आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्या टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या बातम्या किंवा एखादा पुरस्कार सोहळा बघतांना आपण एक गोष्ट लक्षात येते की, सुत्रसंचालन करणारी व्यक्ती ही त्यांच्या समोर लावलेल्या एका स्क्रीनवर मोठ्या अक्षरात छापून येणारी वाक्य वाचत असते आणि सफाईदारपणे ते वाक्य न अडखळता बोलत असते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
प्रसारित होणारा कार्यक्रम जर गाण्यांचा असेल तर तिथे एक स्क्रीन निवेदकासाठी आणि वादकांकडून कोणतीही चूक होऊ नये म्हणून एक अतिरिक्त स्क्रीन वादकांसाठी लावलेली असते, ज्यावर त्यांना वापरण्याचे नोटेशन्स हे मोठया अक्षरात त्यांना दिसत असतात.
इतकंच नाही तर गायक जेव्हा प्रेक्षकांकडे बघून गाणं गात असतो तेव्हा प्रत्यक्षात त्याचं लक्ष प्रेक्षकांकडे नसून ‘टेली प्रॉम्प्टर स्क्रीन’कडे असतं. ही गरज लवकरच संपणार असल्याचे संकेत रोज नवनवीन प्रयोग करणाऱ्या आयटी क्षेत्राकडून सध्या दिले जात आहेत.
चष्मा वापरण्यापासून वाचवणारी, तुमचे डोळ्यांना सुस्पष्ट दृष्टी देणारी आणि प्रसंगी तरुण दिसण्यास मदत करणारी ‘कॉन्टॅक्ट लेन्स’ ही आता ‘स्मार्ट’ होणार आहे.
‘टेली प्रॉम्प्टर स्क्रीन’चं काम हे आता तुमच्या डोळ्यात लावलेली ‘कॉन्टॅक्ट लेन्स’ करणार आहे अशी माहिती नुकतीच समोर आली आहे. काय असणार आहे हे प्रगत तंत्रज्ञान ? जाणून घेऊयात.
‘मोजो लेन्स’ ही कॅलिफोर्नियाची कंपनी मागच्या पाच वर्षांपासून ‘स्मार्ट कॉन्टॅक्ट लेन्स’ या विषयावर संशोधन करत आहे. ‘मोजो लेन्स’ने नुकत्याच जाहीर केलेल्या एका पत्रकात हे सांगितलं आहे की, स्मार्ट कॉन्टॅक्ट लेन्स ही संकल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यासाठी आजवर उदभवत असणारे सर्व अडथळे संबंधित शास्त्रज्ञांनी पार केले आहेत.
‘मोजो लेन्स’ या कंपनीची स्थापना करणारे सर्व उच्च पदस्थ हे ऍपल, गुगल, अमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीत काम केलेले संशोधक आहेत.
‘स्क्रीनवर अवलंबून रहाण्याची गरज पडू नये’ या एका उद्देशाने झपाटलेल्या या टीमने ही देखील ठरवलं आहे की, काही वर्षांनी फोनची बेल वाजल्यावर “कोणाचा फोन आला आहे ?” हे फोन खिशातून काढून बघण्याची सुद्धा गरज नसेल. तुम्हाला केवळ डोळ्यांच्या एका कोपऱ्यात बघावं लागेल आणि आलेला फोन उचलला जाईल.
दृष्टी ही सर्वांना जन्माने मिळते. हे सुंदर जग बघण्यासाठी, वाचन करण्यासाठी कोणालाही चष्मा लावण्याची गरज पडू नये अशी या संशोधकांची इच्छा आहे.
“तुम्ही जसे आहात, तसेच दिसा. चष्मा घालून इतरांपेक्षा वेगळे दिसू नका” असं ‘मोजो’च्या संशोधकांचं ब्रीद वाक्य आहे. माईक व्हिल्मर हे ‘मोजो’चे प्रमुख संस्थापक आणि मुख्य संशोधक आहेत.
‘स्मार्ट कॉन्टॅक्ट लेन्स’ कशी काम करेल?
स्मार्ट कॉन्टॅक्ट लेन्समध्ये काही विशिष्ट सेन्सर असतील. आपल्या डोळ्यांना दिसणारं चित्र हे या लेन्समध्ये असलेल्या ‘सेन्सर’मुळे आपल्याला आहे त्यापेक्षा काही पटींनी मोठं दिसेल असं तंत्रज्ञान विकसित केलं जात आहे.
स्मार्ट कॉन्टॅक्ट लेन्समध्ये ‘मोशन सेन्सर’चा वापर केला जातो ज्यामुळे दृष्टीस पडणारी प्रतिमा ही स्थिर राहते. ‘गुगल ग्लास किंवा फोकल्स’ मध्ये वापरण्यात आलेली ‘ऑगमेंटेड रिऍलिटी’ हे तंत्रज्ञान ‘स्मार्ट कॉन्टॅक्ट लेन्स’मध्ये वापरण्यात आलं आहे.
सध्या विकसित झालेल्या लेन्सचा वापर मर्यादित असल्याचं सांगण्यात आलं आहे. येत्या काळात त्याची व्याप्ती वाढेल, केवळ काचेवर पडलेलं दृश्य परावर्तीत न करता आपल्याला दिसणारं दृश्य हे कॉन्टॅक्ट लेन्सद्वारेच दिसेल यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.
एचटीसी, विवो प्रो या कंपनीने बाजारात आणलेल्या ‘व्हर्च्युअल रिऍलिटी हेडसेट’मध्ये वापरण्यात आलेली ‘आय ट्रॅकिंग’ या तंत्रज्ञानाचा वापर हा स्मार्ट कॉन्टॅक्ट लेन्स मध्ये करण्यात आल्याचा उल्लेख काही टेक-गुरूंनी केला आहे.
तुमच्या डोळ्यात असलेल्या कॉन्टॅक्ट लेन्सने तुम्हाला सध्या सर्वात महत्व असलेले ‘नोटिफिकेशन्स’ सुद्धा दिसतील असं सुद्धा सांगण्यात येत आहे.
‘स्मार्ट कॉन्टॅक्ट लेन्स’चं सर्वात महत्वाचं ऍप्लिकेशन ‘स्पीच’ हे आहे. केवळ लेन्सच्या मदतीने तुम्ही लिहिलेलं भाषण वाचू शकतात, स्क्रोल करू शकतात.
तुम्ही डोळ्यांची पापणी लवली की, तुम्ही लिहून ठेवलेलं भाषण किंवा एखादया मुलाखतीची माहिती तुम्हाला वाचता येईल अशी सोय करण्यात आली आहे.
—
- हे शब्द तुम्ही रोज वापरत असता, पण यांचे फुल फॉर्म तुम्हाला माहित आहेत का?
- नोकरी सांभाळूनही बिझनेस करता येऊ शकतो! ५ मस्त स्टार्टअप ऑप्शन्स..
—
वाचन करण्यासाठी कोणत्याही स्क्रीनकडे बघावं लागणार नाही हा सर्वात स्वागतार्ह बदल असेल असा माहिती तंत्रज्ञान जगताला विश्वास आहे.
हा बदल खरंच घडला तर कोणत्याही सिनेमा, टीव्ही सिरीजचं चित्रीकरण कितीतरी कमी वेळात होईल, संवाद पाठ करावे लागतील, पण ते विसरले तरी त्यांना त्वरित वाचता येईल असं सांगण्यात येत आहे.
स्मार्ट कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करणाऱ्या व्यक्तिंना आपली नजर ही डावीकडे किंवा उजवीकडे करावी लागेल. “स्मार्ट कॉन्टॅक्ट लेन्स डोळ्यांच्या मध्यभागी बसेल आणि ही लेन्स वापरणं हे इतर लेन्स वापरण्या सारखंच असेल. ही लेन्स डोळ्यांसाठी पूर्णपणे सुरक्षित असेल.
रेटिना म्हणजेच डोळ्यांच्या पडद्यावर पडणाऱ्या किरणांचं हे केवळ एक परावर्तन असेल. कंटेंट वाचण्यासाठी तयार करण्यात आलेली ही एक विशिष्ट लेन्स असेल” असं मोजो व्हिजनचे वाईस प्रेसिडेंट ऍशले ट्युअन यांनी पत्रकरांसोबत बोलतांना सांगितलं आहे.
“स्मार्टफोन सर्वप्रथम हातात आल्यावर ज्याप्रमाणे त्याला समजून घेण्यास लोकांना काही वेळ लागला तसाच वेळ स्मार्ट कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्यासाठी सुद्धा लागेल” अशी प्रतिक्रिया गुगल कंपनीने दिली आहे.
‘मोजो व्हिजन’ प्रमाणेच ‘घेण्ट लेन्स’ ही कंपनी सुद्धा या संशोधनात आपलं योगदान देत आहे. स्मार्ट कॉन्टॅक्ट लेन्समुळे तुमच्या शरीरातील ग्लुकोजचं प्रमाण, रक्तदाब हे देखील अचूक आणि कमी वेळात कळतील यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.
तुमच्या शरीराची पूर्ण माहिती यामुळे लेन्स वापरणाऱ्या कंपनीकडे असेल हा धोका काही तज्ञांनी व्यक्त केला आहे.
‘स्मार्ट कॉन्टॅक्ट लेन्स’चं चार्जिंग कसं करायचं? हा प्रश्न संबंधित संशोधकांना विचारण्यात आला होता. मोजो व्हिजन यावर अजूनही संशोधन करत आहे.
इतकी छोटी बॅटरी, सेल असणं शक्य नसल्याने लेन्स वापरात असतांनाच डोळ्यातील पाण्याच्या द्रव्याने या लेन्सची चार्जिंग व्हावी यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.
स्मार्ट कॉन्टॅक्ट लेन्स ही आपल्यापर्यंत कधी पोहोचेल ? या प्रश्नाचं उत्तर सध्या देणं कठीण आहे. पण, त्याचं स्वागतच होईल आणि तंत्रज्ञानाने जसं आपलं जीवन बदललं आहे तसा हा बदलही सर्वांना मान्य होईल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.