आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
९ऑगस्ट हा आपल्याकडे क्रांतिदिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी रिलीज झालेल्या ‘सौदागर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष घई यांनी देखील चित्रपटात दोन दिग्गज कलाकारांना एकत्र आणून क्रांति घडवली होती. या चित्रपटाची नायिका होती मनीषा कोइराला.
मनीषा त्यावेळचे नेपाळ चे पंतप्रधान ‘बी पी कोइराला’ यांची नात आहे. सौदागर हा तिचा पहिला हीट चित्रपट होता. मनीषाने एकापेक्षा एक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मनीषाची फिल्मी कारकीर्द फार मोठी नव्हती, पण तीने ज्याकाही चित्रपटात भूमिका केल्या त्यात ती यशस्वी झाली.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
यातच तिचा महत्वाचा चित्रपट येतो सौदागर… या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घडलेला एक किस्सा फारच फेमस झाला होता. आता तुम्ही म्हणाल बॉलीवूड आणि किस्से-कहानिया म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात त्यात विशेष ते काय? पण हा किस्सा विशेष यासाठी आहे की यामध्ये त्यावेळच्या भारताच्या पंतप्रधानांना खुद्द लक्ष घालावे लागले होते. आहे ना इंटरेस्टिंग? नक्की काय घडले की आजही हा किस्सा तेवढाच तिखट मीठ लावून सांगितला जातो. पण त्यापूर्वी जाणून घेवू मनिषाबद्दल…
९० च्या दशकात लाखो हृदयांवर राज्य करणारी सुंदर अभिनेत्री मनीषा कोईराला हिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि आपल्या सौंदर्याने आणि उत्कृष्ट अभिनयाने लाखो लोकांना वेड लावले आहे.जर आपण तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललो, तर नेपाळी वंशाची मनीषा राजकीय कुटुंबातील आहे, परंतु लहानपणापासून ती भारतात राहत होती. तिने स्वत:साठी करिअर म्हणून चित्रपट क्षेत्र निवडले.
विशेष म्हणजे मनीषा कोईरालाचा बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नव्हता, मात्र तरीही तिने या इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले होते. त्यावेळी तिची गणना तिच्या काळातील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होते.
‘१९४२ ए लव्ह स्टोरी’, ‘अकेले हम अकेले तुम’, ‘अग्नी साक्षी’, ‘गुप्त’, ‘दिल से’, ‘लज्जा’ आणि ‘मन’ आणि ‘एक छोटी सी लव्ह स्टोरी’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केले, पण तुम्हाला माहिती आहे का की, मनिषाने कुटुंबाच्या विरोधात जाऊन हे स्थान मिळवले. त्यासाठी तिने तिच्या आईला ब्लॅकमेल केले होते.
मनीषाला लहानपणापासूनच हिरोईन बनायचे होते, पण तिचे कुटुंबीय याला विरोध करत होते. वास्तविक, तिचे आजोबा विश्वेश्वर प्रसाद कोईराला नेपाळचे पंतप्रधान होते. अशा परिस्थितीत मनीषाने चित्रपटात काम करावे अशी कोणाचीच इच्छा नव्हती, अभिनेत्री होण्यासाठी तिला खूप प्रयत्न करावे लागले, त्यानंतर ती हिरोईन बनली.
मनीषा कोईरालानेही एका टॉक शो मध्ये खुलासा केला होता की तिने कुटुंबातील सदस्यांना हिरोईन बनण्यासाठी कसे राजी केले आणि तिने चित्रपटात काम कसे सुरू केले. मनीषा कोईरालाच्या म्हणण्यानुसार, तिचे पालनपोषण अगदी साधे होते, घरातले सगळे तिच्या चित्रपटात काम करण्याच्या विरोधात असले तरी तिच्या आजीने तिला सपोर्ट केला आणि चित्रपटांच्या दुनियेतला तिचा प्रवास सुरू झाला.
शोमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले सुभाष घई तेव्हा सौदागर चित्रपटासाठी नायिकेच्या शोधात होते. त्या काळातली उभारती अभिनेत्री ‘दिव्या भारती’ त्यांची पहिली पसंती होती पण ती या रोल ला सूट होणार नाही असे घई यांना वाटले आणि मनिषाची निवड झाली आणि सौदागर’ चित्रपटाचे शूटिंग कुल्लू मनालीमध्ये सुरू झाले.
आता येतो तो पंतप्रधानवाला किस्सा. तर झाले असे की की चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मनिषाला घोडेस्वारी कायची होती तसेच खडकाळ रस्त्यावरून सायकल चालवायची होती . या गोष्टींचा अजिबात अनुभव नसल्याने मनीषाला ते करणे काही जमात नव्हते तेव्हा तिने सकाळ चालविण्यास नकार दिला याने दिग्दर्शक सुभाष घई भडकले आणि भर सेटवर तिच्यावर टिप्पणी केली. मनिषाला हे सहन झाले नाही. तिने ही गोष्ट आपल्या आईला सांगितली आणि आईने मनीषाचे वडील प्रकाश कोईराला यांना ही गोष्ट सांगितली.
ही बाब तिच्या वडिलांना कळताच त्यांनी दिल्लीत फोन करून एका मोठ्या नेत्याला हा सर्व प्रकार सांगितला. ही मालिका इथेच संपली नाही. तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांनी राज बब्बर यांना फोन करून चौकशी करून हे प्रकरण मिटवण्यास सांगितले. राज बब्बर यांनी तत्काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली. यानंतर अनेक छोटे-मोठे नेते कुल्लू मनालीला पोहोचले, जिथे ‘सौदागर’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होते.
–
सुंदर दिसण्यासाठी १२ अभिनेत्रींनी केलेला ‘उपाय’; कधी जमला तर कधी फसला!
दिव्याभारतीच्या मृत्यूनंतर, श्रीदेवीला सेटवर पाहून लोक खूप घाबरले कारण …
–
तेथे पोहोचल्यानंतर सर्वांनी ते भांडण सोडवले. शूटिंग सेटवर असे अनेक किस्से होत राहतात पण प्रत्येकाला असे आश्चर्य वाटले की अशा एका सहज गोष्टीसाठी कोणी पंतप्रधानांपर्यंत का पोहोचेल. पण एक मात्र झाले की तेव्हापासून लोक मनीषा कोईराला यांच्याशी बोलण्याआधी विचार करू लागले.
बालहट्ट आणि स्त्रीहट्ट यापुढे कोणाचेही काही चालत नाही अगदी एका देशाच्या पंतप्रधानचे देखील हो ना? कालांतराने वाद मिटला. चित्रपट रिलीज झाला, हीट झाला, मनिषाच्या कामाचे कौतुक झाले तसा हा किस्सा देखील हीट झाला आणि चित्रपटाचा विषय निघाला की हा किस्सा देखील आवर्जून सांगितला जातो.
मनीषा मनीषा कोईराला यांचे आयुष्य चढ-उतारांनी भरलेले आहे. कधी ब्रेकअपमुळे तर कधी आजारपणामुळे ही अभिनेत्री खूप तुटली होती, पण लवकरच तिने यातून बाहेर पडण्याचा निर्धार केला आणि पुन्हा उत्साहाने आयुष्य जगू लागली आहे. तर हा होता किस्सा पंतप्रधान यांनाही का लक्ष घालावे लागले याचा. वाचून तुम्हाला नक्कीच आवडला तर तुमचाज्वलचे असे किस्से आमच्यासोबत जरूर शेअर करा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.