आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
उन्हाच्या तावाने तापलेल्या दुपारीनंतर येणारी संध्याकाळ तेव्हा सुसहय होते जेव्हा अचानक आलेल्या वार्याच्या झुळुकीसोबत मोगर्याचा दरवळ येतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
मोगरा, नुसते नाव जरी घेतले तरी शांत अशा शितलतेचा आभास होतो. आपल्यापैकी अनेक जणांनी बाल्कनीमध्ये, बागेमध्ये किंवा गच्चीवरच्या बागेमध्ये मोगरा नक्की लावला असेल.
पण बरेचदा काय होते आरंभशूर असल्याप्रमाणे आपण हौसेने फुलझाडे तर आपल्या बागेत लावतो पण त्यांची जपणूक काशी करावी हेच आपल्याला माहिती नसते मग काय होणार? इतक्या हौसेने आपण आणलेला तो मोगरा आपल्यावर रूसतो, फुलत नाही आणि आपण ही खट्टू होतो.
पण थांबा आम्ही घेऊन आलो आहोत अशा अमेझिंग टिप्स ज्यामुळे तुमचा रूसलेला मोगरा हसेल आणि बहरेल, कोणत्या आहेत बर या टिप्स?
गुलाब, जास्वंद याप्रमाणेच माेगरा देखील अनेकांचा लाडका असतो. त्यामुळेच घरातल्या बागेत मोगरा आवर्जून लावलाच जातो. सिंगल, डबल, गुंडुमलई, मोतीया, बटमोगरा, वसई, मदनबाण अशा मोगऱ्याच्या अनेक जाती असून मोगरा इंडोनेशिया आणि फिलिपीन्स या देशांचे राष्ट्रीय फूल आहे.
उन्हाळा आणि पावसाळा हे मोगऱ्याचे मुख्य हंगाम! माचे ते मे या काळात मोगरा विशेष बहरलेला असतो. शिवाय पावसाळ्यातही मोगऱ्याच्या काही जातींना फुलं येतात. पण वर्षभर सांभाळलेल्या मोगऱ्याला जेव्हा ऐन हंगामात फुलंच येत नाहीत किंवा अवघी दोन- तीन फुलंच येतात, तेव्हा मन खूपच उदास होऊन जातं. म्हणूनच आपल्या कुंडीतल्या मोगऱ्याची थोडी काळजी घ्या, त्याला काय हवं, काय नको ते पहा आणि मग बघा तो तुम्हाला कशी भरभरून फुलं देतो ते! त्यापूर्वी या ही गोष्टी लक्षात ठेवा की,
मोगर्याला पाण्याचा व्यवस्थित निचरा होणारी माती लागते. मोगर्याला खूप पाणी घालू नये. माती हाताला कोरडी लागली की मगच त्याला पाणी द्या. उन्हाळ्यात साधारण २ आठवड्यातून एकदा माेगऱ्याला खत द्यावं.
मोगऱ्याचं रोप भरपूर सुर्यप्रकाश येणाऱ्या जागी ठेवावं. मोगऱ्याची माती दोन वर्षातून एकदा बदलावी. माती बदलल्यावर झाड २- ३ दिवस प्रखर सुर्यप्रकाशात ठेवू नका. मे महिन्यानंतर माेगऱ्याचा बहर ओसरतो. त्यानंतर फांद्यांची साधारण ५- ६ इंच छाटणी करा. ३ ते ४ दिवस पाणी देऊ नका. नंतर भरपूर पाणी द्या. यामुळे नविन पानं फुटतात आणि पावसाळ्याच्या हंगामात पुन्हा भरपूर फुलं येतात.
याखेरीज आणखी काही टिप्स आहेत ज्यामुळे तुमचा मोगरा बहरायला मदत होईल
१. पुरेसा सूर्यप्रकाश :
तुमचा मोगरा तेव्हाच फुलेल जेव्हा त्याला चांगला सूर्यप्रकाश मिळेल. मोगरा फुलण्यासाठी रोपाला भरपूर सूर्यप्रकाशात ठेवावे लागेल.
जिथे मोगऱ्याला सूर्यप्रकाश मिळू लागतो, तिथे कळ्यांची संख्या वाढते.
२. एप्सम मिठाचा वापर
एप्सम सॉल्टचा वापर मोगरा रोपांसाठी चांगला आहे. १ चमचे एप्सम मीठ २ लिटर पाण्यात घाला आणि ते झाडाच्या मातीत घाला. आपण स्प्रे बाटलीने फवारणी केल्यास ते उत्कृष्ट होईल.
फक्त पानांवर फवारणी करा आणि त्याची प्रतीक्षा करा. १५ दिवसांनी तुमच्या रोपात मोगऱ्याची भरपूर फुले उमलताना पाहून तुम्हाला आनंद वाटेल.
३. मातीचे कोरडेपण टाळा
जर तुम्हाला तुमची मोगरा झाडे वाचवायची असतील तर रोपातली माती कोरडी होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. मातीचे कोरडेपण मुळांसाठी चांगले नाही.
सोबत मातीतील बाकीचे गवत, तण काढून टाकावे ज्यामुळे माती घट्ट आणि कोरडी राहणार नाही.
४. पोषक आणि न्यूट्रिशन द्रव्ये :
मोगर्याचे पोषण होण्यासाठी लागणारी पोषक द्रव्ये थोडी अधिक प्रमाणात लागतात. म्हणून जेव्हा मोगरा लावण्याचे ठरवाल तेव्हा लागवडीसाठी माती तयार करताना ५० टक्के शेणखत, १५ टक्के वाळू, १० टक्के कोकोपीट आणि उर्वरित बागेची माती वापरा.
तसेच बरेचदा गांडूळ खताचा वापर देखील फायदेशीर ठरतो.
—
- घरातलं तुळशीचं रोप सारखं मरतंय? रोप वाढवण्याच्या या टिप्स जाणून घ्या
- गच्चीवरील झाडांची अनोखी किमया! उन्हाळ्यातही भासत नाही पंख्याची गरज…
—
५. मोगरा लावण्यासाठी प्लास्टिक कुंडीचा वापर टाळा :
मोगर्याला पोषण मिळण्यासाठी आपण त्याला उन्हात ठेवतो. जर आपण मोगरा प्लॅस्टिकच्या कुंडीत लावला. तर प्लास्टिक मुळे वाढणार्या उष्णतेचा रोपाच्या मुळांवर परिणाम होवू शकतो.
मुळांना थंडावा मिळाला नाही तर रोपाची वाढ पुरेशा प्रमाणात होणार नाही.
६. रोपाची छाटणी
मोगऱ्याची कळी फुलल्यावर आणि फुल गळून पडल्यावर झाडाच्या फांदीचा भाग, दोन पाने व शेंगा यापासून छाटणी करावी लागते. तथापि, रोपाचा भाग जास्त कापला जाऊ नये याची खात्री करा.
जिथून फुलांचे गुच्छ आले तिथूनच कापून टाका. असे केल्याने नवीन पालवी फुटून कळ्या लवकर उमलतील आणि फुले चांगली येतील.
तेव्हा मित्रांनो या टिप्स चा उपयोग करून आपल्या घरी मोगर्याचे रोप लावा आणि त्याच्या स्वर्गीय सुगंधाचा अनुभव घ्या. घरातील झाडे टिकवण्यासाठी तुमच्याकडेही काही टिप्स असतील तर आम्हाला नक्की कळवा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.