आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
काही वर्षांपूर्वी भारतात पेंग्विन आणले गेले. त्यावरून मग उलटसुलट चर्चा, सोशल मीडियावर स्वघोषित तज्ज्ञांची मतमतांतरं, पेटलेलं राजकारण आणि आणखी बऱ्याच गोष्टी अनुभवायला आणि पाहायला मिळाल्या. भारतीय वातावरणात पेंग्विनचा निभाव कसा लागणार, याविषयी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळीकडे चर्चा झाली, असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
अर्थात, ते पेंग्विन अधिकृतरीत्या भारतात आणले गेले होते. मात्र ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी असलेला कांगारू भारतात दिसतो असं जर तुम्हाला कुणी सांगितलं तर? होय मंडळी ही गोष्ट खरी आहे. चोरीछुपे अशा प्राण्यांची तस्करी करण्यात येते. त्यामुळेच भारतात सुद्धा कांगारू आढळल्याच्या घटना घडल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तम सुरक्षा यंत्रणा असूनही ही अशी तस्करी का आणि कशासाठी होत आहे, हे समजून घेऊयात.
शिकार तर थांबली पण…
सध्याच्या काळात वन्यप्राण्यांच्या शिकारीवर बंदी आहे. सलमान खानने काळवीटाची शिकार केली असल्याचा खटला मोठया प्रमाणावर गाजला होता. मात्र पूर्वी शिकारीवर बंदी नव्हती. सर्रास अनेक वन्यप्राण्यांच्या शिकारी झाल्या आहेत. राजेरजवाडे, इंग्रज यांनी मनसोक्तपणे प्राण्यांच्या हत्या केल्या आहेत. स्वतःचं घर, महाल, राजवाडा किंवा अशाच काही वास्तू सुशोभित करण्याच्या नादात प्राण्यांची बेछूट कत्तल आपण करत आहोत याचं भानच त्यावेळी कुणाला राहिलं नाही.
निव्वळ गवत खाऊन जगणाऱ्या अनेक शाकाहारी प्राण्यांच्या पिढ्या यामुळे नष्ट झाल्या. परिणामी अन्नसाखळीवर मोठा परिणाम झाला आहे. आज शिकारीवर बंदी असल्याने याचं प्रमाण फार कमी झालं आहे. मात्र असं असूनही, प्राण्यांची तस्करी आणि त्यामुळे होणाऱ्या वन्य प्राण्यांच्या हत्या हे मुद्दे आजही महत्त्वाचे आहेत. शिकारीचा मुद्दा फार भयावह ठरत नसला, तरी तस्करी फारच त्रासाची आणि नुकसानकारक ठरत आहे.
सुरक्षा तैनात असूनही
वन्यजीवांची तस्करी हा फारच गंभीर विषय होऊ लागला आहे. वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी असलेली जागतिक यंत्रणा ही खरंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणारी आहे. असं असूनही, प्राण्यांची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही धोक्याची घंटा नक्कीच आहे.
जगभरात वेगवेगळ्या प्रकारची तस्करी केली जाते. अशा तस्करीबद्दल बातम्या, चित्रपट किंवा इतर माध्यमांमधून आपण ऐकलेलं असतं. मात्र वन्यजीव तस्करी ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी तस्करी आहे.
ही तस्करी होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. हौस आणि अंधश्रद्धा या दोन्ही बाबी यात मोठ्या प्रमाणात सहभागी असल्याचं म्हणायला हवं. वन्यजीव तस्करी निसर्गाचा समतोल ढळण्यासाठी कारणीभूत ठरू लागली आहे. हौसेने प्राणी पाळणारे सुद्धा वन्यजीवांसाठी धोकादायक ठरत आहेत. प्राण्यांची तस्करी वाढण्याचं हेदेखील एक महत्त्वाचं कारण असल्याचं म्हटलं जात आहे.
निरुपद्रवी प्राणी ठरतायत तस्करीचे शिकार
तस्करी होणाऱ्या प्राण्यांची यादी करायची झाली तर या यादीत खवले मांजर पहिल्या स्थानावर आणि कासव दुसऱ्या स्थानावर असल्याचं पाहायला मिळतंय. अत्यंत निरुपद्रवी असणारे हे दोन्ही प्राणी तस्करांची शिकार ठरत आहेत.
खवले मांजराचे मांस खायला फारच चविष्ट असतं. याशिवाय त्याचे खवले विविध सुशोभीकरणासाठी वापरले जाऊ शकतात. भारताच्या अत्यंत दुर्गम जंगली भागात सापडणारी ही मांजराची जात अत्यंत निरुपद्रवी आणि शांत मानली जाते.
दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या कासवाची सुद्धा अशीच गत आहे. सॉफ्ट शिल्ड, फ्लॅप शिल्ड अशी गावठी कासवं किंवा सागरी कासवं यांना फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. कासव पाळणे हा अनेकांचा छंद असतो. मात्र निसर्गापासून दूर आणून त्याला घरात पाळणं हा त्याच्यासाठी धोक्याचा विषय ठरतो. फिश टॅंकमध्ये कासव पाळणं हा गुन्हा असून यासाठी मोठी कारवाई केली जाऊ शकते, हेदेखील तुम्हाला माहित असेल.
कासवाची तस्करी करण्यासाठी सुद्धा एक अंधश्रद्धा कारणीभूत आहे. कासव दीर्घायुषी असतं, हे तर तुम्हाला ठाऊक असेलच. त्याच्याप्रमाणे आपल्याला सुद्धा दीर्घयुष्य लाभावं यासाठी कासवाचं रक्त प्यायला हवं अशी अंधश्रद्धा अनेकजण पाळतात. ही अंधश्रद्धाच सुद्धा कासवांच्या तस्करीचं मोठं कारण आहे.
या तस्करीपायी अनेक प्राण्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अनेक प्रजाती तर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. चांगली सुरक्षा यंत्रणा अस्तित्वात असतानाही अशी तस्करी सुरु राहिली, तर अनेक प्रजाती नामशेष होऊन अन्नसाखळीला धोका संभवतो.
अंधश्रद्धा आणि बरंच काही…
प्राण्यांची तस्करीचं मुख्य कारण म्हणजे लोकांच्या मनात असेल्या अंधश्रद्धा! गुप्तधनाचा शोध घेण्यासाठी, गांडूळ सापाची गरज असते ही अंधश्रद्धा अनेक ठिकाणी प्रचलित आहे. परिणामी ही दुर्मिळ प्रजाती तस्करीची शिकार होते. नागमणी मिळवण्यासाठी नागाची गरज असणं, लक्ष्मीचं वाहन म्हणून एका विशिष्ट जातीचं घुबड पाळणं असा अंधश्रद्धा तस्करीला मोठ्या प्रमाणावर खतपाणी घालणाऱ्या आहेत.
–
तब्बल १० वर्षे जंगली प्राण्यांसोबत काढणारी ही आहे रियल लाईफ मोगली !
“जंगलावर हत्तीचा हक्क ‘पहिला’..! पाडा तुमची भिंत!”
–
याशिवाय मानवी हौस मोठ्या प्रमाणावर वन्यजीव तस्करी करायला अनेकांना प्रवृत्त करते. निव्वळ हौस म्हणून, बहिरी ससाणा वगैरे वन्यपक्षी पाळण्याची इच्छा अनेकजण पूर्ण करतात. परिणामी अशा पक्ष्यांची तस्करी अटळ आहे.
अनेक ठिकाणी फार्म हाऊसमध्ये शोभेची वस्तू म्हणून हे प्राणी ठेवले जातात. टफटेड कापुचिन सारखी वानरांची एक दुर्मिळ प्रजाती हैदराबादसारख्या मोठ्या शहरांमध्ये, तस्करी करून आणली जाते. या आणि अशा अनेक विदेशी प्राण्यांना केवळ फार्म हाऊसमध्ये ठेवण्याचा हट्ट म्हणून भारतात आणलं जातं.
तस्कर पकडले गेले तरी…
उत्तम आणि आधुनिक सुरक्षा यंत्रणा असल्यामुळे वन्यजीवांच्या तस्करांवर कारवाई होते, यात शंकाच नाही. त्यांचे अनेक डाव हाणून पाडले जातात. मात्र अशा तस्करांवर दंडात्मक किंवा तुरुंगवासाची कारवाई झाली, तरीही प्राण्यांची मागणी कमी होत नसल्याने, नवे तस्कर निर्माण होतच राहतात. मानवी हौस आणि अंधश्रद्धा यांच्यावर आळा बसल्याशिवाय ही तस्करी थांबवणं खरोखरंच कठीण आहे, असं म्हटलं तरी ते फारसं चुकीचं ठरणार नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.