' क्वीन ठरतीय फ्लॉप, सात वर्षात ९ पिक्चर आपटल्यामागची नक्की कारणं काय? – InMarathi

क्वीन ठरतीय फ्लॉप, सात वर्षात ९ पिक्चर आपटल्यामागची नक्की कारणं काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कंगना राणावत माहिती नाही अशी व्यक्ती दुर्मिळच! इतके सगळेजण कंगनाला ओळखतात. कंगना तिच्या बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते.

 

kangana im

 

२० मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झालेल्या ‘धाकड’ या सिनेमामुळे ती सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री आणि तिच्या चाहत्यांच्या अपेक्षेप्रमाणे या सिनेमाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. अशा परिस्थितीत आता #KanganaRanaut आणि #Dhaakad ट्विटरवर ट्रेंड करत आहेत आणि युझर्स ‘entartening’ ट्वीट शेअर करत आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

यामध्ये कंगनाच्या ‘तनु वेड्स मनु’ चित्रपटातील शर्माजी या नेटीजन्स ना आठवत आहेत.”ओ शर्माजी, कूच तो तरस खाओ और धाकड देख के आओ” अशा शब्दात ” धाकड” ची खिल्ली उडवली जातेय.

 

kangana im

 

पण मित्रांनो यातून ४ वेळा अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणार्‍या या अभिनेत्रीचे सलग चार चित्रपट जेव्हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होतात तेव्हा काय असतील याची कारणे हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेलच. तेव्हा जाणून घेऊ ही कारणे

कंगना रनौतचा ‘धाकड’ सिनेमा देशातच नाही तर परदेशातही चांगलाच आपटल्याचे सिद्ध झाले. कंगनाची परदेशातील कामगिरी २०२२ मधील सर्वात कमी ओपनिंग वीकेंड कमाई ठरली आहे.

ओव्हरसीजमध्ये ‘धाकड’ ३०० हून अधिक स्क्रीन्सवर रिलीज झाला होता. जोरदार प्रमोशन कॅम्पेन असूनही कंगनाचा हा चित्रपट चांगली बाजी मारू शकला नाही. त्यामुळे कंगना रनौतचे बॅक टू बॅक चार सिनेमे फ्लॉप ठरले आहेत.

 

kangana ranaut crying inmarathi

 

धाकडमध्ये कंगना रानावत जबरदस्त अॅक्शन मोडमध्ये आहे. सोबत अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांसारखे उत्तम कलाकारही आहेत. या सिनेमाचा ट्रेलर धमाकेदार होता, जो पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकताही वाढली होती, पण जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा तो प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही.

कंगनाच्या चित्रपटाच्या अपयशामागे अनेक कारणे आहेत . ज्यामध्ये कमकुवत स्क्रिप्टची निवड, कंगनाची कट्टरता आणि कंगनाची प्रतिमा ही प्रमुख कारणे आहेत.

गेल्या काही वर्षांपासून कंगनाची गणना राष्ट्रवादी सेलिब्रिटींमध्ये केली जात होती, परंतु अलिकडेच तिच्या रियालिटी शो ‘लॉकअप’ नंतर कंगनाच्या प्रतिमेत फरक पडला आहे. मुनव्वरने शो जिंकल्यानंतर कंगनाची विचारधारा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

याबरोबरच कंगणाचा फटकळ स्वभाव आणि तिच्या भूतकाळातील कोंट्रव्हर्सिज यांमुळे ही ती अलीकडच्या काळात सतत ट्रोल होत राहिली आहे याचाही परिणाम चित्रपटाच्या यशावर झालेला असू शकतो.

सहकलाकारांशी होणारा वाद, तिची स्वत:ची राजकीय मते आणि प्रत्येकाशी पंगा घेण्याची वृत्ती यांमुळे कंगणा सतत अडचणीत येत राहिली आहे. तिचे सूरज पाञ्चौली सोबतचे नाते असो की हृतिक रोशन सोबतचे रिलेशन या ही ठिकाणी ती अपयशी ठरली ती तिच्या नॉन कोंप्रमायझिंग स्वभावामुळेच!

 

kangana 1 im

 

शिवाय कोरोंना काळात तिचे चित्रपट रिलीज झाले जेव्हा प्रेक्षकांनी थिएटर कडे पाठ फिरवली होती. यामुळे समीक्षकांनी चित्रपटांचे आणि कंगणच्या भूमिकेचे कौतुक करून देखील या चित्रपटांना त्याचा फारसा काही फायदा झाला नाही.

‘धाकड’ या नव्या चित्रपटाचीही तीच स्थिती आहे, बॉक्स ऑफिसवर ‘धाकड’ची सुरुवात खूपच संथ झाली आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट फ्लॉप ठरला आहे. चित्रपटाची अवस्था इतकी दयनीय आहे की अनेक ठिकाणी ‘धाकड’ काढून कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया’ चित्रपटाला स्क्रिन देण्यात आले आहेत.

 

film im

 

चौथ्या दिवशी तर धाकडने फक्त ३० लाखांचा गल्ला जमवला आहे.यामुळे पुढील आठवडाभर तो किती कमाई करतो हे सांगणे कठीण आहे. दरम्यान पुढील एक ते दोन दिवसांत धाकड सिनेमागृहातून आऊट होईल असेही बोलले जात आहे.

आतापासून चित्रपटाच्या स्क्रीन्स निम्म्याहून कमी झाल्या आहेत. एवढा मोठा फ्लॉप पाहिल्यानंतर ‘धाकड’च्या थिएटरमधील स्क्रीन झपाट्याने ‘भूल भुलैया २’ साठी शिफ्ट होत आहेत. कंगनाचा हा सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे.

धाकड गर्ल कंगना ने सलमान-अक्षय सकट अनेक “स्टार्स”ना थेट “नकार” दिला होता

कॉफी विथ करणमधल्या या ६ कॉंट्रोवर्सीज आठवतायत का?

पण मित्रांनो ती कंगना आहे, ती क्वीन आहे, थलायवी आहे, चित्रपट हिट असो वा फ्लॉप, ती नेहमी ट्रेंड मध्ये राहिलच. तेजस आणि सीता या तिच्या आगामी चित्रपटांकडून तिला अपेक्षा आहे, मात्र हे चित्रपट कमाल दाखवणार की पुन्हा पहिले पाढे पंच्चावन्न अशीच गत होणार हे येता काळच ठरवेल.

 

kangana saree inmarathi

 

कंगनाच्या चित्रपटांबद्दल तुमचं काय मत आहे? कोणत्या कारणांमुळे तिच्या सिनेमांकडे प्रेक्षकवर्गाने पाठ फिरवली असेल? आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?