त्यांनी केलेल्या दाव्याने सर्वत्र गोंधळ उडाला आहे.
पुतीन हे आधीपासूनच खूप आजारी होते आणि जर त्यांचा मृत्यू झाला असेल तर सत्तेत राहायचं म्हणून शक्य होईल तितका काळ क्रेमलिन हे लपवून ठेऊ शकतं असा दावा MI6 या गुप्तचर संस्थेने केला आहे. “पुतीन खूप आजारी आहेत आणि जेव्हा ते जातील तेव्हा त्यांचा मृत्यू झालाय हे काही महिने लपवणं शक्य झालं नाही तरी काही आठवडे लपवलं जाईल. त्यांचं आधीच निधन झालं असल्याचीही शक्यता आहे.”,MI6 ने सांगितलं.
“पुतीन इतक्यात मीडियासमोर आले होते त्याचं रेकॉर्डिंग आधीच करून ठेवलं गेलं असल्याची शक्यता आहे.”, असं एका सूत्राने ‘डेली स्टार’ला सांगितलं. पूर्वी पुतीन आजारी असताना त्यांनी आपल्या जागी आपल्यासारखा हुबेहूब दिसणारा एक तोतया नेमला होता अशी चर्चा होती. क्रेमलिनही आता हे करत असल्याचं म्हटलं जातंय.
गेल्या काही महिन्यांपासून पुतीन यांची तब्येत खालावत असल्याचं स्पष्ट आहे आणि त्यांच्या फुगलेल्या चेहऱ्याकडे पाहून ते एकतर स्टेरॉइड्स घेत असावेत किंवा त्यांची कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू असावी असं म्हटलं जातंय. त्यांची हालचालही मंदावल्याची दिसलीये. त्यांना रक्ताचा कर्करोग असू शकतो असं काही जणांचं निरीक्षण आहे.
युक्रेनच्या लष्करी गुप्तचर संस्थेचे प्रमुख असलेले मेजर जनरल किरिको बुडानोव्ह यांनी पुतीन हे गंभीरदृष्ट्या आजारी असल्याचा दावा केला आहे. तर क्रेमलिनशी निकटचा संबंध असलेल्या रशियन अलिगार्च यांनी पुतीन हे रक्ताच्या कर्करोगामुळे बरेच आजारी असून युक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती असं म्हटलंय.
रशियातील व्यवहारांचे तज्ञ असलेले फिओना हिल पूर्वी पुतीन यांना भेटले होते. ते म्हणाले, “ते फारसे बरे दिसत नव्हते.” आणि त्यावेळी ते “स्टेरॉइड्सचे हाय डोसेस” घेत असावेत. ब्रिटिश गुप्तचर संस्थेचे एक माजी गुप्तहेर क्रिस्टोफर स्टील यांनी पुतीन यांच्या अस्वास्थ्यामुळे त्यांचं रशियावरचं वर्चस्व कमी होत होतं आणि ते देशाला अराजकतेत ढकलत होते असा दावा केला आहे. पुतीन यांना उपचारांसाठी सारखाच ब्रेक घ्यायला लागत होता आणि मॉस्कोमध्ये ते सोडून दुसरं कुठलं प्रभावी राजकीय नेतृत्त्व स्पष्टपणे दिसत नव्हतं असंही त्यांनी सांगितलं.
काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लहान गटाचे पुतीन हे प्रमुख असून ते सगळेजण त्यांच्याशी अत्यंत एकनिष्ठ आहेत. जर पुतीन यांच्या मृत्यूची बातमी समोर आली तर रशियामध्ये सत्तापालट होईल आणि रशियाचं जर्नल युक्रेनहून आपल्या सैन्याला परत बोलवून घेतील अशी भीती पुतीन यांच्या साथीदारांना वाटत आहे.
—
“फक्त आणि फक्त पुतीनच साऱ्या जगावर राज्य करतील” बाबा वांगांची पुन्हा भविष्यवाणी
आपल्याला विष दिलं जाईल अशी भीती पुतीन यांना वाटतेय… जाणून घ्या, त्यामागचं कारण
—
“पुतीन यांच्या मृत्यूमुळे ते शक्तिहीन आणि असुरक्षित होऊन जातील त्यामुळे पुतीन जिवंत असल्याचं ते सांगत असावेत. मात्र वास्तव याच्या विरुद्धही असू शकतं.”, असं गुप्तचर संस्थेच्या सूत्राने सांगितलं.
या महिन्याच्या सुरुवातीला ‘मॉस्को विजय दिना’चा जो सोहळा झाला त्यावेळी तिथे पुतीन यांच्याऐवजी हुबेहूब त्यांच्यासारखा दिसणारा तोतयाही उपस्थित राहीला असू शकेल. पुतीन यांचा खरंच मृत्यू झालाय की नाही? हे कळू शकलेलं नाही. याचा तपास करणं असंभव असल्याचं म्हटलं जातंय.
गेल्या तीन महिन्यांपासून केवळ युक्रेनमध्येच नाही तर जगभरात ज्या माणसाची इतकी दहशत निर्माण झाली त्याच्याविषयी इतकं सनसनाटी वृत्त समोर आल्यामुळे आता याविषयी पुढे आणखी काय आणि कधी कळेल याकडेच सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. या वृत्तातलं तथ्य समोर यावंच आणि इतका काळ रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्धही थांबावं इतकीच आशा करणं आपल्या हातात आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.