Site icon InMarathi

नासाला मंगळावर सापडलेल्या त्या गूढ दरवाज्यामागे नक्की काय दडलंय?

nasa im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अंतराळात सातत्याने गोष्टी बदलत असतात. वेगवेगळ्या ग्रहांवर दिसणाऱ्या चित्रविचित्र गोष्टी, पृथ्वीला ज्याचा संभाव्य धोका असू शकेल असं काही अंतराळात आहे का? नजीकच्या काळात ते पृथ्वीजवळून जाणार असण्याची हुलकावणी देतंय का? याचं संशोधक डोळ्यात तेल घालून सतत निरीक्षण करत असतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

रोज नव्याने समोर येणारी नवनवी गूढं उकलण्यासाठी त्यांना कराव्या लागणाऱ्या अभ्यासाची आणि घ्याव्या लागणाऱ्या परिश्रमांची व्याप्ती आपल्याला कळू शकत नाही.

 

 

आपण पृथ्वीवर राहतो, मात्र मंगळावर जीवसृष्टी निर्माण होऊ शकेल का? हा संशोधकांना वर्षानुवर्षे पडलेला प्रश्न आहे. मंगळावर पाणी असल्याची शक्यताही वर्तवली गेली आहे. त्यामुळे अर्थातच मंगळाविषयी आपल्या हाती कुठली नवी माहिती लागतेय याकडे संशोधकांचं लक्ष असतं.

अमेरिकेतील नासा या अंतराळ संशोधन संस्थेने इतक्यातच मंगळाविषयीचा एक नवा तपशील समोर आणला आहे. नासाला मंगळावर एक गूढ दरवाजा सापडला आहे. हा नक्की दरवाजाच असेल का की ते आणखी काही असेल याविषयी वर्तवल्या गेलेल्या शक्यता जाणून घेऊ.

 

 

नासाच्या क्युरीऑसिटी रोव्हरला मंगळावरील दगडांमध्ये एका चौकोनी दरवाजासदृश्य आकार दिसला आहे. या दरवाजातून पुढे कुठेतरी मार्ग जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र दगडांमध्ये दरवाजासदृश्य दिसणाऱ्या या आकारात नेमकं काय आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही.

नासाने काही दिवसांपूर्वी हे दृश्य दाखवणारा एक फोटो ट्विट केला होता. नासाने या संदर्भात आणखीही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंविषयी सांगताना नासाने म्हटलं की मंगळावरच्या लँडर्स आणि रोव्हर्सनी गेल्या काही वर्षांत फार विचित्र आणि लक्षवेधी असे फोटो पृथ्वीवर पाठवले.

मंगळावर असलेले बर्फाने भरलेले खडे, डोंगर, विविध आकारांचे दगड आणि अशा बऱ्याच गोष्टी या फोटोंतून समोर आल्या. यानिमित्ताने मंगळावर चौकोनी दरवाजासदृश्य आकार दिसल्याचं हे गूढ नेमकं काय असावं याविषयी वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत.

हा फोटो पहिल्यानंतर नासाच्या शास्त्रज्ञांना सुरुवातीला हा मंगळाच्या मध्यभागी जाण्यासाठीचा रस्ता असावा असं वाटलं होतं. हा एलियन्सच्या घराचा दरवाजा असू शकतो असाही अंदाज वर्तवला गेला.

४ मे ला मंगळावर एक भयानक भूकंप झाला होता. या भूकंपामुळे दगड तुटले असावेत आणि त्यामुळे असा आकार तयार झाला असावा अशी शक्यता काही शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. काही शात्रज्ञांनी हा दगडाच्या मध्यभागी तयार झालेला खड्डा आहे असं म्हटलंय.

हा खड्डा साधारण ३० सेंटीमीटर लांबी आणि ४५ सेंटीमीटर रुंदीचा असून यावर सगळीकडे भेगांच्या रेषा असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. हा खड्डा लाल मातीने भरलेला आहे.

मंगळावर भूकंप झाल्यामुळे दगडाचे तुकडे झाले आणि त्यामुळे हा दरवाजासारखा आकार दिसू लागलाय असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. जिथे हा दरवाजा सापडलाय त्याला शास्त्रज्ञांनी ‘ग्रीनव्ह्यू पेडिमेंट’ असं नाव दिलं आहे.

 

 

मंगळ ग्रहावरील दगडांवर असणाऱ्या दबावांमुळेही हा आकार तयार झाला असल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे.

मंगळावर आढळलेल्या या चौकोनी दरवाजासदृश्य आकाराचा फोटो शेअर करत नासाने म्हटलंय की कुठलीही वेगळी, विचित्र गोष्ट दिसली ती लगेच एलियन्स शी निगडीत असल्याची शक्यता वर्तवली जाते. अशाच प्रकारे मंगळावर आढळलेल्या या नव्या गोष्टीचा संबंधही एलियन्सशी जोडला जातोय. याविषयी आणखी संशोधन होणं बाकी आहे.

संशोधनातून जसजशी नवी माहिती समोर येईल त्यानुसार याविषयी अधिक खात्रीशीरपणे माहिती देता येईल. तोपर्यंत थोडा संयम बाळगून एलियन्स आणि तत्सम अफवांवर आपण विश्वास ठेवता कामा नये आणि त्या पसरवूही नयेत.

 

 

फोटोतला मंगळावर दिसणारा आकार केवळ खड्डाच आहे की खरंच तो एखादा दरवाजा आहे हे संशोधनातून समोर येईपर्यंत वाट बघावी लागेल.

माणूस कितीही प्रगत झाला तरी निसर्गातल्या कित्येक रहस्यांबाबत तो अनभिज्ञच असणार आहे, त्यामुळे यापुढेही अशीच निरनिराळी गूढं शास्त्रज्ञांच्या बुद्धीला आणि सर्वसामान्यांच्या कुतूहलाला खुराक पुरवत राहतील यात शंका नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version