साधूच्या सांगण्यावरून उशीखाली ठेवला तावीज, इंदिरा गांधींमुळे वाचले होते अमिताभचे प्राण
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कोविड काळात घडलेली घटना . लोकप्रिय अभिनेता आमिर खान याने एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने म्हटले होते, की ‘माझ्या चाहत्यांनी भरभरून केलेल्या प्रार्थनेमुळे माझी वृध्द आई कोविडमधून ठणठणीत बरी होऊन आली. तुमचे आशिर्वाद आणि प्रेम असेच कायम माझ्या पाठीशी असू द्या’.
खरंच चित्रपट सृष्टीतील असे अनेक लोकप्रिय कलाकार आहेत, जे चाहत्यांच्या विश्वाचा एक अविभाज्य भाग असतात आणि चाहते देखील ते आपल्या कुटुंबाचा एक भाग असल्यासारखे त्यांची काळजी घेत असतात, पण चाहता आणि लोकप्रिय अभिनेता हे दोघे ही दिग्गज असतील आणि त्यांच्यामधील प्रेम कसे असेल हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक असाल तर हा किस्सा नक्की वाचा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
कलाकार आणि त्यांच्या चाहत्यांचे असे अनेक किस्से आहेत. राजेश खन्ना यांचं फॅन फॉलोविंग तर इतकं जबरदस्त होतं, की ते शूटिंगला बाहेर पडण्याआधी त्यांच्या गाडीच्या काचांवर लिपस्टिकचे डाग असायचे… सतत लोकांचा घेराव असायचा, अशीच प्रसिद्धी लाभलेले बॉलीवूडचे बिग बी एकदा ब्रीच कँडी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते.
गोष्ट आहे १९८२-८३ च्या सालातली. त्यावेळी अमिताभचा कुली चित्रपट हिट झाला होता, पण याच चित्रपटाच्या शुटींग दरम्यान पुनीत इस्सारने मारलेल्या ठोश्यामुळे अमिताभच्या आतड्यांना गंभीर जखम झाली होती. तातडीने त्याला मुंबई च्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ही बातमी पसरताच सर्व देशभर चिंतेचे वातावरण पसरले होते. जो तो अमिताभ लवकरात लवकर बरा व्हावा ,यासाठी प्रार्थना करीत होता. कुणी त्याच्यासाठी नवस बोलले होते, तर कुणी उपास-तपास देखील धरले होते.
ही बातमी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना समजली. त्यावेळी त्या विदेशी दौऱ्यावर होत्या. परत येताच त्यांनी त्यांच्या घरचे धार्मिक कार्य सांभाळणाऱ्या पंडितांकडून, अमिताभ लवकर बरा व्हावा म्हणून पूजा सुरु केली, इतकेच नाही तर त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवराह बाबांकडून खास तावीज देखील मागवून घेतला.
त्या जेव्हा अमिताभ यांना पाहण्यासाठी रुग्णालयात गेल्या, तेव्हा खास पांढऱ्या कपड्यात लपेटलेला हा तावीज त्यांनी अमिताभच्या उशीखाली ठेवला.
तावीजही ठेवला आणि जोपर्यंत अमिताभ पूर्णपणे शुद्धीवर येत नाही, तोपर्यंत घरात पूजा देखील सुरु ठेवली. एक आई आपला मुलगा बरा व्हावा म्हणून जे जे काही करेल त्या त्या सर्व गोष्टी त्यांनी सुरु ठेवल्या होत्या.
—
- सिनेमाच्या वेडापायी खेड्यातील मुलीने घडवला इतिहास! रंगूचा ‘सुलोचना’पर्यंतचा प्रवास
- कार बंद, चंबळच्या डाकूंचा घेराव… मीना कुमारीने घेतला चाकू, वाचवले सगळ्यांचे प्राण
—
पुढे दहा दिवसांनी, अमिताभ बच्चन जेव्हा पूर्णपणे शुद्धीवर आले, तेव्हा इतर चाहत्यांप्रमाणे इंदिराजींचा जीव देखील भांड्यात पडला. बच्चन आणि गांधी कुटुंबात असलेले मैत्रीपूर्ण संबंध जगजाहीर आहेत. इंदिराजी अमिताभ यांना आईसारख्याच होत्या. एक कलाकार म्हणून त्याच्यावर असलेले प्रेम इंदिराजींनी अनेकदा व्यक्त केले होते.
देवराह बाबा कोण होते?
उत्तरप्रदेशमधील एका गावात देवराह बाबा यांचा जन्म झाला होता. शरयू नदीच्या काठावर लाकडाने बांधलेल्या एका उंच मचाणात ते राहायचे. त्यांच्याकडे जादुई शक्ती आणि सिद्धी होत्या, अशी तिथल्या लोकांची धारणा होती. ते पशु – पक्ष्यांशी मुक्त संवाद साधायचे.
अध्यात्माची कास धरणारे अनेकजण देवराह बाबांकडे यायचे. त्यांच्याकडून अध्यात्माविषयी जाणून घ्यायचे. जाती- धर्मावरून त्यांनी कधीच त्यांच्या भक्तांमध्ये भेदभाव केला नाही. त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून लोक तासंतास रांगेत उभे राहायचे. १९९० साली त्यांनी देहत्याग केला.
इंदिरा गांधी देवराहा बाबांच्या भक्त होत्या. जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयीदेखील देवराह बाबांना मानायचे. अमिताभ बच्चन यांचे प्राण वाचल्यानंतर ते देखील देवराह बाबांवर विश्वास ठेऊ लागले.
१९९७ साली झालेल्या पराभवानंतर इंदिरा गांधी देवराह बाबांचा आशीर्वाद घ्यायला गेल्या होत्या, त्यांच्या आशिर्वादामुळेच त्यापुढील निवडणुकांमध्ये त्या बहुमताने विजयी झाल्या.
आपणदेखील आपल्या घरातील कुणी व्यक्ती रुग्णालयात गंभीर अवस्थेत असेल, तर तिला वाचविण्यासाठी वैद्यकीय उपायांबरोबर देवाचा धावा करू लागतो. अशावेळी त्या व्यक्तीला वाचविण्यासाठी आपण देवळात नवस मागतो, दर्ग्यावर माथा टेकवितो तर कधी चर्च मध्ये जाऊन मेणबत्ती लावतो.
त्या नाजूक काळात कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता मनांपासून आपण त्या ईश्वराकडे प्रार्थना करीत असतो. कारण आपल्या जीवाभावाचे माणूस आपल्या सोबत असणे हे महत्वाचे असते.
अगदी याच गोष्टींचा विचार करून इंदिराजींनी अमिताभ साठी जे जे उपाय करता येईल ते ते सर्व केले. देशाच्या महान कलाकारासाठी देशाच्या तितक्याच महान आणि महत्वपूर्ण स्थानावर असलेल्या व्यक्तीने केलेले प्रयत्न ही खरोखरीच कौतुकास्पद बाब आहे. त्याच बरोबर अमिताभच्या मागे असलेली करोडो चाहत्यांची श्रद्धा ,त्यांची प्रार्थना देखील तितकीच महत्वाची आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.