Site icon InMarathi

”तिच्या बांगड्या फोडू नका, कुंकू पुसू नका” : रुपाली चाकणकरांचं धाडस विचार करायला भाग पाडतं

rupali chakankar im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कितीही पुढारलेपणाचा आव आणला तरीही काही बाबतीत मात्र आजही भारतीय समाज मुग गिळून गप्प बसताना दिसतो. रुढी, परंपरा यांच्या विळख्यात आजही आपण जखडले गेलो आहोत हे दर्शवणारी अनेक उदाहरणं आपल्या आसपास सापडतील. अंत्ययात्रा, आणि त्यानंतर एखाद्या निरपराध विधवेपुढील आव्हानं हा त्यातील एक महत्वाचा मुद्दा!

एकीकडे प्राणाहूनही प्रिय असलेल्या पतीनिधनाचे न संपणारे दुःख आणि त्याचवेळी प्रथेच्या नावाखाली कुटुंबाकडून मिळणारी वागणूक हे दुहेरी संकट सोसणे म्हणजे स्त्रियांसाठी शिक्षाच ठरते.

 

 

आयुष्यभर जपलेले सौभाग्याचे अलंकार केवळ रुढींच्या नावाखाली दूर करताना तिला होणाऱ्या यातना शब्दातही व्यक्त करणे कठीण! नेमक्या याच मुद्द्याला वाचा फोडलीय राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी! त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे अनेकांनी कौतुक केलंय, जाणून घेऊयात नेमका रुपाली यांनी नेमका कोणता धाडसी निर्णय घेतला. रुपाली चाकणकर यांची ही फेसबूक पोस्ट खास इनमराठीच्या वाचकांसाठी…

काल पंढरपुर दौरा करुन पुण्याकडे निघताना बंधुचा फोन आला, रात्रीचे ११ः३० वाजले असतील, अस्वस्थ होत मला निरोप दिला, काका अचानक हृदयविकाराच्या झटक्याने गेले आहेत, आता हाॅस्पिटलला आम्ही सगळे आलो आहोत, तु पोहचण्याचा प्रयत्न कर. हि दुःखद बातमी ऐकुन मला धक्काच बसला.

 

 

लहानपणापासुनच एकत्र कुटुंबातील जीवनप्रवास डोळ्यासमोरुन सरकु लागला,फार मोठ्या एकत्र कुटुंबात वाढले, एकुण सात काका, एक आत्या, सात भाऊ, बारा बहिणी या सर्वांचे एकत्र कुटुंब, हे माझे काका सहा नंबरचे. जेव्हापासून हे जग समजतं तेव्हापासुन त्यांना सैनिकी वेषात पाहिलेले, सैनिक म्हणुन देशसेवा करीत असताना गावाला, कुटुंबाला फार मोठा अभिमान….

ते सुट्टीत घरी आल्यानंतर परत जाताना आजीपासुन ते सगळ्या काकु रडत सामान, प्रवासाची, सोबतच्या जेवणाची तयारी करत, माहेराहुन पाठवणी असत तसा तो निरोपचा कार्यक्रम होत. त्यावेळी ते समजत नव्हतं पण मोठं होताना त्यातील प्रेमाची ओढ जाणवत गेली.

 

 

माझ्या आईसोबतचा हा फोटो मोठी, वहिनी कमी आणि बहिण म्हणुन या सगळ्यांनी लहान दिरांना सांभाळले. आज दोघेही नाहीत, आहेत त्या फक्त आठवणी…

आज अंत्यविधीच्या वेळी या लहाणपणाच्या या सगळ्या आठवणी फेर धरत होत्या,अंत्यविधी सुरु होताना कोणीतरी आवाज दिला ,तोंडात मणी द्यायचा आहे, मंगळसुत्र काढा.

उठून पुढे गेले आणि सगळ्यांना सांगितलं काकूचे मंगळसुत्र कोणीही काढायचा प्रयत्न करु नका,त्याऐवजी तुळशीचे पान तोंडात द्या.आता विधी करताना आपण बदल करायचा. तात्काळ ग्रामस्थ व कुटुंबियांनी मान्य केलं. कुंकु न पुसतां, जोडवी न काढतां, बांगड्या न काढता अंत्यविधी झाला.

 

 

आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याचे अपार दुःख व मानसिक धक्का असताना, पतीच्या अंत्यविधीत पत्नीला मिळणारी वागणुक जास्त वेदनादायक असते. विधवा महिलांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहोत.

या सामाजिक क्रांतीच्या विचारात एक पाऊल पुढे टाकताना आपणही सर्वजण सहभागी होऊ या…….नव्या उषःकालासाठी

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version