चितेसमोर जेवण अन् मृतदेहासोबत…!!! अघोरी साधूंची तपस्या कल्पनेतही थरकाप उडवते!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपला देश देवी देवतांचा आहे, कित्येक क्रांतिकारकांचा आहे तसाच आपला देश हा साधू संतांचासुद्धा आहे. कित्येक साधू संतांनी देशातल्या समाजाला योग्य मार्ग दाखवला आहे, तळागाळातल्या लोकांना लढण्यासाठी बळ दिलंय.
त्याच साधू संतांच्या देशातल्या शिवाची भक्ति करणाऱ्या एका साधू संप्रदायाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. यांच्याबद्दल ऐकून तुम्हाला नक्कीच काही गोष्टी विचित्र वाटू शकतील, पण या लेखाचा उद्देश कोणत्याही साधू किंवा तपस्या करणाऱ्या महापुरुषाची प्रतिमा मलिन करायचा नाही!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
मराठीत एखाद्या कालकृत्याला अघोरी म्हणण्याची पध्दत आहे. अघोरी या शब्दाचाच एक नकारात्मक अर्थ सामान्यांत प्रचलीत आहे. अत्यंत क्रुर, माणुसकीच्या, मानवी भावनांच्या चौकटीत कोणी वर्तन विशेषत: गुन्हा करतो तेंव्हा त्याला अघोरी कृत्य म्हणण्याची पध्दत आहे.
दुसर्या बाजूला साक्षात शिवाची उपासना करणार्या पंथाचं नाव अघोरी आहे. या पंथाबाबत आणि त्यांच्या साधनेबाबत सामान्यांत कायमच एक भितीयुक्त कुतुहल असतं.
इतर देवतांच्या साधुसंत, महंतांना समाजात जो आदर मिळतो तो या पंथातील साधकांना मिळत नाही आणि समाजातील सामान्य लोकही या साधकांपासून चार हात लांब रहाणंच पसंत करतात.
नेमका काय आहे हा अघोरी पंथ? आणि यांची तपस्या नेमकी कशी असते? जाणून घेऊया सविस्तरपणे आजच्या लेखातून.
अघोर पंथ हा हिंदू समाजातील एक सांप्रदाय आहे. अघोर म्हणजे ज्यांना कशाचाच घोर (काळजी/ चिंता) नाही असे. यांच्यामते निसर्गातील प्रत्येक गोष्टीत समानता आहे.
सरळ आणि सहज आयुष्य जगणारे, कसलाही भेदभाव न राखणारे ते अघोरी. या सांप्रदायाची निर्मिती कशी झाली, कधी झाली, कोणी केली याबाबत काहीही ठोस माहिती उपलब्ध नसली तरीही यांना कपालिक सांप्रदयाचे मानलं जातं.
या सांप्रदायाचे साधक भारतातील प्राचीन धर्म शैव अर्थात शिवाची उपासना करणारे आहेत. काही ठिकाणी साक्षात शिवशंकराचं हे भूतलावरील रुप मानलं जातं.
अघोरी साधक बनणं अत्यंत खडतर काम आहे. अत्यंत रहस्यमय असं जीवन जगणारे अघोरी सामान्य लोकांत भितीनं चर्चेचा विषय आहेत. याचं कारण इतर साधकांप्रमाणे यांच्या साधना नाहीत. त्या वेगळ्य़ा प्रकारच्या साधनाच सामान्यांना अघोरींबाबत भिती निर्माण करणार्या असतात.
अशा काय साधना करतात अघोरी?
शिवाचा निवास स्मशानभूमीत असतो अशी धारणा असल्यानं अघोरी पंथातील साधकही साधारणपणे स्मशानातच रहातात. त्यांना मृतदेहाची भीती वाटत नाही उलट या पंथात मृतदेहालाही साधनेचा भाग बनविलं जातं. काही साधक तर मृतदेहावर उभं राहून साधना करतात.
अशा प्रकारच्या साधनेत मृतदेहाला प्रसाद म्हणून अभक्ष्य आणि दारू यांचा प्रसाद दाखविला जातो. काही प्रकारच्या साधनेत ज्या ठिकाणी मृतदेहाचं दहन केलं जातं (शवपीठ) त्या ठिकाणाची पूजा केली जाते. असं म्हणतात की अघोरींच्या साधनेत इतकी शक्ती असते की ते मृतदेहांशीही संवाद साधू शकतात.
—
- मुस्लिम आक्रमणांपासून हिंदू धर्माचं रक्षण करणाऱ्या “नागा साधूंचा” इतिहास ..वाचा
- कवटीतून पाणी पिणाऱ्या ह्या रहस्यमयी पंथातल्या साधूंचं धक्कादायक वास्तव!
—
इतर सर्व प्राण्य़ांविषयी तिरस्कार असणारे अघोरी कुत्र्याला मात्र खूप मानतात. कुत्र्यांची सेवा करणं आपलं कर्तव्य मानतात.
अघोरी पंथातील लोक केवळ गायीचं मांस भक्षण करत नाहीत बाकी अक्षरश: काहीही ग्रहण करतात. अगदी मृतदेहाच्या कच्च्या मांसापासून ते जीवंत व्यक्तीच्या मलमुत्रापर्यंत त्यांना काहीही वर्ज्य नसतं.
इतर पंथातील साधक बहुतेक करुन ब्रह्मचर्याला महत्व देतात मात्र, अघोरी साधक याच्या बरोबर उलट वर्तन करतात, त्यांच्या मते शरीराचा भोग ही देखील एक साधना आहे आणि मनात जर पूर्ण श्रध्दा असेल तर अगदी मृतदेहासोबतही शरीरसंबंध करुन आनंद, तृप्ती मिळवता येते.
याच कारणास्तव अघोरी पंथातील लोक मृतदेहाशीही सहजपणे शैय्यासोबत करु शकतात. अघोरी लोक स्मशानात झोपडी, कुटी बांधून रहातात. बाहेरच्या सामान्य जगाशी त्यांना संबंधच ठेवायचा नसतो.
आपल्या विश्र्वात ते आनंदी असतात कारण त्यांच्या जगाचे नियम हे बाहेरील जागाच्या नियमापेक्षा खूप वेगळे असतात. दिवसभर झोपून रात्री साधना करणं हे त्यांचं काम असतं.
अघोरी विज्ञानाच्या मते जन्माला येणारा प्रत्येक जीव हा अघोरी आहे. लहान मुलांना जसं स्वतःची विष्ठा आणि सुग्रास जेवण यातला फरक कळत नाही तसंच अघोरीनासुद्धा छान आणि घाण यातला फरक कळत नाही. त्यामुळेच ते असे वागत असावेत असा अंदाज वर्तवला जातो.
अनेक अघोरी साधूंचा दावा आहे की त्यांच्याकडे कॅन्सर तसेच एड्सवर जालीम उपाय आहे, पण त्यांच्या या दाव्याला अजूनतरी कोणताही वैज्ञानिक आधार नाहीये.
बहुतांशवेळा कुंभमेळ्यात आपल्याला अघोरी साधू दिसतात पण त्यापैकी कित्येक साधू हे ढोंगी असतात, आणि ते फक्त तिथे लोकांची करमणूक करण्यासाठी येतात.
एकंदरच गूढ आणि तितकंच विचित्र आयुष्यं जगणाऱ्या अघोरी साधूंविषयी या रंजक गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याविषयी तुम्हालासुद्धा काही वेगळी माहिती ठाऊक असल्यास ती आमच्यासोबत कॉमेंटमध्ये शेयर करायला विसरू नका!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.