आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्या सगळ्यांच्याच कुठल्या ना कुठल्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न असतात. प्रत्येकासाठी ती निरनिराळी असतात. त्यातल्या काही इच्छा पूर्ण होतात तर काही होत नाही. पण मनापासून इच्छा बाळगणं, स्वप्न पाहणं याच गोष्टी आपल्या आयुष्याला अर्थ देतात. आपल्यात सकारात्मकता पेरतात.
स्वप्नं पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून देऊन प्रयत्न करण्याची प्रेरणा देतात. प्रत्येकाचीच स्वतःची अशी ‘बकेट लिस्ट’ असते. त्यामुळे या बकेट लिस्टमधल्या आपल्या इच्छा, स्वप्न पूर्ण होतात तेव्हा आपल्या आनंदाला पारावार राहत नाही.
तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीला आपल्याला आयुष्यात कधीतरी पोलिसांनी अटक करावी अशी इच्छा असण्याचं ऐकलंय? आणि आपली ही इच्छा खरंच पूर्ण झाल्यावर प्रचंड आनंद झाल्याचं? ऐकायला कितीही विचित्र वाटलं आणि कानांवर विश्वास बसला नाही तरी अशी घटना खरोखरच घडलीये.
अमेरिकेतील फ्लोरिडामधील होमस्टेड येथे राहणाऱ्या जानिया डॉग्लस या १९ वर्षीय तरुणीची ही इच्छा पूर्ण झालीये. पोलिसांनी आपली ही इच्छा पूर्ण केल्यावर तिला अक्षरश: आकाश ठेंगणं झालं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
ही मुलगी आणि तिची ही अजब इच्छा हा लोकांसाठी फावल्या वेळात चर्चा करण्याचा विषय झालाय. नेमकी काय आहे ही घटना? जाणून घेऊ.
बऱ्याचदा लोकांना आयुष्यात काहीतरी साहसी करायची इच्छा असते, एखाद्या ठिकाणी आयुष्यात एकदातरी जायची इच्छा असते. अगदी आवडत्या सेलिब्रिटीचं एकदातरी ओझरतं दर्शन व्हावं, त्या सेलिब्रिटीला प्रत्यक्षात भेटता यावं हीदेखील इच्छा असू शकते.
जानियाला मात्र आयुष्यात एकदातरी आपल्याला पोलिसांनी अटक करावं असं वाटायचं. आपली ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तिने चक्क वाहतूकीच्या नियमाचं उल्लंघन केलं आणि तिची ही इच्छा पूर्ण झालीदेखील.
—
- दफन विधीनंतर ती जिवंत झाली आणि…. विज्ञानाला आव्हान देणारी घटना
- का असतात बिस्किटांवर छिद्र? कधी विचार केलाय का?
—
मिररच्या वृत्तानुसार, १९ वर्षांच्या जानियाला सकाळी ७.४७ वाजता पोलिसांनी जोरात गाडी चालवताना पाहीलं. जानिया गाडीचे लाईट्स चालू ठेवून जोराने गाडी चालवत असल्याचा आणि तिने क्रॉसरोडला गाडी थांबवल्याचा आरोप Monroe County Sheriff यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला.
तिची चूक जेव्हा पोलिसांनी तिच्या लक्षात आणून दिली आणि तिच्यावर काय कारवाई होईल हे तिला सांगितलं तेव्हा तिला खूप आनंद झाला. ‘पोलिसांनी अटक करावी अशी तिची शाळेत असल्यापासूनची इच्छा होती.’, असं तिने सार्जंट रॉबर्ट डोश यांना सांगितल्याचं ते म्हणाले.
पोलीस म्हटलं की माणसं शक्य तेवढं दूर राहायला बघतात. आयुष्यात कधीही पोलीस कोठडीची हवा आपल्याला खावी लागू नये असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे ही इच्छा पूर्ण झाल्यावर तिला नेमका कसला आनंद झाला हे आपल्याला कळूच शकत नाही.
या सगळ्या घटनेमुळे पोलिसांनी जानियाला ताब्यात घेतलं आणि ती पोलिसांपासून पळून गेली म्हणून कोठडीत ठेवलं. पोलिसांनी ही घटना आपल्या फेसबुक पेजवरही शेअर केली. ही घटना वाचून एखाद्याला अशी इच्छा कशी काय असू शकते याचं लोकांना आश्चर्य वाटलं.
बहुतेक वयाच्या २५व्या वर्षापर्यंत मानवी मेंदूचा विकास पूर्ण होतं नाही असा निष्कर्ष काढणारी एक कमेंट एका युजरने केली. तर मिकी फोर्स्टर नावाच्या एका युजरने, “मरण येईपर्यंत मला अटक होऊ नये अशी माझी बकेट लिस्ट आहे…आतापर्यंत सगळं चांगलं आहे.” अशी कमेंट केली.
फ्लोरिडामध्ये यापूर्वीही अशा विचित्र, चक्रावून टाकणाऱ्या घटना घडल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटच्या वृत्तानुसार, पोलिसांनी इथे बऱ्याचदा बंदूक घेऊन बाहेर पडलेल्या लहानलहान मुलांना अटक केली आहे.
या वर्षी मार्च महिन्यात फ्लोरिडात एका १२ वर्षांच्या छोट्या मुलाने आणि त्याच्या १४ वर्षांच्या मित्राने आपल्याजवळ एके ४७ बाळगली होती. तब्बल ३५ मिनिटं त्यांचा आणि पोलिसांचा गोळीबार झाला.
जानियाची इच्छा पाहून हसावं की रडावं ते समजत नाही. अविचाराने अशा विचित्र इच्छा मनात बाळगणाऱ्या आणि त्या पूर्ण व्हायची वाट बघणाऱ्या लहान मुलांना आपल्या अशा इच्छांमुळे नाहकच आपल्याला नको त्या परिस्थितीचाही सामना करावा लागू शकतो.
मुळात नसलेल्या समस्या अशाने आपण निर्माण करू हे कळत नसेल तर किमान त्यांच्या पालकांनीतरी आपली मुलं चुकीचा विचार करत आहेत याची जाणीव त्यांना करून द्यायला हवी.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.