आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
हॉलीवूड चित्रपट पाहत असताना हा प्रश्न नेहमी सतावत असतो की, दोन ते अडीच तासांचा चित्रपट पण त्यात गाणी का नसतात? आपल्या बॉलीवूडचं पहा, असा चित्रपट मिळणे अगदी दुर्मिळच ज्यात गाणी नसतील. ३ तासांचा बॉलीवूड चित्रपट पण त्यात अर्ध्या-एक तासाची केवळ गाणी असतात. तर दुसरीकडे बहुतांश हॉलीवूड दोन-अडीच तासांचे असून देखील एकदा पिक्चर सुरु झाला की कोणत्याही गाण्या शिवाय सुरु होतात आणि संपतात देखील.
चला तर आज आपण जाणून घेऊया की, हॉलीवूड चित्रपटात गाणी नसण्यामागचं कारण आहे तरी काय?
तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल पण पूर्वीच्या काळी हॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील बॉलीवूड चित्रपटांसारखी गाणी असायची. अगदी ५० आणि ६० च्या दशकापर्यंत हे गाण्यांचं वेड हॉलीवूडमध्ये दिसून येत होतं. उदा. Seven Brides for Seven Brothers (1954) आणि The Sound of Music (1965)
पण हळूहळू हॉलिवूडच्या दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना विविध विषय मांडण्याचे वेध लागले आणि काळाप्रमाणे साय-फाय, सोशल, हॉरर, फॅन्टसी या विषयांमध्ये रमत गेलेलं हॉलीवूड म्युजिकल विश्वातून बाहेर आलं. रोमान्सच्या पलीकडे जाऊन प्रेक्षकांना नवीन काय देता येईल याचा दिग्दर्शक आणि निर्माते विचार करत राहिले.
दरम्यानच्या काळात हॉलीवूड मधून हद्दपार होत चाललेलं गाण्याचं युग म्युजिकल बँड्स, ग्रुप्स यांनी काबीज केलं आणि प्रेक्षकांची गाण्याची भूक येथे भागवली जाऊ लागली.
अजून एक मुख्य कारण म्हणजे पूर्वीच्या हॉलीवूड चित्रपटांमध्ये कलाकार आपलं गाणं स्वत: गायचे. प्लेबॅक सिंगर वगैरे नावाचा प्रकार नव्हताच मुळी, त्यामुळे हॉलीवूड मधून गाणी हद्दपार होण्यास हे एक कारण महत्त्वाचं ठरलं. आपल्या बॉलीवूड मध्ये मात्र प्लेबॅक सिंगर शिवाय पानच हलत नाही.
पण असं मुळीच नाही की, हॉलिवूड मध्ये कोणत्याच चित्रपटात गाणी नसतात. तिथेही असे चित्रपट रिलीज झाले आहेत आणि रिलीज होत आहेत, ज्यात श्रवणीय गाणी आहेत. फक्त आपल्या भारतीय रसिकांपर्यंत हे चित्रपट पोचत नाही इतकंच. हॉलीवूडची एक विशेषता म्हणजे तेथे गाणी असलेले चित्रपट स्वतंत्र म्युजकाल कॅटेगरीमध्ये येतात आणि आपण इकडे पाहतो फॅन्टसी, साय-फाय आणि हॉरर कॅटेगरी मधील चित्रपट! अॅकेडेमिक अवॉर्ड मध्ये बेस्ट ओरीजल सॉंगसाठी ही पुरस्कार दिला जातो हे देखील यथे लक्षात घ्या.
पण या म्युजीक्ल चित्रपटांमध्ये असलेली गाणी ही कथेला अनुरूप असतात, बॉलीवूड प्रमाणे उगाच चित्रपटाचा वेळ लांबवायचा म्हणून गाणी अॅड केली जात नाहीत.
आपण बऱ्याचदा जे हॉलीवूड चित्रपट पाहतो ते ९० मिनिटांचे असतात, त्यात गाणी दाखवल्याने फारसा काही फरक पडणार नाही ही समज हॉलीवूडकरांना फार पूर्वीच आली आहे हे त्यांचे भाग्य (आपल्या बॉलीवूडला ही समज कधी येणार देव जाणे!) म्हणूनच बहुतेक हॉलीवूड चित्रपटामध्ये गाणी ही बॅक ग्राउंड मध्ये चालवली जातात. त्यासाठी वेगळा डान्स वगैरे ते बसवत नाहीत, जेणेकरून कथेला खिळलेला प्रेक्षक कंटाळू नये, आपल्या बॉलीवूडमध्ये तर हॉरर चित्रपट देखील गाण्याशिवाय पूर्ण होत नाही.
तर अशी ही काही कारणे आहेत, ज्यांमुळे आपल्याला हॉलीवूड चित्रपटात गाणी दिसत नाहीत. बॉलीवूडमध्ये मात्र असे गाण्याविना निव्वळ कथेवर केंद्रित असणारे चित्रपटांचे युग उजाडायला कित्येक युगे जातील ते देवच जाने, त्यामुळे त्याबद्दल केवळ आशावादी राहणेच आपल्या हातात आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.